Chatrapati First Shahu Maharaj

छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या विषयी अभ्यासपुर्ण माहीती

छत्रपती थोरले शाहु महाराज

अजातशत्रु तसेच उत्तम प्रशासक असलेले भरतवर्षसम्राट छत्रपती थोरले शाहू महाराज यांना अनेक छंद होते. यालाच अनुसरून त्यांच्या आत्मजांचा सन्मान, प्राणीदया, वृक्षसंगोपन यासंबंधी काही नोंदी आढळतात यावरून त्यांचा प्रेमळ आणि सहृदय स्वभाव असे वेगळे रूप आपल्या समोर येते..

धाकटया शिवाजीची पत्नी दर्याबाईसाहेब यांना भेटीस बोलवून थोरल्या शाहू महाराजांनी त्यांना अलंकार केले आणि हत्ती देऊन करवीर संभाजी महाराजांबरोबर रवाना केले. येसूबाईसाहेब सरकार यांना आरोग्य लाभावे म्हणून गजदान, अश्वदान इतकेच नव्हे तर म्हशीही दान केल्या होत्या. यावरून छत्रपती थोरले शाहू महाराजांचे कुटुंबवत्सल रूप आपल्यासमोर येते..

Shahu raje

Chatrapati Thorale Shahu I

आपल्या राज्यात उत्तम झाडांची पैदास व्हावी म्हणून थोरले शाहू महाराज दरसाल शिवापुरच्या आंब्याच्या वीस हजार कोया लागवडीसाठी मागवल्या होत्या.त्यापैकी किती झाडे जगली याचा हिशोब खेड्यापाड्यातील पाटलांकडून थोरले शाहू महाराज मागवत असत व त्यांना झाडे जगवण्याबद्दल ताकीद असे. रामचंद्र अमात्यकृत्य आज्ञापत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची वृक्षांबद्दल जी नोंद आहे हे या प्रकर्षाने आपल्याला आठवते..

छत्रपती थोरले शाहू महाराज यांना कुत्रे पाळण्याचा छंद होता.त्यांच्या एका कुत्र्याची समाधी माहुली येथे आहे असे म्हणतात. महादजी अंबाजी यांनी छत्रपती थोरले शाहू महाराजांना १० कुत्रे पाठवली होती त्यातील त्यांनी ३ ठेऊन बाकी परत केली असे पत्र आहे.छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा एक आवडता हत्ती होता त्याचे नाव मदारी होते तो विहिरीत पडून मृत्युमुखी पडला तेंव्हा महाराजांना खुप दुःख झाले होते. छत्रपती थोरले शाहू महाराजांना जातिवंत घोड्यासंबंधी चांगली जाण होती. ते स्वता घोड्यावर स्वार होऊन त्याची पड़ताळणी करत असत. छत्रपती थोरले शाहू महाराजांचा हा पैलू त्यांच्या प्राणीदया आणि प्रेमळ स्वभावाचे दर्शन देतो..

भारतात ज्या गोष्टीचे अस्तित्वही नव्हते अशा नाविन्यपूर्ण वस्तू छत्रपती थोरले शाहू महाराजांनी मागवल्या होत्या तलवारी, सुऱ्या, हस्तिदंत, मासे पकड़ण्याचे जाळे, सुशा, कस्तूरी नाभी, वेलची दांडे इतर गोष्टी छत्रपती शाहू महाराजांनी कान्होजी आंग्रे यांच्यामार्फत इंग्रजांकडून मागवल्या होत्या. छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे राहणीमान अत्यंत साधेपणाचे असले तरी या नोंदीवरुन त्यांच्या वैभवाची कल्पना आपल्याला नक्कीच येते.

● संदर्भ – छत्रपती थोरले शाहू महाराज चरित्र – आसाराम सौंदणे

ईतरांना माहिती होण्याकरीता शेअर करा…

छत्रपती शिवरायांचे शेतिविषयक धोरण…

रयत सुखी तर राजा सुखी

हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे धोरण होते. शिवकालात प्रत्यक्ष शेतात राबणारा रयत हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता व त्याचा व्यवसाय हा समाजातील महत्वाचा मानला जात होता कारण त्याचे उत्पन्न हेच राज्याचे उत्पन्न होते तसेच शेतकऱ्यांच्या युवा पिढीतून सैन्य मिळत असे म्हणून शिवाजी महाराजांनी शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या. त्यासाठी शिवाजी महाराजांनी जमिनीची योग्य प्रकारे मोजमाप करून त्या त्या मातीप्रमाणे जमिनीचे प्रकार करत वर्गवारी करून त्यावर पिक पाहणी करण्याची व्यवस्था केली होती आणि त्यावरच सारा आकारला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकर्यां संदर्भात अनेक प्रकारच्या योजना आणि सवलती राबवल्या होत्या त्या त्यांच्या काही पत्रांमधून आपल्याला समजते त्यातील काही सोई सवलती अशा –

Maharaj

shivaji Maharaj with his beloved farmers

● गावचा गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावे कोणाकडे मनुष्यबळ आहे, बैल आहेत यांची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी.

