दारिद्रय़ाच्या उन्हात मराठा शिजला !

दारिद्रय़ाच्या उन्हात मराठा शिजला !

मुंबईतल्या मराठा समाजाचा दैनिक नवशक्तीचे प्रतिनिधी प्रकाश सावंत यांनी घेतलेला वेध.

 

IMG_3631

 

मरहट्टा. मराठा. लढाऊ, राज्यकर्ती जमात. सर्वांना सोबत नेणारी. स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारी. मोडेन पण वाकणार नाही नि मरेन पण हटणार नाही अशी त्यांची स्वभाव गुणवैशिष्ट्येे. मराठ्यांमध्ये शहाण्णव कुळी, पंचकुळी, सप्तकुळी, देशमुख, पाटील असे नाना घटक. पण एकेकाळचे राजे, सरदार, जहागिरदार, वतनदार, इनामदार नि त्यांच्या वंशजांच्या नशिबी आता दारिद्रय नि निव्वळ मोलमजुरी आलीय….

इ.स.पुर्व काळातील मौर्यवंशापासुन नंतरच्या सातवाहन, क्षत्रप, चालुक्य, यादव वंशातील राजापर्यंत मराठा जातीचे वर्चस्व दिसुन येतेय. ब्रिटिशांची सत्ता येईपर्यंत जवळपास दीडशे वर्षे मराठ्यांनी राज्य केलेय. राज्याबाहेरच्या मराठा कुटुंबियांमध्ये ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, मुधोळचे घोरपडे, इंदुरचे होळकर आणि तंजावरचे भोसले असल्याचे सांगण्यात येतेय. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सैन्यदलात सरसेनापती हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी अतुलनीय शौर्य गाजविलेय. आझाद हिंद सेनेचे जनरल जगन्नाथराव भोसले, बडोदा आर्मीचे जनरल नानासाहेब शिंदे, जनरल एस.पी.टी. थोरात, ब्रिगेडियर अमृतराव मोहिते आदींनी भारतीय लष्करात अपुर्व कामगिरी बजावलीय.

पात्रता व पराक्रम या मापदंडामुळे “मराठा” हा गुणात्मक शब्द बनला. पुढे व्यवसायावरुन जाती पडल्या. मराठा म्हणवुन घेणाऱ्यांमध्ये सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान यावरुन अनेक स्तर निर्माण झाले. शेती कसणाऱ्यांना कुणबी म्हणु लागले. कुठे मराठा कुणबी. कुठे कुणबी मराठा. कुणब्यांमध्ये त्या त्या भागातील रीतीरिवाजाप्रमाणे अनेक प्रकार निर्माण झाले. आजही बहुसंख्य मराठे सहकारात, राजकारणात आणि लष्करी सेवेत अग्रेसर. स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्रावर खऱ्या अर्थाने राज्य केलेय ते राज्यकर्ते म्हणुन मराठ्यांनीच.

 

IMG_3633

 

मुंबईत पंधरा लाख !
मुंबईत जवळपास बारा ते पंधरा लाख मराठे. लालबाग, परेल, वरळी, प्रभादेवी, दादर, वांद्रे, माहीम, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, सायन, चेंबुर, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंडला मोठी लोकवस्ती. याशिवाय, मराठा मंदिर, शिवाजी मंदिर, मुलुंड मराठा मंडळ, मालाड, कांदिवली मराठा मंडळ, तावडे ज्ञाती, परब-प्रभु ज्ञाती मंडळ, सावंत ज्ञाती मंडळ, राजेशिर्के ज्ञाती मंडळ अशा विविध संस्था-संघटना कार्यरत आहेत. समाजबंधुंचा राजकीय कल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यानंतर काहीसा काँग्रेस, भाजप, मनसेकडे.

 

morcha kolhapur

 

महापौर श्रध्दा जाधव, शुभांगी शिर्के, प्रभाकर शिंदे, आशिष शेलार, अशोक सावंत, अजित रावराणे, विद्या चव्हाण, शैलेश परब, बळीराम घाग, सरस्वती भोसले, ज्योती भोसले, मधुकर दळवी, जगदिश सावंत, प्रकाश चाळके, स्नेहलता दळवी असे अंदाजे पंधराच्या आसपास नगरसेवक असल्याचे सांगण्यात येतेय. राज्याचे मंत्री वा आमदार यांच्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या एकुण नगरसेवकांमध्ये मराठा टक्का बेतास बात असल्याचे बोलले जातेय.

राज्य मराठा समन्वय समितीच्या माध्यमातुन मराठ्यांच्या विविध संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न अलीकडेच झाला. मराठा सेवा संघ (पुरुषोत्तम खेडेकर), शिवसंग्राम (विनायक मेटे), भारतीय मराठा महासंघ (किसनराव वरखिंड), अखिल भारतीय मराठा सेवा संघ (विजयसिंह महाडिक), महाराष्ट्रीय मराठा महासंघ (अंकुशराव पाटील), छावा मराठा युवा संघटना (प्रा. देवीदास वडजे), छावा (प्रा. चंद्रकांत भराड), अखिल भारतीय मराठा महासंघ (सुरेश माने), बुलंद छावा (दास शेळके), क्रांती सेना (शालिनीताई पाटील), छावा (नानासाहेब जावळे) अशा जवळपास बारा संघटना कार्यरत आहेत.

राजकारणातील टक्काही उतरणीला !
मुंबईचे महापौर म्हणुन बाबुराव शेटे (१९८०), दत्ताजी नलावडे (१९८६), रा.ता.कदम (१९९५), नंदू साटम (१९९८), दत्ता दळवी (२००५), श्रध्दा जाधव (२०१०) आदींची नावे घेतली जात आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (१९६०), वसंतदादा पाटील (१९७७/८३/८५), शंकरराव चव्हाण (१९७७), बाबासाहेब भोसले (१९८३), शिवाजीराव निलंगेकर पाटील (१९८६), शरद पवार (१९७८/८८/९३/९५) नारायण राणे (१९९९), विलासराव देशमुख (१९९९/२००४), अशोक चव्हाण (२००८) आणि पृथ्वीराज चव्हाण (२०१०). उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आर.आर.पाटील, विजयसिंह मोहिते पाटील.

याशिवाय अण्णासाहेब पाटील, पी.के.सावंत, रामदास कदम, दत्ताजी नलावडे, डॉ.पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शिशिर शिंदे, विनोद तावडे, विनोद घोसाळकर, प्रवीण दरेकर, भाई जगताप, अलका देसाई, विजय सावंत, दीपक सावंत, मधुकर चव्हाण, मधु चव्हाण असे कितीतरी आजी माजी आमदार नि मंत्री. “सोशल इंजिनियरींग”च्या प्रयोगामुळे आता राजकारणातील मराठा टक्काही उतरणीला लागलाय….

