मराठा क्रांती मोर्चाचे संचित…

हर्षल लोहकरे

आणखी शंभर वर्षांनी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक इतिहासावर नजर टाकली जाईल, तेव्हा तेव्हा सकल मराठा समाजाच्या अभूतपूर्व क्रांती मोर्चांची आवर्जून दखल घेतली जाईल, हे निश्चित. लाखोंच्या संख्येने समुदाय रस्त्यावर उतरला आणि केवळ मौनाद्वारे महाराष्ट्र हादरवून टाकला. समाजाच्या काही मागण्यांवर राज्य सरकारने आश्वासने दिली, काही मागण्यांवर कृतीची पावले टाकली; मात्र आजअखेर सर्व मागण्यांचा साकल्याने विचार झालेला नाही. येत्या नऊ ऑगस्टला सकल मराठा समाज महाराष्ट्राची राजधानी मुंबईत धडकणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरातील आंदोलनाचा आढावा घेतला आहे समाजमाध्यमांचे तरूण अभ्यासक हर्षल लोहकरे यांनी.

मराठा क्रांती मोर्चा हे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरातील महत्वाचे पर्व म्हणून ओळखले जात आहे. ९ ऑगस्ट २०१६ रोजी जगातील पहिला ‘मराठा क्रांती मोर्चा’ औरंगाबाद शहरात काढण्यात आला. यानंतर बीड, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड सह राज्यातील ४६ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. याबरोबरच राज्याबाहेरही बिदर, इंदोर, देवास, बुऱ्हानपूर, ग्वाल्हेर, या शहरांमध्ये तसेच रशिया, नेदरलँड, दुबई, अमेरिका आदी देशांमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. शिस्तबद्ध महिला-तरुणींनी मोर्चाचे नेतृत्व केले. महापुरुषांच्या पुतळ्यांचे दर्शन घेऊन अग्रभागी भगवा ध्वजधारक युवती व त्यापाठोपाठ लहान मुले, शालेय विद्यार्थिनी, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक व इतर समाजबांधव राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी असे या सर्व मोर्चाचे स्वरूप राहिले. काळे-भगवे शर्ट, भगव्या टोप्या, मोठमोठे बॅनर्स, स्टिकर्स, भगवे झेंडे हातांमध्ये घेतलेले तरुण-तरुणी आणि या सर्व सामाजिक घटकांचे शिस्तबद्ध, शांततेत मार्गक्रमण करत. आपल्या मागण्यांचे निवेदन शाळकरी मुली – युवती जिल्हाधिकाऱ्यांना देत असत. मुलींची भाषणे होत. राष्ट्रगीताने हे मोर्चे विसर्जित होत असत. साधारणपणे असे या मोर्चाचे स्वरूप राहिले. प्रत्येक मोर्चागणिक गर्दीचे नवनवे उच्चांक होत होते. लाखोंच्या मोर्च्यांनी सामाजिक – राजकीय वातावरण ढवळून निघाले. संघटीत तरुण काय करू शकतात, हे या मोर्चांतून पहिल्यांदा एवढ्या व्यापक पातळीवर दिसले. या लक्ष – लक्ष मोर्चांनी माध्यमे, शासन यंत्रणांना खडबडून जागे केले व मागण्या व जनक्षोभाचे रौद्र रूप यांची दाखल घ्यायला भाग पाडले. प्रत्येक मोर्चाबरोबर शासनावरील दबाव कैक पटींनी वाढतच होता.

अभूतपूर्व जनजागर

IMG-20161106-WA0062

अवघ्या जगात पहिल्यांदाच एवढ्या अभूतपूर्व स्वरूपाचे मोर्चे महाराष्ट्रात निघाले, मराठा क्रांती मोर्चातील शिस्तबद्ध मार्गक्रमण, आणि सर्व धर्म समभावाचे साहाय्य करणारे सहभागी भारतीय रूप पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले व मोर्चातील मागण्यांना पाठिंबाही दिला आणि इतर सर्व मोर्चेकऱ्यांनी ‘मराठा क्रांती मोर्चाचा आदर्श घ्यावा,’ हे ही नमूद केले. पण हे मोर्चे का निघाले होते ? त्यामागील कारणे काय होती? या मोर्चांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने तरुण – तरुणी, अबालवृद्ध का एकत्र येत होते ? १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपार्डी या कर्जत तालुक्यातील गावामध्ये एका अल्पवयीन मराठा जातीच्या शाळकरी मुलीचा बलात्कार करून खून करण्यात आलाय व हा खून दलित समाजातील व्यक्तींनी केला आहे, अशी बातमी समाजमाध्यमांतून सर्वदूर पसरली. स्थानिक वृत्तपत्रे व काही वृत्तवाहिन्या सोडल्या तर या बातमीचे स्थान ‘स्पेशल क्राईम स्टोरी’ असेच राहिलेले होते. त्यातील सामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संबंध, त्याची दूरवर पोहोचणारी धग व होणारे दीर्घकालीन सामाजिक-राजकीय व सांस्कृतिक परिणाम या सर्व प्रस्थापित माध्यमांकडून ‘मिस’ झाले होते. या सर्व शक्यता समाज माध्यमांनी वास्तवात घडवून आणल्या आहेत. याआधीही अहमदनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये जातीय अत्याचारासोबत खून, बलात्कार इ. स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले होते. या गुन्ह्यांतील अनेक आरोपींवर आजही खटले चालवले जात आहेत. ज्या ज्या वेळी अशा घटना घडत, त्यावेळी सामाजिक न्यायाच्या रक्षणासाठी पुरोगामी चळवळी, आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने वेळोवेळी पीडितांना अभय देण्यासाठी व यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी घटनास्थळी पोहचत असत. ‘प्रस्थापित माध्यमे व सामाजिक चळवळी यावेळी संपूर्ण मराठा समाजाला आरोपीच्या पिंजर्यात उभे करीत,’ असा आक्षेप मराठा तरुण – तरुणी नियमित नोंदवत आले आहेत.

