श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेस साई पालखी निवारा, निघोज या ठिकाणी राज्यातील गोरगरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आय. ए. एस. ऍकॅडमी सुरू करण्यासाठी काशिनाथ गोविंद पाटील (रा. कोपरी, ता. वसई, जि. पालघर) यांनी त्यांच्या मालकीच्या एकूण 9 हजार 782.44 चौ.मी. जागा सुमारे 32 कोटी रुपये किमतीच्या बांधीव क्षेत्र असलेल्या दोन इमारती संस्थानला आज देणगीदाखल दिल्याची माहिती संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.

IMG_3363

यावेळी अग्रवाल म्हणाल्या, “”श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेच्या 22 डिसेंबर 2016 रोजी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत काशिनाथ गोविंद पाटील (जि. पालघर) यांचे मौजे निघोज, ता. राहाता येथील गट नं. 177, 178, 282/1, 284 व 288/6 मधील भूखंड क्र. 1 मधील इमारत बी व डी विनामोबदला हस्तांतर करण्यास व या इमारतींमध्ये राज्यातील गोरगरीब, आदिवासी, वंचित, दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तसेच प्रशासकीय सेवेचा लाभ मिळवून देणेकामी निवृत्त राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आय.ए.एस. ऍकॅडमी सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या सभेस संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्‍वस्त सर्वश्री सचिन तांबे, मोहन जयकर, प्रताप भोसले, भाऊसाहेब वाकचौरे, बिपीनदादा कोल्हे, तत्कालीन विश्‍वस्त अनिता जगताप हे उपस्थित होते.

गुरुवारी (दि.11) काशिनाथ गोविंद पाटील यांनी त्यांच्या मालकीची राहाता तालुक्‍यातील निघोज येथील साई पालखी निवारामधील एकूण 9782.44 चौ.मी. इतके क्षेत्रफळ असलेल्या 32 कोटी 27 लाख 13 हजार 500 रुपये किमतीच्या दोन इमारती साईबाबा चरणी दान केल्या असून, सदरचे दानपत्र संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले. यावेळी साईधाम मंदिर ट्रस्ट, विरारचे ट्रस्टी सर्वश्री काशिनाथ गोविंद पाटील, शेखर नाईक, प्रदीप तेंडोलकर, मोहन मुदलियार यांचा कार्यकारी अधिकारी अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदीप आहेर, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, उपकार्यकारी अभियंता आर. बी. आहेर, संस्थान पॅनलवरील वकील ऍड. जे. के. गोंदकर, सल्लागार कृष्णा वालझाडे उपस्थित होते.

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>