निवडक
लंडनचे महापौरपद भुषवुन सदाशिवराव देशमुख यांनी मराठ्यांचा झेंडा डौलाने अटकेपार फडकविलाय. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा अजित निंबाळकर यांनी तर गुजरातच्या मुख्य सचिवपदाची धुरा हिरजराव पाटणकर यांनी भुषविलीय. पोलिस महासंचालकपदाचा बहुमान शिवाजीराव बारावकर यांनी मिळविलाय. स्वामीकार रणजीत देसाई, पानिपतकार विश्वास पाटील, शंकर पाटील, बाबा कदम, डॉ.आ.ह.साळुंखे, सरोजिनी बाबर, डॉ.जयसिंगराव पवार आदींनी साहित्य क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवलीय. सिनेक्षेत्रात दिनकर पाटील, सयाजी शिंदे, शिवाजी साटम, स्मिता पाटील आदींनी चमक दाखवलीय.

गावाकडची शेती खुंटली !
मुलुखगिरी, स्वाऱ्या करण्याचे मराठ्यांचे दिवस केव्हाच इतिहासजमा झालेत. इनामे खालसा झालीत. सरंजामशाही, राजेशाही नष्ट झाली. शेती कुळ कायद्यात गेली. उरलेल्या शेतीची वाटणी होऊन तुकडे तुकडे झालेत. पाण्याअभावी ठिकठिकाणची शेती ओसाड पडलीय. परिणामी काही अल्पभुधारक तर काही भुमीहीन झालेत. अपुऱ्या शेतीवर पोट भरता येत नाही. त्यामुळे अनेकांचे उपजिविकेचे साधनच हरपलेय. गावात घरोघरी अठराविश्व दारिद्रय. काहींची घरे कुलुपबंद. काहींच्या घरात केवळ म्हातारीकोतारी मंडळी. निव्वळ पेन्शनवर वा मनीऑर्डरवर कसेबसे दिवस ढकलणारी….

 

Farmrer Indian

 

शहरी दारिद्रय
काही मराठ्यांनी लष्करात सेवा पत्करली तर उर्वरितांनी पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेतली. शहराकडे धाव घेणारे “बैठकीच्या खोल्यां”मध्ये “बॅचलर” म्हणुन राहु लागले. माथाडी म्हणुन राब राब राबु लागले. कुणी गिरण्या गाठुन पडेल ते काम केले. शिक्षणाअभावी कुणी भाजीपाला विक्रेत्याची भुमिका वठवली. कुणावर शिपाई होण्याची तर कुणावर वॉचमन होण्याची पाळी ओढवलीय. ज्यांनी एकेकाळी झोपडपट्टया पाहुन नाके मुरडली, त्याच मराठ्यांवर आता झोपडपट्टयांमध्ये मोठ्या संख्येने राहण्याची पाळी ओढवलीय. अनेक जण तर त्याही पलिकडे म्हणजे विस्तारित मुंबईबाहेर फेकले गेलेत. ठेचकाळत, धडपडत शिकुन सवरुन मोठी झालेली थोडीबहुत मुलेच चांगल्या हुद्यावर गेलीत. कुणी मिळेल ती चाकरी करतेय. पण, बहुसंख्य मध्यमवर्गीय मराठ्यांची मुले नोकऱ्यांसाठी वणवण भटकताहेत. घरात दोन वेळचे पोटात ढकलल्यानंतर कुणी नैराश्याने नाक्यावर उभे राहतेय. कुणी पत्ते कुटतेय. कुणी कॅरम खेळतेय. कुणी भाई होतेय. ना वास्तवाचे भान ना भविष्याची चिंता.. असाच त्यांचा जीवनाचा अक्षरशः “टाइमपास” सुरुय….

 

morcha maratha

 

आरक्षण हवेय !
मुठभर पुढारी सोडल्यास जवळपास नव्वद टक्के मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा दारिद्रयाचे दशावतार भोगतोय. शिक्षणाअभावी नोकरीतील प्रमाण अडीच ते तीन टक्केच आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला. आर्थिकदृष्टया खचलेला. म्हणुनच राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुर संस्थानच्या जाहीरनाम्यात २६ जुलै १९०२ रोजी प्रशासनातील नोकऱ्यात ५० टक्के आरक्षण दिले गेले व त्यात मराठा जात सामील होती. १९५६ मध्ये नेमलेल्या कालेलकर आयोगाने मराठा जातीचा समावेश इतर मागासलेल्या समाजामध्ये केलाय. आता कुणबी मराठा, मराठा कुणब्यांना ओबीसीच्या आरक्षणाची कवाडे उघडण्यात आलीत. त्यामुळे आता हिंदु-मराठ्यांचाही समावेश ओबीसींमध्ये करा किंवा मराठयांसाठी स्वतंत्र आरक्षण द्या, मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि नोकऱ्यांत आरक्षण द्या अशी मागणी जोर धरतेय. दिल्लीचे तख्त राखणारा, देशगौरवासाठी झिजणारा नि निढळाच्या घामाने भिजणारा मराठा आता अक्षरशः दारिद्रय़ाच्या उन्हात शिजतोय…. हा विस्कटलेला नि फुटीने ग्रासलेला समाज एकत्र येईल तेव्हाच प्रगतीचे शिखर गाठेल, हे नक्की !

maratha-kranti-morcha-hyderabad

हैदराबादला मराठा मोर्चा- हजारो उतरले रस्त्यावर

हैदराबाद- कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारासंदर्भात हैदराबाद येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीच्या निमित्ताने रविवारी संध्याकाळी मेणबत्ती पेटवून शांततेच्या मागार्ने निषेध नोंदविला. यावेळी विविध राज्यांतून आलेले हजारो युवक या मोर्चात सहभागी झाले. 
कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशा विविध मागण्यांसाठी राज्यात काढण्यात येत असलेल्या मोर्चाची ठिणगी आता हैदराबादपर्यंत जाऊन पोचली आहे.
 