समाजमाध्यमांचे योगदान

IMG-20161106-WA0070

गावांची जमीन केंद्रीत अर्थव्यवस्था, रूढार्थाने न बदललेले जातीव्यवस्थेचे संदर्भ, जातीच्या सर्व उतरंडीतील पिडीत आणि शिक्षण, रोजगाराच्या मर्यादित संधी, पारंपरिक शेती, कृषी क्षेत्राचा आकुंचित होणारा प्रभाव व लाखोंच्या शेतकरी आत्महत्या यामुळे राज्यातील शेकडो खेडी आजही विकासाच्या रस्त्यापासून कोसो मैल दूर आहेत व जातीय विळख्यात खितपत पडलेली आहेत. या ठिकाणी घडणाऱ्या अत्याचारांच्या गुन्हांमध्ये तेथील तात्कालिक, स्थानिक कारणाचा विचार अनेक वेळा चळवळीतील कार्यकर्ते ‘मिस’ करत असत, तर स्थानिक राजकीय लोक याच दुहीचा फायदा करवून घेत असत, असे दिसते. त्यातून ‘मराठा’ जातीचे लोकच जातीय अत्याचारांचे गुन्हेगार, सूत्रधार असतात, असे चित्र माध्यमांतून बिंबवले जात होते. गावगाड्यातील व परिसरातील वातावरण या गुन्ह्यांमुळे ढवळून निघत होते. सर्व बाजूंनी क्रियेला प्रतिक्रिया पुढे येतच होत्या. यात अद्यापही फार बदल झाला आहे, असे दिसत नाही. कोपार्डी बलात्कार व अमानुष खुनाच्या घटनेने समाजमन ढवळून निघाले. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी साहजिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप – सेना युती सरकारवर होती. ती पार पडताना शासनाची भलतीच धावपळ झाली. अमानुष खून व अल्पवयीन शाळकरी मुलीवरील बलात्काराने सामाजिक असंतोष पेटू लागला. भावनिक युवकांनी सोशल मिडियावर आपल्या भावनांना वाट करून दिली. त्यातून सर्व बाजूंनी चर्वितचर्वण होत राहिले. कोपार्डीच्या प्रकरणावर समाजमाध्यमे मात्र रात्रंदिवस ढणढणू लागली, साहजिकच त्या वर्षाचे पावसाळी व हिवाळी अधिवेशन हादरून गेले. विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तर सरकारने सर्वतोपरी सहाय्य व न्यायप्रक्रिया जलद करण्याचे आश्वासन दिले व कटिबद्धता स्पष्ट केली. सोशल मिडीयाने या एकूण प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे, हे दिसते. लोक आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून देत व्यक्त होऊ लागले. डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आणि हे मोर्चे सरकारविरोधी आहेत, हे स्पष्ट केले.

दुहीचा फायदा कोणाला?

IMG-20161106-WA0088

‘मराठा अस्मिता’ने याच भारलेल्या वातावरणात उचल खाल्ली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन समाजाच्या सर्व स्तरांतील माणसांचा प्रतिपाळ करणाऱ्या राजाचे छायाचित्र जातीय विद्वेषात व राजकीय फायद्यासाठी वापरण्यात येऊ लागले. सर्वच महापुरुषांची अशी जातीय तत्वांवर केलेली विभागणी समाज एकसंध ठेवायला कशी मदत करेल ? हे बदलायला हवे. युवकच हे विदारक चित्र बदलू शकतात. मराठा मोर्चातील मागण्या या महिला अत्याचारावर कठोर कारवाई, कोपार्डी पीडितेला न्याय, शेतकऱयांच्या पिकाला हमी भाव, स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शिक्षण व नोकरीत मराठा तरुणांना आरक्षण, मराठा युवकांसाठी सारथी या संस्थेची स्थापना, जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी व कायद्याचा गैरवापर टाळणे या व अशा अनेक मागण्या करण्यात येत होत्या. यातून सामाजिक – राजकीय वातावरणाचा परीघ ढवळून निघत होता. हे सर्वच मुद्दे सामाजिक दृष्ट्या विकोप निर्माण करणारे आहेत असेही नाही, पण दोन समाज गटांना झुंजवत ठेवून काहीही मागण्या पूर्ण न करण्यातील कुटील चाल खेळण्यात राज्यकर्ते यशस्वी झाले हे वास्तव आहे. हे धृवीकरणाचे राजकारण घडवून आणण्यात प्रस्थापित माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, हे स्वीकारायला हवे. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी. जी. कोळसे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मराठा व महार या लढवय्या जाती आहेत. त्यांना आपापसात झुंजवत ठेवून कोणाचे हित साधले जाणार आहे, यावर विचार करणे आवश्यक आहे. यातच भारताचे व महापुरूषांच्या शिकवणीचे सार सामावले आहे.

सामाजिक धृवीकरणाचा धोका

IMG-20161109-WA0230

मराठा क्रांती मोर्चे होण्यापूर्वी व वर्तमान भाजप – सेना युती शासन सत्तेत येण्यापूर्वी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारने राणे समितीच्या हवाल्यानुसार सामाजिक, शैक्षणीक व आर्थिक मागास असलेल्या प्रवर्गाला १६ टक्के आरक्षण देण्याचा ठराव संमत केला व त्या संबंधीचा अध्यादेश काढला होता. या अध्यादेशाविरोधात काही कार्यकर्ते उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप – सेनेचे सरकार सत्तेत आले. उच्च न्यायालयाने या प्रकरणावर ९८ पानी स्थगितीचे निर्देश दिले. महाराष्ट्र शासनाने प्रवर्गाचे आरक्षण विषयक अध्यादेशाची मुदत संपताना कायदा केला. या कायद्यालाही न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. साधारणपणे हा मागास प्रवर्ग घटकांच्या आरक्षण विषयाचा नजीकचा घटनाक्रम लक्षात घेता येईल. मराठा संघटनांनी मागील ३० वर्षे व त्याहून अधिक काळ केलेला संघर्षही क्रांती मोर्चे यशस्वी करण्यात महत्वाचा ठरला आहे. मराठा असोत की समाजातील कोणतेही मागास प्रवर्ग घटक, त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक त्या सहाय्यभूत यंत्रणा उभारणे व पालकाची भूमिका घेणे हे राज्यशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. मराठा क्रांती मोर्चातील मागण्यांचे स्वरूप पाहता ते एकाच वेळी व्यापक समाजाचा विचार करणारे आहे असे वरकरणी दिसते. पण जातीय प्रतिबंधक कायद्याविषयक मागणी, आरक्षण विषयक मागणी याने गैरसमजातून सामाजिक तणाव निर्माण होऊन सामाजिक ध्रुवीकरण होण्याचा धोकादेखील आहे.

