Weapons

शिवकालीन मराठ्यांचे शस्त्र आणि त्याचे शास्त्र

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतंत्र राज्यस्थापना करताना आपल्या स्वराज्यात अनेक मूलभूत आणि महत्वाचे बदल केले.किल्ल्यांची बांधनी,नौसेनेची स्थापना,गनिमी काव्याचा वापर करुन मिळवलेले यश याबरोबर शेतकऱ्यांविषयीचे धोरण,रयतेला दिल्या जाणाऱ्या सवलती या आजही अभ्यास करण्यायोग्य महत्वपूर्ण आहेत.

शिवकाळात महाराजांशी निगडीत काही गोष्टींचे आजही जनसामान्यांना अप्रूप वाटते,जसे शिवरायांनी वापरलेली भवानी तलवार.आणि अफझलखान वधाच्या वेळेस वापरलेले गुप्तशस्त्र (बिचवा,वाघनखे)..!!
शिवरायांनी त्यावेळेस किल्ले,युद्ध करण्याच्या पद्धतीबरोबरच शस्त्रास्त्रांमधेही आमुलाग्र बदल केले.केवळ तलवार,भाले,पट्टा यांपलिकडेही अनेक शस्त्रे मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात वापरले.

शिवकाळात सर्वात जास्त प्रमाणात सुधारना झालेले शस्त्र म्हणजे तलवार.या तलवारी आजही मराठा तलवारी म्हणून प्रसिद्द आहेत.त्यांच्या मुठीवरून मराठ्यांच्या तलवारीचा अंदाज येतो.त्या काळात तलवारी लोखंड आणि पोलादाच्या बनवल्या जात.तसेच पसरट गोलाकार आकाराच्या तलवारी,करवतीपात्याच्या तलवारी,दुधारी तलवारीही बनवल्या जात.शिवकालीन तलवारींच्या मुठी या आजही जगात प्रसिद्द आहेत.मराठा मुठ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मुठी राघुच्या तोंडाच्या आकाराची मुठ,गोलाकार मुठ,घोडमुखी मुठ,दास्तान लावलेली मुठ हे प्रकार प्रचलित आहेत.
शिवरायांनी वापरलेली (भवानी,जगदंबा) तलवार आणि तिचा इतिहास हा आजही फार प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण आहे.
तसेच,मराठ्यांच्या वापरण्यात आलेले तोफा आणि बंदुका यांमधे मराठ्यांच्या निराळेपनाची छाप दिसून येते.शिवरायांच्या नंतर शाहू छत्रपतींच्या काळात आणि त्यानंतर मराठ्यांनी तोफा ओतन्याचे कारखाने चालु केले होते.शिवछत्रपतींनी सुद्धा तोफा ओतन्याचा प्रयत्न पुरंदर किल्ल्यावर केला होता,पण पुढे तो यशस्वी झाला नाही.महाराजांच्या आक्रमक युद्धशैलीत तोफांसारख्या अवजड सामुग्रीची अडचन होतीच. तरीही आरमार आणि किल्ल्यांवर ठेवण्यासाठी महाराजांनी तोफांमधे पाश्चात्यांकडून विकसित तंत्र घेतले.
आरमारी सैन्यात तोफांचे महत्त्व अनन्यसाधारण होते,हे पुढील उदाहराणांवरून दिसून येते.
जेव्हा कान्होजी आंग्रे ताब्यातील परकीय जहाज सोडण्यास तयार असले,तरीही त्यावरील तोफा,बंदुका वापस करण्यात उत्सुक नसत.
मराठ्यांनी वापरलेल्या इतर शस्त्र आणि त्यांच्या सुधारित शास्त्रावर अनेक अभ्यासपूर्ण नोंदी आहेत.
उदा. भाल्यासारखे दोरीने बांधलेले एक हत्यार मराठा योध्यांमधे फार लोकप्रिय होते.विटा असे नाव होते त्या शस्त्राचे..!!जागेवर उभारून लांबवर भाला फेकल्या जाई,आणि पुन्हा दोरीने वापस ओढुन घेतल्या जाई.जागेवर उभारून त्यांचे काम सोपे होत असे.

Maratha Weapon

Maratha Weapons


मराठ्यांनी वापरलेले शस्त्रे आजही आम्हासाठी एका अस्मितेपेक्षा जास्त आहेत.
©आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>