कृपया मोर्चामध्ये सामील होण्यासाठी खालील नियम पाळा आणि जगाला मराठ्यांची शिस्त, सामर्थ्य दाखवून द्या.
● हा मूक मोर्चा आहे, मोर्चात चालत असताना एकमेकांशी बोलणार नाही. घोषणा देणार नाही.
●मी मोर्चाचे गांभीर्य राखणार. कोणी घोषणा दिल्यास त्याला तेथेच रोखणार.
●मोर्चाचे अधिकृत बॅनर शिवाय कोणतेही वैयक्तिक/संस्था संघटनांच्या नावाचे बॅनर्स लावणार नाही.
●दररोज ५० मराठ्यापर्यंत ही माहिती पोहचवणार.
●माझा मोर्चा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नाही.मराठ्यांच्या मागण्यांसाठी व आत्मसन्मानासाठी आहे.
●मोर्चात जास्तीत जास्त महिला सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार.
●मोर्चामध्ये मी कुठल्याही पक्षाचा किंवा संस्थेचा नसून फक्त मराठा म्हणूनच येणार.
●मोर्चाच्या दिवशी सकाळी १०.३० वा .कुंटूंबासह मोर्चा मध्ये दाखल होणार.
●मोर्चात स्वयंशिस्त पाळून मराठा समाजाचा सुसंस्कृतपणा दाखविणार. पोलिसांना सहकार्य करणार.
●मोर्चात मी कोणतेही व्यसन करून सहभागी होणार नाही व कोणालाही व्यसन करून देणार नाही.
●महिला,लहान मुले व वृद्धांना सहकार्य करणार, माता भगिनींना पुढे जाऊ देईल.
●मला जिथे जागा मिळेल तिथूनच मी चालेल.मी घाई गडबड करणार नाही.
●मोर्चाला अत्यंत शांततेत येणार व गावाकडे परत शांततेत जाणार.
●कुणालाही माझा त्रास होणार नाही असेच माझे वर्तन राहील.
●मोर्चात झालेला कचरा उचलून कचरा कुंडीत टाकणार,रिकाम्या पाण्याच्या बॉटल,पाऊच आणि पडलेला ग्लास गोळा करण्यासाठी प्रयत्न करणार.
●स्वाभिमान, स्वावलंबन, शिक्षण, सहकार्य व जागृती या पंचसूत्रीचा समाज विकासासाठी अंगीकार करणार.

वस्तू व ऐवज बरोबर आणू नये.
येणाऱ्या वाहनातील सर्वांनी आपला गटप्रमुखाचा मोबाईल नम्बर बरोबर ठेवावा. आवश्यक औषधे बरोबर ठेवावीत.
एक मराठा लाख मराठा!