संघर्षाची बीजे चौकटीभोवती

IMG-20161109-WA0204

सकल मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी होणाऱया युवक युवतींना रोजगाराची व उच्च शिक्षणाची आस आहे. प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान या युवकांसमोर आहे. त्यामुळेच ९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱया मराठा क्रांती मोर्चामध्ये अभूतपूर्व संख्येने लोक सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. राज्यातील व देशातील युवकांना केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, उच्च शिक्षण, उद्योग, व्यवसायाला प्रोत्साहन यांची अपेक्षा आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशातील अंदाजे ९० लाख मतदार हे आयुष्यात पहिल्यांदा मतदान करणारे होते, असे आकडेवारी सांगते. वय वर्षे १८ असणाऱया मुला – मुलींनी व देशातील महिला, युवक व पारदर्शक कामाची अपेक्षा असणाऱया मतदारांनी श्री. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिले. नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाने विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते. त्याचा दृश्य परणाम म्हणजे एकट्या भारतीय जनता पक्षाचे २८२ खासदार संसदेत दाखल झाले. भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मात्र नेहमी आरक्षणविरोधी भूमिका राहिली आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे देशांतर्गत संघर्षाची बीजे ही आजही आरक्षण, शिक्षण, शैक्षणिक सवलती, नोकऱयारोजगार इ. चौकटीत साहजिकच फिरताना दिसतात.

बेरोजगारीची झळ

IMG-20161112-WA0005

भारत देशाची वर्तमान लोकसंख्या अंदाजे ११७ कोटी इतकी आहे. यातील अंदाजे ४१ ते ५५% लोकसंख्या ही वय वर्षे ३५ च्या आसपास आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी १६ व्या लोकसभेच्या प्रचारात दरवर्षी २ कोटी नवे रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. जे की सरकारच्या मागील तीन वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण करण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. लोकप्रिय घोषणांच्या मागे धावताना युवकांचे धोरण, युवकांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग व त्यांचे महत्व यांकडे आधीच्या शासनानेही दुर्लक्ष केले व नवे सत्ताधारीही याच दिशेने वाटचाल करत आहेत, हे मोठे दुख:द चित्र आहे. आर्थिक उदासीच्या वातावरणात आणि नोटबंदी नंतरच्या भारतात सुमारे १ कोटी युवकांचे सुरु असलेले, हातातले रोजगार व नोकऱया काढून घेण्यात आल्या आहेत. ही झळ इन्फोसिससारख्या बड्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत कार्यरत असणाऱया ११ हजार इंजिनिअर्सनासुद्धा बसली आहे. देशाचे शैक्षणिक धोरण निश्चित करताना केंद्र शासनाने सामाजिक शास्त्रांवरील खर्च कमी केला आहे. विज्ञान संशोधनावरील रक्कमेत, अभ्यास वृत्तीमध्ये कपात केली आहे. देशाच्या विकासाची दृष्टी हरवलेले हे शासन आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून ९ ऑगस्ट रोजी देशभरात वैज्ञानिक व संशोधक रस्त्यांवर उतरत मोर्चे काढणार आहेत. युवकांच्या या सर्व संघटीत असंतोषाची दखल घेण्यात राज्यसंस्था कमी पडल्या तर देशाच्या हिताच्या दृष्टीने हा मोठा धोका संभवतो.

युवकांसाठी धोरण हवे

IMG-20161109-WA0232

राज्यातील व देशातील युवकांना अभिव्यक्तीसाठी इंटरनेटमुळे मोठी संधी निर्माण झाली आहे. भारताचा विचार केला तर वर्तमान वर्षातील आकडेवारीनुसार देशातील ५० कोटी लोक इंटरनेटचा कमी – अधिक वापर करणारे आहेत. हे शक्य झाले देशातील इंटरनेट क्रांतीमुळे! मोबाईलने आता गाव, खेडे, शहरे यांच्यातील अंतर कमी केले आहे. आभासी वास्तवात जगणाऱ्या युवकांना फेसबुक, व्हॉटस्अॅप, ट्वीटरच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याने नवे अवकाश उघडून दिले आहे. ट्युनिशिया, इजिप्त देशांतील रिव्होल्युशन ते अगदी अलीकडील मराठा क्रांती मोर्चा हे समाजमाध्यमांनी संघटीतपणे घडवलेले लाखो लोकांचे मोर्चे आहेत, याबद्दल आपण सहमत असायला हवे. मराठा क्रांती मोर्चा पाठोपाठ प्रतिक्रिया म्हणून निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चातही युवक – युवतींचा सहभाग लक्षणीय होता. किसान क्रांती मोर्चा हे या लाखोंच्या मोर्चाचे नवे स्वरूप पाहून पुढे येताना दिसते आहे. किसान क्रांतीतही सोशल मिडिया आणि जनाक्रोश हे महत्वाचे बिंदू राहिले आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी युवक आभासी माध्यमांचे शिलेदार बनले आहेत, अभिव्यक्त होत आहेत, प्रत्यक्षात एकत्र येत व्यवस्थेला प्रश्न विचारत आहेत, नव्या सृजनाची वाट बनवत आहेत, स्वयंपूर्ण होण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत, हे सकारात्मक चित्र आहे. शासनाने मराठा क्रांती मोर्चा असो की किसान क्रांती मोर्चा, या सर्व मोर्चाची वेळीच दखल घ्यावी व युवककेंद्री धोरण राबवावे, अन्यथा लवकरच राज्यात व देशाच्या प्रत्येक राज्यात बेरोजगारांचे क्रांती मोर्चे निघायला सरकारला सन २०१९ च्या निवडणुकांची वाट पहावी लागणार नाही.

सौजन्य
Esakal.Com

मराठा मोर्चा का ठरला विशेष ?

महाराष्ट्राने अनेक मोर्चे बघितली असतील परंतु मोर्चाची परिभाषा बदलवणारे ५७ मोर्चे महाराष्ट्रात निघाले.मी स्वतः महाराष्ट्रतील अनेक मोर्चात सहभागी होतो त्या अनुभवावर लिहिलेला लेख… काय विशेष होते मोर्चात नक्की वाचा?

मोर्चातील लोकांची संख्या

mkm

morcha participant

महाराष्ट्रातील पहिला मोर्चा असेल ज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाहून निघाले होते. जिथ पर्यंत नजर जाईल तिथप्रर्यंत भगवाच दिसेल. मोर्चात १० लाख,१५ लाख आकडा हा साधारण सहभाग झाला होता. रस्त्यावर हलायला जागा नव्हती व जवळपास ५ किमी पर्यंत हीच अवस्था सगळीकडे असणार. लोक बाल्कनी,झाड, जिने इत्यादी ठिकाणी चढून मोर्चातील हि मराठ्याची लाट बघत होते. हा आकडाच तुमची छाती अभिमानाने फुगवतो.