गेल्या महिनाभरापासून मराठा मोर्चाचे सत्र सुरू असून लाखोंच्या संख्येत मराठा समाज त्यात सहभागी होत आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय सूत्रेदेखील झपाट्याने हालू लागली आहेत. याच मोर्चांची प्रेरणा घेत कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करावी या प्रमुख मागणीसाठी हा हैदराबादमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यात हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रासोबत देशभरातील विविध राज्यांतून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या विरोधात हैदराबाद शहरातील तरुण आणि स्वामी विवेकानंद युथ असोसिएशन या सामाजिक संघटनांच्या वतीने या मोचाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये हैदराबाद शहरातील संघटनेचे युवा अध्यक्ष वेलाला राममोहन व हरी बाबू उपस्थित होते. तर मोर्च्याच्या आयोजनात सागर मालपुरे, सुशांत पवार, कल्पेश कोतकर, विनोद देवरे, मनोज पाटील या राज्यातील विद्यार्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
देशातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून सतत बलात्कारासारख्या घटना होत आहेत. त्यामुळे देशात महिला, मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात १३ जुलै रोजी अहमदनगरमधील कोपर्डी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे दिल्ली येथे घडलेल्या निर्भया हत्याकांडाची पुर्नरावृत्ती झाली. मात्र त्यातील आरोपींना अद्याप कोणतीही शिक्षा झालेली नाही. या नराधमांना कठोर फाशीची शिक्षा व्हायला हवी. त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि पुन्हा असा प्रसंग देशभरात कुठेही घडू म्हणून आम्ही या मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती सागर मालपुरे यांनी दिली.
 
पंधरा दिवस केले नियोजन
आंदोलन करण्यासाठी विविध परवानग्या घेणे आवश्यक असते. त्यात आम्ही सर्व विद्यार्थी परराज्यात हे आंदोलन करणार होतो. त्यामुळे आंदोलना दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी आम्ही विशेष काळजी घेतली होती. त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी आम्ही 15 दिवस आधीपासूनच तयारी केली होती. स्थानिक संघटनांने मदत केल्याने मोर्चा सुरळीत पार पडला, असे नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
originally published by esakal.com
maratha-kranti-morcha-satara

मराठा क्रांती मोर्चा एक पत्रकार के नजर से

मराठा क्रांती मोर्चा के बारें में विनोद जगदाले news24 के वरिष्ठ पत्रकार ने अपने अनुभव और विचार साझा किये है..

दोस्तों..
सातारा-पुणे हाईवे से गुजरते समय आपसे कुछ बातें शेयर कर रहा हूं, जरा ध्यान दीजिएगा। बता दूं कि मराठा क्रांति मोर्चा की कवरेज के लिए मैं दो दिन सातारा में था, इससे पहले नवी मुंबई में मराठा क्रांति मोर्चा का कवरेज किया था। सातारा के मोर्चे में एक बात मुख्य रूप से उजागर हुई कि आरक्षण को लेकर मराठा समाज की महिलाएं काफी बड़ी तादात में आज भी इस मोर्चे में शामिल हुईं।
पहले तो 2 किलोमीटर मैं खुद मोर्चे के साथ चला। फिर सोचा कि चलो मोर्चे में शामिल वकील और डॉक्टर्स का क्या कहना है देखते हैं, मोर्चे के स्टार्टिंग पॉइंट से मैं चल रहा था कि राधिका रोड पर मोर्चा आते ही मैं वहां रुक गया और सोचा कि कुछ ही देर में महिलाओं का मोर्चा आगे बढ़ेगा तो उनके पीछे चले आ रहे पुरुषों (डॉक्टर और वकील) से बात कर लूंगा, लेकिन मेरा वह कयास जल्द झूठा साबित हो गया। 2 घंटे 3 मिनट बाद महिलाओं का मोर्चा समाप्त हुआ और फिर मैंने दूसरे लोगों से बात की…। कहने की बात यह है कि अब तक जितने भी जिलों में मराठा मोर्चे हुए हैं, उनमें रिकॉर्ड तोड़ भीड़ इसी मोर्चे में देखी गई। वह भी शायद इसलिए कि यह मोर्चा मराठा साम्राज्य की राजधानी में हो रहा था। वैसे लोगों को लग रहा होगा कि मैं इस मोर्चे की तारीफ कर रहा हूं, लेकिन ऐसा जरा भी नहीं है। मैंने तो बस सच्चाई ही बयां की है।

दोस्तों ध्यान रहे कि मेरे इस पोस्ट को जो लोग मेरी जाति से जोड़कर देखेंगे, उन महानुभावों को बता दूं कि पत्रकार की कोई जाति नहीं होती। हमारा काम सिर्फ लाखों लोगों की बात को जन-जन में पहुँचाना होता है। मोर्चे से एक दिन पहले ही कई युवा मोटर साइकिल पर मोर्चे के लिए माहौल बना रहे थे। उसी रात 11:30 मिनट पर, 8 से 13 साल के 15-20 बच्चों ने साइकिल रैली निकाली, जहां बच्चे ‘एक मराठा एक लाख मराठा के बराबर’ नारा देते हुए सातारा की गलियों में घूम रहे थे। समझ में नहीं आता कि जिसमें बच्चों से लेकर महिलाओं तक का बड़ा हुजूम शामिल है और जो मोर्चा दिन प्रतिदिन बड़ा रूप लेता जा रहा है, आखिर मराठाओं के इस अभियान पर सरकार अब तक चुप क्यों बैठी है और कोई कदम क्यों नहीं उठा रही है।

बहरहाल, आज के मराठा साम्राज्य की राजधानी सातारा में हुए मराठा क्रांति मोर्चे से आभास रहा है कि मराठाओं ने अपने साम्राज्य की राजधानी को जीत लिया, अब उनका अगला मुकाम देश की आर्थिक राजधानी मायानगरी मुंबई को अपनी ताकत दिखाने का है!

जय हिंद, जय महाराष्ट्र…

अवघे सातारा झाले मराठामय – राजधानी साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

सातारा – दिनांक 3 ऑक्टोबर

मराठा समाज्याच्या प्रमुख मागण्यांसाठी गेले अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला साताऱ्यातील मराठा क्रांती मूक मोर्चा आज मराठयांच्या उस्फुर्त प्रतिसादाने पार पडला. सकाळी 11 वाजता शहरातील छत्रपती शाहू स्टेडियम पासून मोर्चाला सुरवात झाली. साताऱ्यातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी राज्याच्या सर्व भागांमधून लोक मोठ्या संख्येने काल रात्रीपासूनच साताऱ्यात येण्यास सुरवात झाली होती. मोर्च्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील लोकांनी घराला टाळे लावून संपूर्ण कुटुंबासह राजधानी साताऱ्यात आली होती.