● ज्याच्याकडे शेत कसण्याची कूवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोड़ी नाही, बी – बियाणे नाहीत त्याला दोनचार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी – बियाणे द्यावेत.

● शेतकर्यास सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसुल करावे.

● नवीन शेतकर्यास सोईसवलती देऊन पडिक जमीन लागवडीखाली आणावी त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी.

● ज्या शेतकर्यावर सरकारची मागील बाकी येणे आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही अशा शेतकर्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी. त्याच्यावरील कर्ज माफ़ करण्यासारखे असेल तर तसे कळवावे.

शेतकऱ्यांना सोईसवलती देणे, कर्जमाफ़ी देणे ही सेवा आहे पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नये हे परिवर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवले ते परिवर्तन आज घडण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचा विचार करायला हवा.

– राज जाधव

#शेतकरी_कर्जमाफी

Kolhapur Ambadevi

पुजारी हे गाभार्याचे मालक नाही, मंदिराचे नोकरच आहेत – शाहू छत्रपतींचा वटहुकुम !

पुजारी हे गाभार्याचे मालक नाही, मंदिराचे नोकरच आहेत – शाहू छत्रपतींचा वटहुकुम !

‘करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक’ अशी बिरुदावली मिरवत पिढ्यानपिढ्या अंबाबाई देवी आणि मंदिर स्वताची जहागीर असल्याच्या थाटात श्री पूजक वागत आहेत आहेत.

मावा-गुटखा खाऊन मंदिरात येणे ,मंदिर परिसरात व्यसन करणे , देवीच्या मूर्तीवरील निकृष्ठ रासायनिक प्रक्रिया, दानपेटीतील रकमेचे ,लाडू प्रसादाचे गैरव्यवहार यासंबंधी आधीच या श्री पुजार्यांवर दोषारोप आहेत. त्यात छत्रपतींचा अवमान करून यांनी स्वतःच मंदिरातील अस्तित्व संपवण्याकडेच वाटचाल केलीये.

मंदिरातील हक्क आणि उत्पन्न यासंदर्भात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी वटहुकूम रोजी काढला होता. त्यात ही बाब स्पष्टपणे मांडली आहे. श्रीपूजक हे गाभाऱ्याचे मालक नाहीत, ते नोकरच आहेत, असे या वटहुकूमात स्पष्ट नमूद केले आहे.

राजर्षी शाहू महाराजांचा वटहुकूम १४ मे १९१३ , ठराव नं. ८२१ खालीलप्रमाणे –

“शुक्रवारपासून गुरुवार असे श्रीकडील पूजा, अर्चा वगैरे जे आमिष घेणेचे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक पुजारी यास आठवडा येत असतो. त्याप्रमाणे हे पुजारी आपली खासगी मिळकत हक्क सांगून वहिवाट आपल्या मर्जीस येईल त्याप्रमाणे करतात. ती सरकारी देणगी समजण्याची आहे. या वाराबद्दल मृत्यूपत्र, दत्तकपत्र, बक्षीसपत्र, दानपत्र, खरेदीपत्र, गहाणपत्र अशी कागदपत्राच्या व्यवस्थेसाठी पुजाऱ्यांनी सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.”

Shahu Raje

Shahu Maharaj Farman

श्री पुजकांच्या उत्पन्नाबाबतचे हुकुमातील नियम-

“भक्त देवीला अर्पण करीत असलेले तांबा, पितळ, सामान, भांडी, कंदिल, समया, घाटी वगैरे जिन्नस सरकार जमा करावेत. चांदी, सोन्याचे दागिने, नेत्र, भांडी वगैरे जे येतील ते सर्व सरकारजमा करावे. केवळ दहा रुपये आतील माल पुजाऱ्यांनी न्यावयाचा असून बाकी माल सरकारकडे जमा करावा. तसेच कापडी डागाबद्दल चिरड्या, लुगडी, खण जिन्नस पुजारी यांनी नेण्याचा असून, महावस्त्र, पैठण्या हे सर्व सरकारजमा करावयाचे आहे.”

शाहू महाराजांच्या वटहुकुमाचा मान राखून अंबाबाई मंदिर श्री पुजारी मुक्त करावे , तिथे सरकारी नोकर अथवा शाहूराजांनी स्थापन केलेल्या क्षत्रिय वैदिक शाळेतील उपाध्ये /पुजारी नेमावेत.

‘करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीमंत छत्रपती’ आणि कोल्हापूरकर जनताच आहे. दुसर्या कोणी हक्कही सांगू नये !

मालोजीराव जगदाळे

Maratha

बलुचिस्तानमधील मराठ्यांची कहाणी…

पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्ष उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठा योद्धे शहीद झाले आणि २२ हजार युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सैन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापैकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : ‘दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते.’

