मराठा दसरा मेळावा, पुणे

महाराष्ट्रात ५८ मराठा क्रांती मोर्चे संपन्न झाले. “मराठे कधी एकत्र येत नाहीत” हा जो न्युनगंड अनेक वर्षे मराठ्यांच्या मनात घर करुन बसला होता त्याला छेद देण्याचे काम मराठा क्रांती मोर्चांनी केले. मोर्चांमधुन श्रीमंत-गरीब, राजकारणी-समाजकारणी, आबालवृद्ध, पुरुष-स्त्रीया, शहरी-ग्रामीण, बहुभाषिक मराठे सर्व भेद विसरुन एकत्र यायला लागले. इतके की त्यांच्या एकत्र येण्याने गर्दीचे सगळे विक्रम मोडीत निघाले. मोर्चासाठी एवढ्या संख्येने समाजाला एकत्र आणणे, मोर्चा यशस्वी करणे आणि मोर्चातुन शिस्त, संयम, स्वच्छतेचा आदर्श उभा करणे या गोष्टी कितीही आदर्शवत वाटत असल्या तरी व्यावहारिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करणं हे कुठल्याही पक्ष, संघटना किंवा व्यक्तीला अशक्यप्राय आहेत. परंतु मराठा क्रांती मोर्चात ही अशक्यप्राय गोष्ट घडली आणि त्यासाठी प्रामाणिक कष्ट होते ते मराठासेवकांचे !

कोण होते हे मराठासेवक ?

maratha sevak

maratha sevak

“माझ्या समाजाचं काम आहे आणि मला त्याच्यासाठी काम करायचे आहे” हे ब्रीदवाक्य समजुन त्याच एका समान धाग्यासाठी आपले पक्ष, संघटना, विचारधारा किंवा प्रादेशिक अस्मिता बाजुला ठेवुन एकत्र आलेला मराठा म्हणजे मराठासेवक. आपली जबाबदारी ओळखुन निस्वार्थपणे समाजाच्या कामासाठी झटणारा प्रत्येकजण मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चात अंगावर पडलेलं कोणतंही काम ज्यांनी मार्गी लावले ते मराठासेवक. आपल्या लेखणीतुन, वाणीतुन, कलेतुन, कृतीतुन जिथं शक्य असेल तिथं प्रचार प्रसार करुन आपल्या लोकांना मोर्चासाठी एकत्र आणणारे ते मराठासेवक.

maratha morcha kolhapur t-shirt

maratha morcha kolhapur t-shirt

मोर्चात शिस्त संयम रहावा, कुठलाही अनुचित प्रकार घडु नये, मोर्चामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मोर्चा संपन्न होईपर्यंत आपल्या जागेवर ठाम राहणारे आणि मोर्चाच्या मागे चालुन आपल्यामुळे झालेला कचरा उचलुन स्वच्छता ठेवणारे सर्वजण मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चांतुन ज्या आदर्शवादी गोष्टी जगाने पाहिल्या, त्या गोष्टी घडवुन आणण्याच्या मुळाशी होते ते मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चाचा कणा म्हणजे मराठासेवक.

कोणत्याही प्रसिद्धी, फायद्याची अपेक्षा न ठेवता मराठा क्रांती मोर्चांना प्रसिद्ध करणारे हे मराठासेवक कोण होते ? आज कुठे आहेत ? ते काय करतायत ? या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे आजमितीला कुणाला गरजेचं वाटत नसले तरी ते महत्वाचे आहे. मोर्चे संपल्यावर सर्व मराठासेवक विखुरले गेले आहेत. आपापल्या जीवनात व्यस्त झाले आहेत. मोर्चांच्या काळात त्यांच्यात असणारा समन्वय आता कमी झाला आहे.

22054669_1443095292449194_476116047_n

या मराठासेवकांना परत एकत्र आणावे लागेल. त्यांच्यात परत एकदा समन्वय प्रस्थापित करावा लागेल. मराठा क्रांती मोर्चे संपले म्हणुन आपले काम संपले असे नाही. उलट काम करण्यास खुप संधी आहे. समाजाला आऊटपुट देणारे रचनात्मक आणि विधायक काम करुया. आपल्या विखुरलेल्या सर्व मराठासेवकांची मोट बांधुया.

मराठासेवकांना एकत्र आणणारे विचारपीठ म्हणजे मराठा दसरा मेळावा. आता ना कुणी अध्यक्ष ना कुणी नेता असेल. मराठा दसरा मेळाव्यात फक्त एक मराठा लाख मराठा हाच विचार दिसेल. विचारांचं सोनं लुटण्यासाठी सर्व मराठासेवकांनी अवश्य या !

22155077_1443097435782313_798261835_n

३० सप्टेंबर २०१७ सकाळी १०:३० वाजता
स्थळ – समाजभुषण विठ्ठलराव सातव जिम्नॅशियम हॉल, सहकारनगर, पुणे.

जय जिजाऊ जय शिवराय.