हातामध्ये भगवे झेंडे, डोक्यावर भगवे फेटे, छातीवर छत्रपती शिवाजी माहाराज्यांचे बिल्ले असणारे मावळे लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. महिलांचा सहभागही लक्षणीय होता तर युवतींनी बाईकरॅली द्वारे आपला सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा भगिनींनी मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर मोर्च्याची सांगता करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देताना मराठा भगिनी

जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देताना मराठा भगिनी

मराठा क्रांती मोर्चा सातारा - ड्रोन फोटो

मराठा क्रांती मोर्चा सातारा – ड्रोन फोटो

कोण आहे मराठा मोर्चाच्या मागे ? शरद पवार की मराठा संघटना ? आरएसएस की पुरोगामी ? पुतिन आहे की ओबामा ? की ही ट्रम्पचीच चाल आहे ? – चंद्रकांत पाटील. 

खारघर, नवी मुंबई दिनांक- १ आॅक्टोबर २०१६

काही म्हणा, मराठा क्रांती मोर्चांमुळे राज्यात मोठी सामाजिक घुसळण सुरु झालीय. सगळ्यांनाच जाग आलीय. भल्याभल्यांना मराठा मोर्चाचा मोह आवरता आला नाही. साहजिकच मी आणि माझे कुटुंबियदेखील त्याला अपवाद नव्हतो. आम्ही जातीनं नवी मुंबईतल्या खारघरच्या मोर्चात सहभागी झालो होतो. मुळात नावातच पाटील असल्यामुळे जात लपवायचाही प्रश्न नव्हता. अनेकांच्या आडनावातला अनेकदा गुंता सुटत नाही. तोही प्रश्न माझ्यासाठी नव्हता. आणि तसं चोरून ठेवण्यासारखं काही उरलंच नाही. पण असो…
मला अजून एक समजलं नाही, की आतापर्यंत विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात शेकडो जातींचे मोर्चे आले आणि गेले; पण कधी कोणाला मराठा मोर्चासारखी चर्चा करावी वाटलं नाही. खरं तर, मराठा जातीचा मोर्चा ही आता काहींची पोटदुखी झालीय तर, काहींना शांत राहून दोन जातीतल्या संघर्षातली गंमत बघताना गुदगुल्या होत आहेत. मोर्चातील शिस्त, आचारसंहिता, लाखांची संख्या यासारख्या गोष्टींचे देशभरात कौतुक होत आहे. मराठा मोर्चाला काही ठिकाणी ब्राम्हण, मुस्लिम, जैन समाजातील अनेक संघटनांनी उघडपणे पाठींबा दिला. तर दलित, ओबिसी, समाजातील काही संघटनांनी त्याला विरोध दर्शविला, हे पण जगजाहीर आहे.

अनेक ग्रुपवर चर्चा, वाद, विवाद, धमकीवजा इशारे, टोमणे, टीका-टिपणी यासारख्या गोष्टींचा बाजार फुललाय. काही जण जणू आपणच जातीअंताचे ठेकेदार असल्याचा आव आणून दुसऱ्याकडे संशयी नजरेने पहायला लागलेत. काही जण मराठ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायला लागलेत. त्यामुळे मराठा जातीचे पत्रकारदेखील मोर्चाच्या बातम्यां पोस्ट टाकताना विचार करू लागलेत. साधी गोष्ट आहे व्हाट्स अॅप ग्रुपवर हजारो बातम्या शेअर केल्या जातात. कोणी प्रेसनोट टाकतो तर कोणी पीसीची इन्फो टाकतो. कोणी फाॅरवर्डेड म्हणतो तर कोणी प्लिज चेक म्हणतो. पण या मराठा क्रांती मुक मोर्चाच्या बातम्याच शेअर झाल्या नाही. मराठा जातीचेच नव्हे तर काही अपवाद वगळता इतर कोणत्याही पत्रकाराने देखील मोर्चाची बातमीच पत्रकारांच्या ग्रुपवर शेअर केली नाही. इथूनच जातीची खरी ओळख सुरू झाली….

दोन ओळीची बातमी लिहायची नाही आणि पत्रकारांनी कसं फेअर जर्नालिझम केलं पाहिजे याची अक्कल शिकवायची. जर आपण एवढं निरपेक्ष आहोत असं ज्यांना वाटतं त्यांना का नाही वाटलं की लाखाच्या संख्येने एवढे मोर्चे निघत आहेत. ते कशासाठी निघत आहेत ? त्याच्या मुळाशी जावं असं कधी का नाही वाटलं? कोण आहे या मोर्चाच्या मागे ? शरद पवार की मराठा संघटना ? आरएसएस की पुरोगामी ? पुतिन आहे की ओबामा ? की ही ट्रम्पचीच चाल आहे ? जेणेकरुन ‘अमेरिकन मराठे’ त्याला मतं देतील. अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. पण काठावरूनच हुशारी दाखवायची. प्रश्नाच्या मुळाशी जायचं नाही आणि उगाच आपल्या मुळावर उठलेत अशी बोंब ठोकायची हे बरं नाही. या मोर्चाच्या मागण्या काय आहेत ? त्याचं निवेदन किती पत्रकारांनी वाचलं ? कोणी तरी पोस्ट टाकतो त्याच्यावरूर लगेच आपल्या सोयीची असेल तर एका जातीच्या “अंगठ्यानी” लाईक करायचं. मग लगेच तिकडून दुसऱ्या जातीची कमेंट. मग सुरू होतं ते नेहमीचं…

खरं तर, या मोर्चाची सुरूवात कशी झाली एवढंच सांगता येईल. पण पुढे आता तो कुणाच्या हातात देखील राहिलेला नाही, हेही तितकंच खरं… तरीही काहीजण अकलेचे तारे तोडतात हे वाईट. विशेषतः इंग्रजी माध्यमांतून येणाऱ्या बातम्या ज्या लोकांचा मोर्चाशी संबध नाही अशां लोकांची मतं घेवून छापण्यात येत आहेत. मोर्चाला दलितविरोधी ठरवण्याचा विनाकारण प्रयत्न करत आहेत. त्यातल्या त्यात मराठा मोर्चांमागे हे शरद पवार, सहकार कायद्याची कडक अमंलबजावणी, ब्राम्हण मुख्यमंत्री, यासारख्या कथित गोष्टींचा वापर करून बातम्यांची पेरणी पद्धशीरपणे सुरू झाली. कधीकधी हसू येतं या बातम्यांचं. बातम्या देणारी “बांडगुळं” कोण आहेत, हे पत्रकारितेत असल्यामुळे सहज कळतं.