अभूतपूर्व विक्रमी हजेरी

mkm

 

तरुणाचा समावेश या मोर्चात अधिक प्रमाणात होता. परंतु अनेक कुटुंब सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. आणि त्यांच्या लहान बाळांना रंगीबेरंगी कपडे , पटका, झेंडा, मराठा घोषवाक्य असलेली टोपी पाहण्या लायक नजरा होता तो. लहान मुलांचा समावेश हा मोर्चातील विशेष भाग होता…

मोर्चाचे नेतृत्व

mkm

मोर्चाचे नेतृत्व हे सामान्य कुटुंबातील मुली करत होत्या. हि विशेष बाब , व्यासपीठावर कुठल्याही नेता,सामाजिक कार्यकर्ता कोणीही नव्हत. फक्त मराठा रणरागिणी…

लोकांची शिस्तबद्धता

mkm

किमान १० लाख लोक मोर्चात असतात. परंतु एकही माणूस बदफैली किंवा असभ्य वर्तवणूक करताना दिसणार नाही. अनेक मुले झाडावर चढत होती तो प्रसंग त्यांच्या मोबाईल मध्ये कैद करायला. पोलीसासोबत सेल्फी काढणारे अनेक तरुण मी बघितले. पोलीसहि निश्चित होते ह्या लाखोच्या जनसमुदाया पुढे…

साफसफाई

maratha sevak

लोक स्वतः करिता पाण्याच्या बाटल्या , अन्नाची पाकिटे घेऊन आलेले होते. अरे हो हि बाब एक विशेष मोर्चाला येणारे लोक खेड्यावरून येत होते तर त्यांचा डब्बा ते स्वतः घरून भाजी भाकरी बांधून आणत होते. त्या बाटला, पाकिटे रस्त्यावर पडल्या बरोबर मराठा सेवक येणार आणि रस्त्यावरील कचरा उचलणार. अनेक अधिकारी, अभियंते, डॉक्टर,विद्यार्थी इत्यदी लोकांना मी हि मराठा सेवकाची भूमिका वठवताना पहिलय. मोर्चा झाल्यावर या लाखो लोकांनी कागदाचा तुकडाही रस्त्यावर दिसू दिला नाही. कमालीची बाब आहे.

परदेशातील बांधवानि दिला पाठींबा

maratha kranti morcha newyork image

मराठा क्रांती मोर्चा एकमेव मोर्चा होता ज्याला २० देशातून पाठींबा मिळाला. जगाच्या कानाकोपर्यात हा मोर्चा झाला. मराठा बांधवानी प्रत्येक देशातून मोर्चास जमून पाठिंबा दिला.

सोशल मीडियावर डंका

14741750_1296809407049609_778246232_n

 

सोशल मीडियातून हा मोर्चा वर आला आहे. मोर्चाने स्वतःची स्वतंत्र प्रचार यंत्रणा बनवली होती. फेसबुक मराठा क्रांती मोर्चामहाराष्ट्र या पेजचा महिन्याभारत १ करोड ८६ लाख लोकापर्यंत पोहचण्याचा विक्रम केला. अनेक ट्रेंड twitter वर मोर्चाची गाजले.

परदेशी वृत्त वाहिन्यांनी घेतली दखल

BBC London, National Geographic सारख्या अनेक नामांकित परदेशी वृत्तवाहिन्यांनी या मोर्चाची दखल घेत महाराष्ट्र गाठला होता. ते लोकही अचंबित झाले होते हे सर्व बघून.

मानवता

gf
संपूर्ण रस्ता हा लोकामुळे बंद झाला होता. मी अनेक मोर्चे पाहिले ज्या नंतरहि लोकांना त्रास होतो परंतु मराठा मोर्चाची बातच न्यारी त्या ३ तासानंतर तुम्हाला वाटणार हि नाही इथे लाखो लोक येऊन गेले. जे रस्ते बंद झाले होते ते अचानकच तीन तासानंतर सुरु झाले.
नेहमीच्या आयुष्यात अस होत नाही परंतु कोणालाही म्हटले “मित्र थोडी जागा देत का जायला ? धन्यवाद “ आणि जागा मिळणारच. बर्याच लोकांचे हरवलेली पाकिटे घोषणा करून परत भेटणं मी बघितले. हे पहिल्यादा मी अनुभविले होते. नेहमी अश्या घोषणा ऐकायला येतात कि सापडले असतील तर परत द्यावे.. पण इथे सर्व उलटच
मी मोठेपणा करणार नाही परंतु तिथे हलायला सुध्दा जागा नव्हती. पुस्तकाच्या पानाप्रमाणे लोक एकमेकांना चिपकून उभे होते उन्हाळ्याच्या दिवसात, परंतु रुग्णवाहिकेस याच गर्दीतून ५ मिनटात रस्ता मोकळा होताना मी डोळ्यांनी बघितला. लाखो लोकाच्या दाटीवाटीतून रुग्णवाहिका आरामात चालली गेली कल्पना तरी करू शकता का ? लोक एकमेकासोबत हसून बोलत होते जसे ते कित्येक काळापासून एकमेकांना ओळखतात.
आणि महत्वाची गोष्ट या मोर्चा मध्ये सर्व जाती धर्माची लोक सहभागी होते. फक्त मराठ्यांना हक्क मिळवून देण्या करिता..

राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता

people singing national anthem

मोर्चाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुली जेव्हा निवेदन देऊन येतात, तेव्हा सर्व लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वेगळाच असतो. कल्पना करा लाखो लोक एका अभिमानास्पद क्षणात असताना. तुम्ही कुठल्या जातीचे आहात हे गोष्ट येथे महत्वाची नाही, तुम्ही सहभागी झालात यामुळे छाती गर्वाने फुलतो.
त्यांनतर संचलन करणारे राष्ट्रगीता करिता राष्ट्रगीता करिता ऑर्डर देतो. कल्पना करा लाखो लोक सगळीकडे शांतता फक्त रवींदनाथ टागोर यांचे शब्द तुमच्या कानावर हळूवार एकू येतात. देशभक्तीने हृद्य ओतप्रोत भरून आल्याशिवाय राहणार नाही. मला तर अंगावर काटे आले होते. भारत माता कि जय व तो संपूर्ण शहरात घुमणारा जयचा नारा आजही माझ्या कानात घुमतोय.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा मोर्चा मूक होता. शांततामय मार्गाने…
मुंबई मोर्चात मागण्या मान्य नाही झाल्या तर हि सर्वाच भल पाहणारी लोक काय रूप धारण करतील हे सांगता येणार नाही. आतापर्यतचा अनुभव रोमांचकारी होता. परंतु हि खदखद मनात अशीच भरून राहिल्यास अवश्य स्फोट होणार…

अमित पाटील वानखडे

महाराष्ट्र म्हणजे मराठा आहे का ?

