Chatrapati First Shahu Maharaj

छत्रपती थोरले शाहु महाराज

अजातशत्रु तसेच उत्तम प्रशासक असलेले भरतवर्षसम्राट छत्रपती थोरले शाहू महाराज यांना अनेक छंद होते. यालाच अनुसरून त्यांच्या आत्मजांचा सन्मान, प्राणीदया, वृक्षसंगोपन यासंबंधी काही नोंदी आढळतात यावरून त्यांचा प्रेमळ आणि सहृदय स्वभाव असे वेगळे रूप आपल्या समोर येते..

धाकटया शिवाजीची पत्नी दर्याबाईसाहेब यांना भेटीस बोलवून थोरल्या शाहू महाराजांनी त्यांना अलंकार केले आणि हत्ती देऊन करवीर संभाजी महाराजांबरोबर रवाना केले. येसूबाईसाहेब सरकार यांना आरोग्य लाभावे म्हणून गजदान, अश्वदान इतकेच नव्हे तर म्हशीही दान केल्या होत्या. यावरून छत्रपती थोरले शाहू महाराजांचे कुटुंबवत्सल रूप आपल्यासमोर येते..

Shahu raje

Chatrapati Thorale Shahu I

आपल्या राज्यात उत्तम झाडांची पैदास व्हावी म्हणून थोरले शाहू महाराज दरसाल शिवापुरच्या आंब्याच्या वीस हजार कोया लागवडीसाठी मागवल्या होत्या.त्यापैकी किती झाडे जगली याचा हिशोब खेड्यापाड्यातील पाटलांकडून थोरले शाहू महाराज मागवत असत व त्यांना झाडे जगवण्याबद्दल ताकीद असे. रामचंद्र अमात्यकृत्य आज्ञापत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची वृक्षांबद्दल जी नोंद आहे हे या प्रकर्षाने आपल्याला आठवते..

छत्रपती थोरले शाहू महाराज यांना कुत्रे पाळण्याचा छंद होता.त्यांच्या एका कुत्र्याची समाधी माहुली येथे आहे असे म्हणतात. महादजी अंबाजी यांनी छत्रपती थोरले शाहू महाराजांना १० कुत्रे पाठवली होती त्यातील त्यांनी ३ ठेऊन बाकी परत केली असे पत्र आहे.छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा एक आवडता हत्ती होता त्याचे नाव मदारी होते तो विहिरीत पडून मृत्युमुखी पडला तेंव्हा महाराजांना खुप दुःख झाले होते. छत्रपती थोरले शाहू महाराजांना जातिवंत घोड्यासंबंधी चांगली जाण होती. ते स्वता घोड्यावर स्वार होऊन त्याची पड़ताळणी करत असत. छत्रपती थोरले शाहू महाराजांचा हा पैलू त्यांच्या प्राणीदया आणि प्रेमळ स्वभावाचे दर्शन देतो..

भारतात ज्या गोष्टीचे अस्तित्वही नव्हते अशा नाविन्यपूर्ण वस्तू छत्रपती थोरले शाहू महाराजांनी मागवल्या होत्या तलवारी, सुऱ्या, हस्तिदंत, मासे पकड़ण्याचे जाळे, सुशा, कस्तूरी नाभी, वेलची दांडे इतर गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्यामार्फत इंग्रजांकडून मागवल्या होत्या. छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे राहणीमान अत्यंत साधेपणाचे असले तरी या नोंदीवरुन त्यांच्या वैभवाची कल्पना आपल्याला नक्कीच येते.

● संदर्भ – छत्रपती थोरले शाहू महाराज चरित्र – आसाराम सौंदणे

ईतरांना माहिती होण्याकरीता शेअर करा…

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>