पण असो… जसजशी मोर्चाची व्याप्ती वाढत गेली तसतशी मोर्चांबद्दल मनातल्या मनात  तिरस्कार कऱणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. ॲट्राॅसिटीच्या मुद्यामुळे दलित समाज दुखावला गेला तर आरक्षणाच्या मागणीमुळे  ओबीसी दुखावले. खरं तर, या मोर्चांमुळे आता सर्व जातींना जाग आली. त्यांनाही आपले प्रश्न आता कळायला लागले आहेत. ही बाब निरोगी समाजासाठी पोषक मानली पाहिजे. पण कुणाची पोटदुखी वाढली असेल तर त्याला इलाज नाही. मराठा हा बहुजन समाजात मोठा भाऊ मानला जातो. कदाचित त्यामुळेच मराठा मोर्चांची काॅपी करू लागले. असं आपल्या कुटूंबातही होतं. मोठ्याचं अनुकरण केल्याने काही बिघडणार नाही. ज्या मोर्चाची आचारसंहिता हे या मोर्चाचं गमक आहे. तरीसुद्धा उगाच आपली अक्कल पाजळाची. याच्या मागे कोण ? असा संभ्रम निर्माण करायचा. समजा शरद पवार असतील तर तुमच्या बापाचं काय जातं…. शरद पवारांनी जातीसाठी केलं म्हणून त्यांना जातीयवाद म्हणा आणि त्यांना राजकारणातून हद्दपार करा. ज्यांना जात नाही अशांना सत्तेवर आणा. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये काहीही फरक पडणार नाही. मुळात बहुतांशी मराठा हा शेतकरी आहे. प्रश्न हे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. पण बदलत्या परिस्थितीत या तिन्ही गोष्टींमध्ये जात आडवी येत असल्यामुळे मराठा समाजाला ती त्याच्या प्रगतीतला अडथळा वाटत आहे. मराठा समाजातील नव्या पिढीच्या मनात याचीच खदखद दिसून येते. मोर्चातल्या त्यांच्या  प्रचंड सहभागावरून हेच दिसून येते.

महागाई वाढली तर जातींचे मोर्चे निघतील का? जेव्हा जातीशी निगडित प्रश्न अाहेत तिथं जात कशी बाजूला जाईल? या मोर्चांची ताकद दिवसेंदिवस वाढण्यास सरकारच जबाबदार आहे. त्यासाठी गेल्या  पावसाळी अधिवेशनातल्या सगळ्या घडामोडी तपासल्या की सहज लक्षात येईल. तात्पुरती मलमपट्टी आणि सत्तेच्या बळावर आवाज दाबला कि असचं होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची भाषा खूपच बदलली. ते अपेक्षितच आहे. अधिवेशन काळात जोरजोरात आरडाओरड करताना ते दिसायचे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांची कशी जिरवली अशा अविर्भावात वावरणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आवाज मराठा मोर्चानंतर थोडासा क्षीण होताना दिसतोय. मोर्चांवर तोडगा निघाला की ते पुन्हा चढ्या आवाजात बोलतीलही. ते महत्वाचे नाही. पण आता नव्याने सोशल मिडियावर ब्राम्हणांच्या हातूनच मराठ्यांना आरक्षण मिळणार असे मेसेज फिरवून खिजवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. पण हे काही नवीन नाही. छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज आणि आतापर्यंत ब्राम्हणांच्या हातूनच सगळ्या गोष्टी घडल्या. लोकशाहीच्या देशात मुख्यमंत्री हे घटनात्मक पद आहे, ते कोण्या एका जातीचे नाही. पण तरीही कुणाला वाटत असेल तर त्याला कोणाची हरकत नाही. कारण हा वाद जुनाच आहे, तो अनेकजण सोयीनुसार वापरतात. उदा. प्रादेशिक वादावर बोलताना पश्चिम महाराष्ट्रावर टिका करायची आणि विदर्भातील किती मुख्यमंत्री आणि किती काळ होते याची चर्चा करायची. मराठ्यांना आरक्षण पाहिजे म्हटलं की मग मराठा जातीचे किती मुख्यमंत्री झाले हे सांगायचं हे बरं नाही, असो.

मुद्दा हा मराठ्यांच्या मागण्यांचा आहे. त्या समजावून घेतल्या पाहिजेत. मुळात हे मोर्चे लाखोंच्या संख्येने आणि संघटितपणे होण्याला एक पार्श्वभूमी आहे. याच वर्षी १४ जुलैला कोल्हापूरला “मराठा गोलमेज परिषद” आयोजित करण्यात आली होती. मराठा समाजातील सामाजिक, सांस्कृतिक सुधारणा, आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षण, प्रत्येक जिल्ह्यात मराठा भवन, मराठ्यांचा इतिहास,  हुंडाबंदी, अंद्धश्रद्धा, व्यवसाय यासारख्या १८ ठरावांवर चर्चा झाली. त्यातच ३ आॅगस्टला मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. परिषदेतच संध्याकाळी अचानक एक धक्कादायक बातमी नगरच्या काही प्रतिनिधींना समजली. ती म्हणजे, आदल्या दिवशी १३ जुलैला रात्री कोपर्डीत एका चिमुरडीचा बलात्कार करून खून झाला. त्यामुळे नगरचे प्रतिनिधी संजीव भोर, अवधूत पवार, सोमनाथ कराळे तातडीने नगरला रवाना झाले.

या घटनेतील गांभीर्य पालकमंत्री राम शिदेंना पण आलं नव्हतं. त्यामुळं १५ जुलैनंतर समाज रस्त्यावर उतरला. या घटनेतले गांभिर्य वाढत गेले. त्याचवेळी  अॅट्राॅसिटीचा मुद्दा पुढे आला. तरीही काहीजण याबाबतची थेअरी मांडत बसले. अॅट्राॅसिटीचा आणि बलात्काराचा काय सबंध ? यावर चर्चा रंगवल्या गेल्या. पण कुणीही त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला नाही. दलित विरूद्ध मराठा यातच सगळेजण मग्न झाले…..

त्या बातमीची तिव्रता १७-१८ तारखेनंतर वाढत गेली. अधिवेशनात ज्यावेळी विखे-पाटलांनी हा प्रश्न मांडला त्याचवेळी मोठा हंगामा झाला. मुख्यमंत्री अधिक गृहमंत्र्यांनी म्हणजे फडणवीसांनी एकदम कडक उत्तर देवून विरोधकांची कशी जिरवली, यात धन्यता मानली. दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक झाले. पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांनी या घटनेचे गांभिर्य सांगूनही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे कोपर्डीच्या चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायची वेळ आली होती. एकीकडे विरोधक चर्चा करण्यासाठी आग्रही होते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असे म्हणत होते, पण अध्यक्षांनी चर्चेस नकार दिला. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. पण नंतर सगळी सारवासारव झाली आणि सगळेच दुसऱ्या विषयात मग्न… खरं तर, आपणही या मोर्चात सगळं विसरून गेलो आहोत.