प्रिय महाराष्ट्र

काही दिवसांपूर्वी मराठा म्हणजे महाराष्ट्र असं पत्र लिहिलं होतं. पण महाराष्ट्र म्हणजे मराठा आहे का? असा प्रश्न स्वतंत्रपणे विचारू असं ठरवलं होतं. कारण टाळी एका हाताने वाजत नाही.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी डॉक्टर आंबेडकरांनी खेड्यातून बाहेर पडा असा संदेश दलित समाजाला दिला. त्यांनी तो प्रामाणिकपणे मानला. हळू हळू मोठ्या संख्येने शहरात स्थलांतरीत झाले. गांधीजींनी सांगितलेला खेड्याकडे चला हा मंत्र शहरातल्या कुणी फारसा मनावर घेतला नाही. खेड्यात उरल्या फक्त शेती करणाऱ्या जाती. त्यातल्या मराठा वगळता बाकीच्या जातींना टप्प्या टप्प्याने आरक्षण मिळत गेले. शेती करणारी जात उरली बहुसंख्येने मराठा. पूर्वीपासून मराठ्यांना सुखावणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे आपण राज्य करणारी जमात आहोत. आणि इथेच सगळ्यात मोठी फसवणूक होती. राज्य करणारे मराठे दहा टक्के आणि उरलेले ९० टक्के. स्वतःची शेती असून बेरोजगार. ७२ च्या दुष्काळाने मोठ मोठ्या शेतकऱ्याला खडी फोडायची वेळ आणली. शेतात अन्न पिकवून लोकांना पोसणाऱ्या बळीराजाला मिळालं काय? खडी फोडण्याची शिक्षा. या धसक्याने शहराकडे खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. ब्राम्हणांनी काळाची पावलं ओळखली. शिक्षण आणि नौकरीला प्राधान्य दिलं. पण बहुसंख्य मराठे शेती करत राहिले.

डोक्यात काय तर आपले लोक सत्तेत आहेत. शेतकऱ्यांच भलं होईल. त्यात हरित क्रांती. शेतकरी अलगद बहुराष्ट्रीय कंपनीच्या जाळ्यात ओढला गेला. बियाण्यां पासून खतापर्यंत गुलामी सुरु झाली. शेतकरी आपल्या नेत्यावर अवलंबून होता आणि नेते भांडवलदारावर. आज शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे तर या खत आणि बियाण्यांच्या कंपन्या. पण कुणालाच त्याविरुध्द आवाज उठवावा वाटत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी शेतक्याला रस्त्यावर आणलं. हळू हळू प्रत्येक मराठा अल्पभूधारक होऊ लागला. वीस वीस एकर शेती असणारे दोन तीन पिढ्यात अल्पभूधारक झाले. बांध पडत गेले शेतात आणि मनात. ज्यांची मनं सुपीक होती त्यांची शेतं मात्र कोरडवाहू राहिली. ज्या राजकारणावर आपण विसंबून राहिलो त्या राजकारणाने आपला विश्वासघात केला. बाकी जातींचा झपाट्याने विकास झाला, होतोय. पण आपण मागे राहिलो ही भावना मराठयांमध्ये निर्माण झाली. त्यात निसर्गानेसुद्धा नेहमीच मोठा अन्याय केला. आणि त्यात कोपर्डीची घटना घडली. आता काय होणार? हा प्रश्न पडला महाराष्ट्राला. मराठे कसे उत्तर देणार?

19239668_1568506503213230_331123871_n

इथे सगळ्यात मोठा बदल घडला. कुणाच्या डोक्यातून ही आयडिया आली माहित नाही. पण अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मराठा क्रांती मोर्चा निघाला. पुढे प्रत्येक जिल्ह्यात त्याची सुरुवात झाली. राजकारणात एकमेकांचे शत्रू म्हणून उभे राहणारे मराठे सगळ्यांनी पाहिले होते आजवर. पण गेल्या कित्येक वर्षात असे एकदिलाने एकत्र आलेले मराठे पाहिले नव्हते.

मराठा क्रांती मोर्चाचा बाह्य चेहरा आक्रमक वाटत असला तरी त्यात मागे रांगेत, कोपऱ्यात, खाली मान घालून सहभागी झालेले गरीब चेहरे बारकाईने बघा. ते सगळे पिचलेले, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले, मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने खचलेले मराठा शेतकरी बांधव आहेत. या लोकांकडे प्रामुख्याने मराठा मोर्चा आणि महाराष्ट्राने लक्ष द्यावं ही प्रामाणिक इच्छा आहे. या लोकांनी आळीपाळीने प्रत्येक राजकीय पक्षावर विश्वास ठेवला. दुर्दैव एवढच होतं की यांनी स्वतःवर कधीच विश्वास ठेवला नाही. अगदी आपला माल आपण स्वतः बाजारात विकू ही गोष्ट पण केली नाही. कारण एकच आपण सत्तेत आहोत ही फसवी जाणीव. आणि सत्तेतल्या दहा टक्के लोकांनी या नव्वद टक्के लोकांपर्यंत सत्तेचे पुरेसे फायदे पोचूच दिले नाहीत. पण सत्तेतल्या दहा टक्के लोकांच्या प्रत्येक दोषाची शिक्षा हा नव्वद टक्के मराठा भोगत असतो. चित्रपट पाहून सामाजिक भान तयार झालेल्या लोकांना गावातला प्रत्येक मराठा मग बुलेटवर दिसायला लागतो. प्रत्येक मराठ्याची विहीर, शेत, घर चित्रपटा सारखं असेल असं वाटू लागतं. प्रत्यक्ष जाऊन पाहिलं तर ती विहीर कोरडी ठाक असते. चित्रपट आणि वास्तव यातला हा मोठा फरक असतो. खेड्यातल्या शेतकरी मराठ्याची अवस्था त्या विहिरीसारखी आहे. ती बळेच भरलेली दाखवली जाते. पण ती प्रत्यक्षात कोरडी आहे.

तुम्ही फक्त पाटील नाव काढा महाराष्ट्रात. लोकांना चित्रपटातला खलनायक आठवू लागतो. हे फक्त आणि फक्त चित्रपटसृष्टीचं योगदान आहे. बाकी कुठल्याच आडनावाचा एवढा गैरवापर चित्रपटात झालेला दिसणार नाही. पाटील म्हणजे निळू फुले आणि त्यांचा संवाद म्हणजे ‘बाई वाड्यावर या.’ एवढी सोपी व्याख्या. शेतीच्या नादात गावातली माणसं रस्त्यावर येत असताना ही प्रतिमानिर्मिती आता संताप आणणारी ठरतेय. बरं खेडोपाडी पाटील कुठल्या एका जातीचे नव्हते हे सुद्धा लोकांच्या गावी नसतं. आता लोकांसाठी मराठवाडा विदर्भातले खरे पाटील दाखवायला एक पिकनिक काढली पाहिजे. त्याला लाईट आली तर पाणी कुठून आणू हा प्रश्न आहे, पाणी आलं तर खत कुठून आणायचं हा प्रश्न आहे. त्याच्यापुढचे प्रश्न संपायला तयार नाहीत. विश्वास बसणार नाही पण हे शेतकरी आता अस्पृश्यांसारखं जीवन जगतात.

Sindhudurg Maratha Kranti Morcha

Sindhudurg Maratha Kranti Morcha

स्वतःचा पीकविमा घ्यायला गेलेल्या शेतकऱ्याला बँकेत उभं करत नाहीत. कर्ज मागायला तर बँकेच्या आसपास पण फिरकू दिलं जात नाही. आपल्या म्हणवल्या लोकांच्या साखर कारखान्यात उस नेताना वागणूक सारखीच. बियाण्याच्या आणि खताच्या दुकानात अवस्था वेगळी नाही. या नवीन अस्पृश्यते बद्दल कुणी बोलायला तयार नाही. साधं उदाहरण सांगतो. गावात प्रचार करायला आमदार किंवा उमेदवार येतात ते गावातल्या पान टपरी वाल्याला भेटतात. फोटो काढतात. पण शेतात जाऊन एखाद्या शेतकऱ्याची चौकशी करायची तसदी घेत नाहीत. त्यांनी शेतकऱ्याला गृहीत धरलेलं असत. व्यापारी वर्गाची त्यांना काळजी असते. एकेकाळी ज्याच्या शेतातल्या खळ्यावर गावगाडा अवलंबून असायचा तो शेतकरी आज विश्वासानं कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवावं याची वाट बघतोय. तो बहुसंख्येने मराठा आहे या गोष्टीकडे कुणी लक्ष देत नाही. नाटक, चित्रपटातले पाटील, सरपंच आणि आमदार म्हणजेच मराठा असं नाही. शेतकरी आत्महत्येची दर वर्षीची दर गावातली यादी वाचून बघा. त्यात जवळपास मराठाच आहेत. त्या शेतकरयासाठी या मोर्चाने मागण्या कराव्यात.

शेतकऱ्यासाठी हक्काची बाजारपेठ, हमीभाव आणि शेतकऱ्याच्या मुला मुलींचं पदवीचं संपूर्ण शिक्षण मोफत अशा मागण्या अनेक मागण्या आहेत. ज्या मागण्या सरकार तात्काळ मान्य करू शकतं. या गोष्टी तातडीने होण्याची खूप आवश्यकता आहे. शहरात लोकांना पाउस झाला की शेतकर्याचे प्रश्न सुटले असं वाटतं. पिक काय आपोआप उगवतं गवत उगवल्यासारखं असं वाटतं. पण हाच पाउस अवेळी येऊन वाट लावून टाकतो. शेती नुकसानीची आहे. पण आवश्यक आहे. सोडावी वाटते पण सोडवत नाही. जीवावर उदार होऊन शेती करणाऱ्या आणि नेहमी नुकसान सोसून लोकांचं पोट भरण्यासाठी अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे प्रश्न या मोर्चातून सोडवले गेले पाहिजेत. मोर्चाची सुरुवात कोपर्डी प्रकरणापासून झाली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीवरच्या अन्यायावर एवढी जळजळीत प्रतिक्रिया उमटली पाहिजे. तरच प्रत्येक गुन्हेगाराला वचक बसेल.

आज मराठा मोर्चाने जगासमोर एवढ्या एकीचं आणि शिस्तीच उदाहरण घालून दिलंय. इथून पुढे किमान महाराष्ट्रातला प्रत्येक मोर्चा असाच शांततेने आणि शिस्तीत निघावा ही अपेक्षा. यानिमित्ताने महाराष्ट्राने खुल्या दिलाने शेतकऱ्यासाठी आपला पाठिंबा दाखवावा. दबल्या आवाजात अॅट्रॉसिटीवर चर्चा करण्यापेक्षा सगळ्या जातींनी त्यावर एकत्र येऊन स्पष्ट बोलावं. या कायद्याने दलितांना न्याय मिळाल्याचं समाधान भेटलं नाही आणि इतर जातींना मात्र अन्याय होत असल्याची भावना झाली. म्हणून या कायद्याच्या निष्पक्ष आणि प्रभावी अमलबजावणीसाठी काय करता येईल याचा शांतपणे विचार व्हायला पाहिजे. कायदे संसद ठरवणार आणि त्याची एक पद्धत आहे हे विसरून चालणार नाही. पण कुठल्याही पक्षाच्या किंवा नेत्याच्या कुबड्या न घेता लोकांनी एकत्र यायला हवं हे उदाहरण यानिमित्ताने महाराष्ट्राने घ्यायला हवं.