मुळात कोपर्डीचा उद्रेक सरकारने गांभिर्याने घेतला नाही. अधिवेशनात समाधानकारक उत्तर मिळालं नाही म्हणून अहमदनगरच्या कर्जतमध्ये मोर्चा निघाला. दरम्यान विविध मराठा संघटनांनी मुंबईत मोर्चा काढण्याची परवानगी मागितली पण सरकारने ती नाकारली. त्यानंतर कोल्हापूरचे इंद्रजित सावंत, नितेश राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेवून ही बाब सांगितली होती. पण त्याची दखल फारशी कुणी घेतली नाही. त्यावेळीही आंदोलकांची मागणी बलात्काऱ्यांना फाशी आणि ॲट्राॅसिटीच्या गैरवापराविरूद्ध होती. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचीही मागणी होती. त्यात कसलीही लपवाछपवी असायचं कारणच नाही.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची जात आणि त्याच्याशी संबंधित ॲट्राॅसिटीची धमकी यावर स्थानिक लोकांनी आवाज उठवल्यानंतर हे प्रकरण वाढत गेलं. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना कोपर्डीला येण्यास मराठा समाजातील काही तरूणांनी विरोध केला. पोलिसांनीसुद्धा  लगेच दलित नेत्यांनी कोपर्डीला जाऊ नये, असा नियम केला. मग खऱ्या अर्थानं सुरू झालं राजकारण आणि काही माध्यमांचं  ‘दळण’.

शरद पवारांचं आणि राज ठाकरे याचं ॲट्राॅसिटीबद्दलचं वक्तव्य. त्यापाठोपाठ उदयनराजे भोसले उतरले. मग अजूनच मज्जा. अक्षरश: खिस पाडला सगळ्यांनी. ज्याच्यां त्याच्यां मनात अनेक दिवसांपासून ॲट्राॅसिटीबद्दल साचलेलं पित्त ते भडाभडा बाहेर पडलं. निमित्त मात्र पवार, ठाकरे, भोसले यांचं झालं. त्यात प्रतिमोर्चाचा मुद्दा मिळाला. पण कोपर्डीप्रकरणी सामाजिक तेढ निर्माण होऊ नये त्यामुळे प्रतिमोर्चे काढू नयेत अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यानंतर कुठे थोडा तणाव कमी झाला.

या घडामोडी सुरू असताना ९ आॅगस्टला औरंगाबाद इथं मराठा क्रांती मूक मोर्चा झाला. विविध १२-१३ मराठा संघटना एकत्र आल्या. सर्व मतभेद बाजूला ठेवून त्यांनी आधी स्वत:ला आचारसंहिता लागू केली आणि नंतर दुसऱ्यांना सांगितली. त्यांच्या आदर्श संहितेचं दर्शन सगळ्या जगाला पहायला मिळतंय. तो मोर्चा मूक होता पण धडकी भरवणारा होता. अनेकांची झोप उडवणारा होता. तरीही मुद्दामहून त्या मोर्चाची दखल घेतली गेली नाही. तरीही काही पेपरमध्ये मोर्चाची बातमी सिंगल काॅलम आणि पवार-भोसले-ठाकरेंची ॲट्राॅसिटी बातमी हाप पेज… दोन पॉवरफुल मराठ्यांसह एक सीकेपी आयता मिळाला…छाप की छाप !! मराठा विरूद्ध दलित आयती संधी सोडायची कशाला? पण सोशल मिडियाची कमाल इतकी कि मराठ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना भिकच घातली नाही. तिथूनच खऱ्या अर्थानं टिव्ही चॅनल्सची आणि पेपरवाल्यांची गोची सुरू झाली.

पाच लाखांचा मोर्चा काढूनदेखील माध्यमांनी आपली दखल घेतली नसल्याची खंत मराठ्यांनी मनात ठेवली. मराठा तरूणांनी सोशल मिडिया हाच आपला मिडिया मानून आतापर्यंत मोर्चा पुढे नेला आहे. आणि इथूनच माध्यमांची खरी फरफट सुरू झाली. आता कोणी हाप पेज छापतोय तर कोणी फुल पेज… अनेकांनी आता आपला पेपरच मराठ्यांच्या चरणी अर्पण केलाय. अमूक एका मोर्चाची बातमी तुम्ही छापली नाही म्हणून आम्ही तुमचा पेपर बंद करतो. अशी एक पोस्ट पडली की लगेच सगळे टरकतात. टिव्ही चॅनल्सचीसुद्धा स्थिती त्यापेक्षा काही वेगळी नाही.

मराठा मोर्चा हा शिस्तबद्धपणे आणि शांततेत निघतो, याबद्दल मुख्यमंत्र्यांसह सगळेच राजकारणी कौतुकाच्या बाता मारतात आणि मूळ मुद्याला बगल देतात. हा चालूपणाच आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत म्हणायचं. पण चर्चा कोणाशी करणार हे नाही सांगायचं. लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मोर्चाला चेहराच नाही, हे ठाऊक असतानासुद्धा मंत्री गट प्रत्येक जिल्ह्यातील आयोजकांशी जाऊन चर्चा करेल, असं चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केलं.  मुळात मराठा मोर्चाची आचारसंहिता सर्वजण काटेकोरपणे पाळतात. त्यामध्ये कोणी नेता नाही की पदाधिकारी नाही. त्यामुळे सरकार कुणाशी चर्चा करणार? असा प्रश्न निर्माण होतो. याआधी “चर्चा कसली करता निर्णय घ्या” असा मेसेज मराठा मोर्चात फिरलेला आहे. त्यामुळे कोणीही मराठा आता सरकारबरोबर चर्चेला जाण्याचं धाडस करणार नाही. संघटनेवालेही नाही आणि राजकारणी तर नाहीच नाही.

सरकारला वाटतं तितकं आता हे प्रकरण सोपं राहिलेलं नाही. मोर्चामागे पवारांचा हात आहे, सामनामधलं कार्टून, साखर सम्राट, शिक्षण सम्राट, मोर्चेकऱ्यांचे कौतुक, मुख्यमंत्र्यांचं भावनिक भाषण हे काही मराठ्यांच्या मागण्यांचं उत्तर राहिलेलं नाही. केवळ कृती हेच उत्तर असेल. मराठा क्रांती मोर्चांच्या निवेदनांमधून सगळ्या मागण्या सरकारपर्यंत पोहचलेल्या आहेत. पण मुख्यमंत्री म्हणतात की मागाण्यांमध्ये एकवाक्यता नाही. माझ्यामते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या असतीलही. मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांची यादी बरीच आहे. त्यामुळे मराठा समाजाला अपेक्षित असलेल्या मागण्या सरकारला माहित नाहीत, असं म्हणायचं कारणच नाही.