आपल्याकडे आंदोलनं आणि मोर्चे ९० टक्के वेळा कुठल्यातरी राजकीय पक्ष किंवा विचारानी स्पॉन्सर केलेली असतात. अशाप्रकारे लोक स्वतःहून रस्त्यावर येणं दुर्मिळ असतं. या गोष्टीचं कौतुक करतानाच या लोकचळवळीचं प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मुळात मोर्चा निघाला की लगेच अॅट्रॉसिटी रद्द होणार आहे असं म्हणून दोन्ही बाजूंनी भुई थोपटू नये. न्यायालयांच काम न्यायालय करेल. दलित समाजाने सामंजस्याने या मोर्चाचं स्वागत केलंय. प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या समंजस भूमिका मांडणाऱ्या लोकांचं मराठ्यांनी कौतुक केलंय. हे सामंजस्य टिकण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले पाहिजेत. प्रतीमोर्चाच्या धमक्या देणाऱ्या नेत्यांनी आगीत तेल ओतण्याचं काम करू नये. त्याने आपलेच हात पोळण्याची जास्त शक्यता असते हे लक्षात ठेवावं. उलट समोर येऊन याच मोर्चात सामील व्हायची तयारी दाखवावी. दोन्ही बाजू एक एक पाउल पुढे आल्या तर हा महाराष्ट्राचा मोर्चा होईल. शेतकरयाना आरक्षण मिळू शकत नसेल तर आरक्षणात मिळणाऱ्या प्रत्येक सोयी शेतकऱ्याला मिळाव्यात अशी मागणी ताबडतोब मंजूर करून घेतली पाहिजे. काही पदरात पाडून घ्यायचं असेल तर तात्काळ हे होऊ शकतं. बाकी गोष्टीसाठी न्यायालयीन लढा लढावा लागणार आहे.

maratha kranti morcha thane image

maratha kranti morcha thane image

या आंदोलनातून असा तरुण समोर यावा जो या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा असेल. आता जिल्हे संपत आले. पण अजूनही सरकार ताबडतोब मंजूर करू शकेल अशी मागणी समोर आली नाही. न्यायालयाचं कारण न देता सरकार ताबडतोब कृती करेल अशी मागणी हवी. आणि ती फक्त शेतीशी आणि शिक्षणाशी संबंधित असू शकते. कोपर्डीसोबत बसच्या पासला पैसे नाहीत म्हणून जीव दिलेली मुलगी आठवा, पाण्यासाठी गेलेले चिमुकले जीव आठवा, कर्जापोटी गेलेली कर्ती माणसं आठवा. त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. इतर जातीतल्या शेतकऱ्याना या मोर्चामुळे दोन फायदे झाले तर ते आयुष्यभर आशीर्वाद देतील. एकत्र येतील. बाकी आजवर खेड्या पाड्यातला शेतकरी मराठा आपलीच सत्ता आहे या भ्रमात होता. सत्ता गेली हे खूप बरं झालं. भ्रम दूर झाला. आज मराठा आत्मपरीक्षण करतोय. नेत्यांसाठी नाही स्वतःसाठी रस्त्यावर येतोय.

छुपं नेतृत्व असत तर आजवर डोकावलं असत. मराठ्यांनी इतर जातींना सोबत घ्यावं अशी अपेक्षा आहे तशी इतर जातींनी स्वतःहून पुढे येऊन कुठल्याही नेत्याशिवाय एकवटलेल्या या चळवळीला विधायक वळण देण्यासाठी आपला वाटा उचलावा. मोठ्या भावाने समंजस असावं अशी अपेक्षा करताना छोट्या भावाने फक्त गंमत बघत बसावी असा अर्थ अपेक्षित नसतो. बाकी कुठल्याही जातीने जातीच्या नावावर कितीही गोष्टी केल्या तरी निवडणूक येते तेंव्हा आपोआप लोक समतेचा विचार करायला लागतात. आपसूक इतर जातींचा कळवळा येतो. ही एक आपल्या लोकशाहीने चांगली सोय केलीय. आजवरच्या मराठा नेतृत्वाला इतर जातींना खुश ठेवण्याच्या नादात आपल्याच जातीला आपण मागास ठेवतोय याची जाणीव झाली नाही. तरीही लोकशाही शेवटी प्रत्येकाला आपल्या जातीपलीकडे विचार करायला लावतेच. असो.

maratha morcha kolhapur t-shirt

maratha morcha kolhapur t-shirt

निवडणूक डोळ्यापुढे नसताना एवढे लोक एकत्र आलेत. या मोर्चाच्या नावावर जातीवाचक भाषा, भडक विधानं किंवा अफवा पसरवणाऱ्या लोकांपासून सावध रहा. आपल्याला आलेले भलते सलते मेसेज फॉरवर्ड करू नका. या मोर्चाचा कुणीच नेता नाही आणि कुणी तसा दावा करत असेल तर भूलथापांना बळी पडू नका. तर या मोर्चाच्या माध्यमातून स्त्रियांकडे बघण्याची सगळ्याच लोकांची नजर बदलो. शेतकऱ्यांची एकतरी मागणी पूर्ण होवो. कारण तुम्ही बारकाईने पहा. तुम्हाला कुठल्याच माणसाकडे बघून त्याची जात ओळखता येणार नाही. पण तुम्ही आज चेहरा बघून हा माणूस शेतकरी आहे हे नक्की सांगू शकता. आणखी किती हाल करायचे शेतकऱ्याचे? चला, त्याला आधी न्याय देऊ. तो महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय असेल. जर आपला मोठा भाऊ शिस्तीत वागणारा असेल तर कुठल्या छोट्या भावाला अभिमान वाटणार नाही?आता यानंतर शेतमजूराविषयी सविस्तर.लवकरच.

लेखक – अरविंद जगताप.

यांच्यापासून दूर रहाणे हेच मराठा हिताचे…

यांच्यापासून दूर रहाणे हेच मराठा हिताचे

यापूर्वी मराठा क्रांती मोर्चा असेल अथवा समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांत कोणतेही ठोस योगदान नसताना केवळ सोशल मिडीयाचा वापर करून भुलवणारी,ठोकाठोकीची आक्रमक भाषा वापरून,इकडचा-तिकडचा वारसा सांगून संघटना बांधायला निघालेत काही लोक.हरकत नाही पण आपला हा स्वार्थ साधताना समाजाची काय हानी करीत आहोत याचे जरासेही भान असू नये!

अनेक जिल्ह्यांतील अनेक कार्यकर्त्यांनी,मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी एकत्रित 9 ऑगस्ट मुंबई मराठा क्रांती मूक मोर्चाचा निर्णय घेतला आहे.आत्ता पर्यंतच्या मराठा क्रांती मूक मोर्चांच्या आचारसंहीतेनुसारच मुंबई मोर्चा असेल.या शिस्तबद्धतेमुळे मोर्चांमध्ये वृद्ध,महीला,मुले-मुली,विद्यार्थी,नोकरदार,पांढरपेशे अशा सर्वांचा प्रचंड सहभाग लाभला व मराठा समाजाच्या अभूतपूर्व,ऐतिहासीक मोर्चांची जगाला नोंद घ्यावी लागली.57 मोर्चांनंतर काहीच मिळाले नाही याचे कारण मोर्चे मूक होते असं कोणी मांडत असेल तर अशा लोकांच्या बुद्धीची किव करावी तेव्हढी थोडी आहे.वास्तविक एकवाक्यता न होणे,समन्वय समिती न नेमणे,सरकारशी फॉलोअप व चर्चा न करणे,तसेच सरकारच्या खेळ्या वेळोवेळी समाजासमोर उघड्या न पाडणे,इ.अशा कारणांनी पदरात काहीच पडले नाही हे मान्यच करावे लागेल.मूक मोर्चांमुळे मागण्या मान्य झाल्या नाही व ठोक मोर्चा काढल्यानंतर त्या मान्य होतील असे म्हणणे निव्वळ पोरकटपणाचे आहे.

समाजकारणातला काडीचाही अनुभव नसणार्या नवतरूणांना व कोवळ्या वयातील मूलामूलींना आक्रमक व भूरळ घालणारी भाषा वापरून काहींना आपली संघटना वाढवायची आहे.त्यासाठी दाढी,कपडे,भाषा कसे ठेवायची व सोशल मीडिया कसा प्रभावी वापरायचा याची गणितं करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललाय.जेव्हा बहुसंख्यक लोक एक भूमिका घेऊन चालतात तेव्हा तिरसट,वेगळी भूमिका व भाषा करणाराला सहज प्रसिद्धी मिळते हेही सूत्र इथे दिसतंय.मागेही एका पाटलाने उघड्या मोर्चाची भाषा करून हा उद्योग केला होता.आता ठोक मोर्चाची भाषा करून पुन्हा तोच कित्ता गिरवला जातोय.

ठोक मोर्चाची भाषा केल्याने महीला,मुले-मुली,वृद्ध,नोकरदार,पांढरपेशे समाजबांधव मोर्चात सहभागी होणार नाहीत हे स्पष्ट आहे.मग तरीही ठोकची भाषा म्हणजे या महाभागांना मुंबई मोर्चातील गर्दीला नियंत्रीत करण्याची सुपारी तर मिळाली नसेल ना? त्यातही ठोक मोर्चाची भाषा करणारे अचानक अवतरलेत,त्यामुळे संशय आणखिनच बळावतो.बरं ही ठोकची भाषा करणारांनी यापूर्वी कुठं व किती ठोकाठोकी केली अन् समाजाचं काय काम केलं ते तरी सांगावं.समाजाच्या एका क्रांतीकारी आंदोलनास हानी पोहचवायची भाषा,मुंबई मूक मोर्चा कोणाला विचारून ठरलाय असा मूजोर अविर्भाव महाराजांचा अस्सल वारसदार करूच शकत नाही याबाबत सच्चा शिवप्रेमींना शंका नाही.

या तथाकथित ठोक शहांचा आरक्षण,शेती प्रश्न,अँट्रॉसिटी कायदा,आदी विषयांचा अभ्यास फारच गहण असावा व म्हणूनच ते आत्ता पर्यंत न बोलता मजा पहात असावेत!

Maratha Morcha Bidar Karnataka

Maratha Morcha Bidar Karnataka

ठोकशहा म्हणतात मराठा क्रांती मोर्चात अँट्रॉसिटी मुद्दा काही हरामखोरांनी मुद्दाम आणलाय.या महाशयांना हे माहीत नाही का कोपर्डीतल्या मराठा भगिणीवर अत्याचार करणारांनी या अँट्रॉसिटी कायद्याचं कवच पांघरूनच एवढं धाडस केलंय.या अत्याचारी व खून्यांचेच समर्थन करायचे तर नाही ना बाबा तुला? कोपर्डीतच दुसर्या घटनेत पतीचा खून करणार्या संशयितांनीच मराठा विधवा भगिणीस पुन्हा एकटीला गाठून जिवघेणा हल्ला केला.जिला मारहाण झाली त्या भगिणीसह जाब विचारणार्या 18 मराठा बांधवांवर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.अँट्रॉसिटीच्या समर्थक महाराजा वाचवतो का आमच्या अशा या कायद्याच्या गैरवापराचे बळी ठरलेल्या हजारो बांधवांना या अन्यायातून! अँट्रॉसिटीच्या दलालांना समर्थन देऊन आमच्या माय-भगिणींच्या इज्जतीचे पंचनामे करण्याची भानगड करू नका,नाही तर हा खेळ कधी उलटेल हे कळणार सुद्धा नाही.
ठोक मोर्चाची भाषा करून आम्ही जीवाचा आटापीटा करून काढीत असलेल्या मूक मोर्चात विष कालवण्याचा अधिकार तुम्हाला तरी कोणी दिला? प्रतीमोर्चा वाल्यांची भूमिका आता तुम्ही वठवताय का! हा तर मराठा द्रोह अन् समाजाशी प्रतारणाच आहे ही!

फारच मनगटात जोर असेल तर 9 ऑगस्ट ऐवजी स्वतंत्र ठोक मोर्चा काढावा व आपण व आपल्या समर्थकांची मर्दुमकी दाखवून द्यावी.आयत्या बिळात नागोबा व्हायचे उद्योग थांबवा.ठोक मोर्चाची भाषा करणारांनी नाव,मो.नं व पत्त्यासह यादी सरकारला द्यावी व जाहीरही करावी म्हणजे कळतील तरी समाजातले खरे बहाद्दर!
संख्येच्या ताकदीवर विश्वास असलेल्या तमाम मराठा समाजबांधवांनी 9 ऑगस्टच्या मुंबई मराठा क्रांती मूक मोर्चात मोठ्या संख्येने सामील होऊन समाजातल्या गद्दारांना आपली जागा दाखवावी.

मूक मोर्चास गालबोट लागल्यास त्यास हे तथाकथित ठोकशहा व त्यांचे बगलबच्चे जबाबदार राहतील.तसे मूक मोर्चा आयोजकांचे वतीने पोलीस प्रशासनास लिखीत स्वरूपात कळविणेत येत आहे.
जय मराठा! जय शिवराय!

संजीव भोर पाटील,एक मराठा.

मो.9921381181