मराठा समाजाच्या नाकावर टिच्चून ब. म. पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, तो सरकारने मागे घ्यावा ही मागणी आधीचीच आहे. पण त्या मागणीपेक्षा इतर मागण्यांना मुक मोर्चाने महत्व दिले आहे. त्यातील महत्वाच्या मागण्या…
१) कोपर्डी घटनेतील आरोपीवर शिघ्रगतीने आरोपपत्र दाखल करून खटल्याचा निर्णय लावणे;
२) ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर व त्यामुळे मराठा समाजावर होणारा अन्याय अत्याचार;
३) मराठा जातीच्या अर्जदारांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणे;
४) शेतीमालाला हमीभाव मिळणे;
५) छत्रपती शिवरायांचे मुंबईत भव्य स्मारक उभारणे;
६) मराठा समाजासाठी नोकरीत आरक्षण;
७) अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजासाठी सीमित करून योजना राबविणे;
८) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे;
९) जमीन संपादन करून शेतकऱ्यांना भिकेला लावणे बंद करणे;
१०) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी;

या वरील मागण्यांवर सरकारने कोणत्याही तथाकथित मराठा नेत्यांना बोलावून चर्चा करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तसेच सरकारी स्तरावर कमिट्या, सब-कमिट्या नेमून धूळफेक करू नये, अशीच एकमुखी मागणी सोशल मिडियावर झळकत आहे.

गेल्या ३०० वर्षांत प्रथमच मराठा समाज जागा झालेला नाही, तर एकत्र आला आहे. कोणत्याही नेतृत्वाशिवाय आपल्या तीव्र भावना इतक्या संयमी व शिस्तबद्धपणे व्यक्त केल्या जात आहेत. राज्यातच नव्हे तर देशात हे पहिल्यांदाच घडत आहे. नाहीतर सामनातल्या कार्टून सारखा खोडसाळपणा पुन्हा होऊ शकतो. मराठा समाज इतका दिलदार आहे की त्यानं माफही केलं असतं. पण प्रतिष्ठेचा मुद्दा करून संजय राऊत यांनी माफी मागितली नाही. याची सल मराठ्यांच्या मनांत आता कायमची राहिली. त्याची किंमत शिवसेनेला आज ना उद्या मोजावी लागणार यात शंका नाही.

या मोर्चांची दिशा भरकटण्याआधी सरकारने तात्काळ कृती केली पाहिजे. पण चर्चा कुणाशी करायची हा प्रश्न जर सरकारसमोर असेल तर विशेष अधिवेशन बोलवण्याचा पर्यायसुद्धा सरकारकडे आहे. त्यामध्ये या सर्व मागण्या किंवा मुद्द्यांवर सरकारने निर्णय घेऊन ते पत्रकार परिषदेमधे जाहीर करावेत, अशी मराठा मोर्चाची विनंती आहे.

त्याचवेळी ज्या मागण्या सरकारला मान्य करणं शक्य नाही त्यादेखील सरकारने सांगितल्या पाहिजेत. त्यावर काहीच तोडगा काढला नाही तर हे आंदोलन कोणत्या दिशेला जाईल, याची कल्पना सरकारला आहे. मुख्यमंत्री सक्षम असल्यामुळे त्यांना कुणी शिकवण्याची गरजही नाही. त्यामुळे ज्या मागण्या अवाजवी असतील त्या मागे ठेवू शकतात. तसचं ज्या मागण्यांमध्ये कायदेशीर अडथळे आहेत, त्या बाबतही सरकारने स्पष्टता ठेवायला हवी. नाही तर अवघड जागेचं दुखणं होईल. जेवढी पारदर्शकता येईल तेवढं सरकारचं काम सोपं होईल. या मोर्चाचे ‘लक्ष’ निश्चित असल्यामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये मूक मोर्चा विरून जाईल या भ्रमात कुणी राहू नये.

आता सरकारपुढे जो पेच असणार आहे तो मराठा आरक्षण आणि अॅट्राॅसिटीचा. यामधील कायदेशीर बाबी केंद्र सरकार आणि कोर्टाशी संबधित आहेत. आणि त्या मराठा समाजाला माहित नाहीत, असं मानण्याचं कारण नाही. तेवढा हा समाज प्रगल्भ आहे. मुळात त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकार गंभीर आहे की नाही, यासाठी सरकारला विश्वासास पात्र ठरावं लागेल.  मराठा आरक्षण आणि अॅट्राॅसिटीचा विषय सहजासहजी सुटणारा नसला तरी आता सरकारचा इतका अभ्यास झाला आहे की मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पण इतर मागण्यांसाठी सरकार कोणाची वाट पाहतयं हे कळायला पाहिजे. मराठा मोर्चांमुळे राज्यात मोठी सामाजिक घुसळण सुरू झालीय. सगळ्या जाती-धर्माचे लोक आपापल्या मागण्या घेवून रस्त्यावर उतरत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ निघून गेली आहे, हे प्रत्येकाला ठाऊक आहे. म्हणूनच आता कृती करण्याचीच वेळ आली आहे. मोर्चाच्या मागे कोण आहे? याचा शोध घेण्यात खरंच वेळ दवडू नका. कारण या मोर्चांना चेहरा नाही. पण या मोर्चांचा आत्मा मात्र ‘ती’ चिमुरडीच आहे !

बारामतीत मराठा क्रांती मोर्चाचा यल्गार

बारामती — कोपर्डी घटनेचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि मराठा समाजाचे आरक्षण, अशा विविध मागण्यांसाठी आज बारामतीत ‘मराठा क्रांती मूक मोर्चा’चे आयोजन करण्यात आले. इतर मोर्चाप्रमाणे हा मोर्चाही अत्यंत शिस्तबद्ध पार पडला.

maratha-morcha-rally-baramati

maratha-morcha-rally-baramati

सकाळी साडेदहाच्या सुमारास कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून या मोर्चास सुरुवात झाली. सकाळी ६ वाजल्यापासून याठिकाणी युवक, युवती, महिला, लहान मुले व नागरिक मराठा क्रांतीचे झेंडे, टी-शर्ट, टोप्या घालून हजर होते. हा मोर्चा कऱ्हानदी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, गुनवडी चौक, इंदापूर चौक, भिगवण चौक, तीनहत्ती चौक, मार्गे व मिशन हायस्कूलच्या मैदानाकडे निघाला. स्वयंसेवकांनी मानवी साखळी बनवून शिस्तबध्दपणे मोर्चाचे नियोजन केले. तसेच मोर्चा जसजसा पुढे जात होता, तसा रस्त्यावर असलेला कचरा, पाण्याच्या बाटल्या उचलून मोर्चाच्या मार्गावरील साफसफाई यावेळी करण्यात आली. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या चौकात तसेच फलटण रस्ता, भिगवण रस्ता, पाटस रस्ता व नीरा रस्ता या चारही प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

maratha-morcha-baramati-1

लाखो मराठा बांधवांच्‍या गर्दीने धुळेेही झाले भगवे, ऐतिहासिक ठरला मोर्चा

धुळे – सांगलीनंतर आज धुळे शहरात सकल मराठा समाजाच्‍या वतीने विविध मागण्‍यांसाठी मूकमोर्चा काढण्‍यात आला. विविध मागण्‍यांचे फलक, भगवे झेंडे आणि भगव्‍या टोप्‍या परिधान करुन लाखो समाजबांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. सकाळी 9.30 पासून शहरात मराठा समाजबांधव एकत्र यायला सुरुवात झाली, परिसरातील 50 गावातून लोक पायी धुळ्यात दाखल झाले. शिवाय नाशिक आणि जळगाव जिल्‍ह्यातील मराठा बांधवांचीही मोठ्या संख्‍येने या मोर्चात उपस्‍थिती होती.

Maratha Kranti morcha dhule

Maratha Kranti Morcha at Dhule

महाराजांच्‍या पुतळ्याला अभिवादन..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पारोळा रोडवरील पुतळ्याला अभिवादन करून मराठा क्रांती मूक मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरूवात झाली्. त्‍यापूर्वी काही विद्यार्थिनींनी मनोगत व्‍यक्‍त केले. विविध मागण्‍यांच्‍या पाट्या घेऊन युवक युवती मोठ्या संख्‍येने या मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी आठपासूनच देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालय, जळगाव रोड व अग्रसेन महाराज यांच्‍या पुतळ्यापासून मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने मोर्चाच्या मुख्य स्थळी एकत्र आले. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावले होते.

मोर्चात 3500 स्‍वयंसेवक..
तीन ड्रोन कॅमे-यांच्‍या मदतीने या मोर्चाच्‍या प्रत्‍येक हालचालीवर नजर ठेवली गेली. आतापर्यंत राज्‍यभरातील मोर्चामध्‍ये घडलेले शिस्‍तीचे दर्शन धुळ्यातही घडले. 3500 स्‍वयंसेवकांचा या मोर्चात सहभाग होता. मोर्चामुळे आज शहरातील शाळांना सुटी देण्यात आली होती. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लाऊन वाहतूक वळवण्‍यात आली होती.

Maratha Kranti morcha dhule

Maratha Kranti morcha at Dhule

असा होता बंदोबस्‍त- माेर्चाच्या मुख्य बंदाेबस्तासाठी पाेलिस अधीक्षकांसह एक अप्पर पाेलिस अधीक्षक, चार उपविभागीय पाेलिस अधिकारी, 11 पाेलिस निरीक्षक, 45 उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, 900 पाेलिस पुरुष कर्मचारी, 90 महिला पाेलिस कर्मचारी, पाचशे पुरुष हाेमगार्ड, शंभर महिला हाेमगार्ड असे एकूण हजार 650 कर्मचारी प्रत्यक्षात माेर्चाच्या ठिकाणी बंदाेबस्तासाठी तैनात होते. पोलिसांच्या मदतीसाठी माेर्चा अायाेजकांकडून पाच हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात अाली होती. तसेच राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकडीचे दाेन प्लाटून, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचा बंद अाणि दहशतवादविराेधी पथक, बाॅम्बशाेधक पथकातील कर्मचारीही माेर्चाच्या वेळी उपस्थित होते.

– article originally published in divyamarathi.com

maratha-kranti-morcha-pune

पुण्य नगरीत अवतरली मराठेशाही – ऐतिहासिक एल्गार !

आज पुणे मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या माध्यमातून लाखो मराठ्यांनी आपल्या मागण्यांचा पुनर्रउच्चार केला. महिलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा मोर्चाने छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पार्पण करून पुढे कूच केले. कोपर्डी नराधमांना फाशी, मराठा आरक्षण, अट्रोसिटीत बदल, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव आणि इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले. प्रथमच कुठल्याही मोर्च्यासाठी 11 पोलीस आयुक्त आणि 16 सहायक आयुक्तांना तैनात केले होते.

maratha-kranti-morcha-pune-8

 

maratha-kranti-morcha-pune

maratha-kranti-morcha-pune

शहरातील डेक्कन नदीपात्र, अलका चौक, लक्ष्मी रोड, पेठ परिसर हि सर्व ठिकाणे मराठयांनी व भगव्या झेंड्यांनी गजबजून गेले होते. मोर्च्यामध्ये इतर जाती-धर्माचे लोकही सामील झाली होती त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांचा सहभागही दिसून आला.

maratha-kranti-morcha-pune-9

यवतमाळात मराठ्या कुणब्यांचा जनसैलाब तर वाशीम मध्ये मराठ्यांचा मेळा

आज महाराष्ट्रात तीन ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांनी हजेरी लावली. यवतमाळ येथे भर पावसात लाखो मराठा-कुणबी समाज बांधव आज आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी एकत्रित आले. शहरातील पोस्टल ग्राउंड येथून मराठा क्रांती मोर्च्याची सुरवात झाली. तर वाशीम मध्ये सुद्धा पावसातच मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चा पार पाडला.

maratha-kranti-morcha-yavatmal-1

नाशिक: गोदावरीला आला मराठयांचा महापूर

आज नाशिक येथे पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चामुळे  संपूर्ण शहरात मराठा समाज्याच्या महापूर पाहायला मिळाला. माता, भगिनी, मुल बाळ घेवून, आजोबा आज्जी, शेतकरी राजा, तरूण युवक, युवारणरागिणी, नौकरदार वर्ग, नाशिक च्या मराठा क्रांती मुक मोर्चात सहभागी झाली. आजच्या मोर्च्यातही मराठ्यांची शिस्त आणि एकजूट वाखाणण्यासारखी होती.

maratha-morcha-nashik-1

शहरातील गोदावरी नदीवरून मोर्चा मार्गस्त होऊन शेवटी गोल्फ क्लब मैदान येथे सर्व मराठा बांधव एकत्र आले. नंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाज्याच्या मागण्यांचे निवेदन देऊन मोर्च्याची सांगता झाली. इतर मोर्च्यांप्रमाणे आजही मराठा स्व्ययंसेवकांनी मोर्च्या संपल्यानंतर शहराची साफ-सफाई केली.

maratha-morcha-nashik-cleaning-roads