पानिपतचे युद्ध कसे लढले गेले याविषयी इतिहासात सविस्तर माहिती उपलब्ध आहे; परंतु त्यानंतर मराठी युद्धकैद्यांचे पुढे काय झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. या युद्धकैद्यांचा पानिपतानंतरचा प्रवास व त्यांच्या वंशजांची सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती इतिहासाचा एक हौशी संशोधक म्हणून फेसबुकच्या माध्यमातून आणि पानिपतावरील युद्धकैद्यांच्या वंशजांबरोबर केलेल्या संभाषणातून मला मिळाली.

Maratha in baluchistan

पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. पश्चिम पंजाब (पाकिस्तान) ओलांडल्यानंतर बलुचिस्तान प्रांतातील डेरा बुगटी आदी भाग सुरू होतो. पानिपतच्या युद्धात बलुची सैन्य अब्दालीच्या बाजूने लढले होते. पानिपत युद्धाच्या एक महिना अगोदर १५,००० बलुची घोडदळ अताईखान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला येऊन मिळाले. त्यामुळे अब्दालीची बाजू बळकट झाली होती. पानिपताच्या युद्धापूर्वी तीन वर्षे आधी १७५८ मध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक मीर नासीर खान नुरी (कलातचा खान) यांच्यामध्ये एक तह झालेला होता.

या तहाच्या अटीनुसार मीर नासीर खान नुरीने अब्दालीला त्याच्या लष्करी कारवायांत सैनिक पुरवायचे व त्या बदल्यात अब्दाली मीर नासीर खानाला सैन्य ठेवण्यासाठी आर्थिक मदत करेल असे ठरले होते. अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानात परत आला त्यावेळेस कलातच्या खानाने अब्दालीकडे सैन्य पुरविण्याच्या बदल्यात मोबदला मागितला. परंतु अब्दालीला हिन्दुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती. कारण दिल्लीचा बादशहा सततच्या आक्रमणांमुळे तसा कफल्लकच झालेला होता. आणि मराठय़ांकडूनदेखील युद्धात हत्ती, घोडे आणि तोफांव्यतिरिक्त काहीच आर्थिक घबाड पदरात पडले नव्हते.

त्यामुळे अब्दालीने मराठा युद्धकैदीच पैशांऐवजी मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केले. मराठा युद्धकैदी बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्धकैद्यांची त्यावेळची शारीरिक अवस्था हीदेखील असू शकते. युद्धकैदी जवळपास दोन-तीन महिने कैदेत होते आणि त्यांना अगदी तुटपुंज्या अन्नपाण्यावर दिवस काढावे लागले होते. अजून बोलन खिंडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता. अगोदरच मानसिक व शारीरिकदृष्टय़ा खालावलेल्या मराठय़ांना या प्रदेशातून आणखी प्रवास जिवावर बेतला असता. त्यामुळेच अब्दालीने हा पुढचा विचार करून मराठय़ांना बलोच सरदारांना देऊन टाकले.

Maratha baluch

पानिपतात लढलेले बलुची सैन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.

या युद्धकैद्यांपैकी बुगटी, र्मी, मझारी, रायसानी व गुरचानी इत्यादी बलोच जमातींमध्ये मराठा उपजमात आजही आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. पानिपत युद्धातील त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज आज धर्माने मुस्लीम झालेले आहेत खरे; परंतु त्यांना आपल्या मराठीपणाचा रास्त अभिमान आहे. या उपजमातींपकी फक्त बुगटी मराठय़ांविषयीची माहिती उपलब्ध आहे. बुगटी जमातीतील मराठय़ांचे तीन प्रमुख वर्ग पुढीलप्रमाणे-

बहुसंख्य मराठा युद्धकैदी हे काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून देण्यात आले आणि आज हा समाज त्या- त्या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो. उदा. काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा वगरे. आज हा वर्ग समस्त बुगटी मराठी लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के आहे. या वर्गाला गुलामगिरीत दिवस काढावे लागले. परंतु १९४४ मध्ये नबाब अकबर खान बुगटी (बुगटी जमातीचे मुख्य सरदार) यांनी मराठय़ांना या गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले.

१९४४ पर्यंत या मराठा वर्गाला प्रचंड शारीरिक कष्ट व हलाखीचे दिवस काढावे लागले. १९४४ पूर्वी त्यांची मुख्य कामे म्हणजे उंटांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, लोहारकाम व इतर छोटी-मोठी कामे करणे हेच असे. बुगटी मालक (आका) आणि त्यांचे मराठा गुलाम यांचे संबंध बऱ्यापकी जिव्हाळ्याचे होते. बुगटी मालक आपल्या कुटुंबाप्रमाणे मराठी गुलामांची देखभाल करीत असे. नियमाला ज्याप्रमाणे अपवाद असतो, त्याप्रमाणे काही बुगटी मालक क्रूरसुद्धा होते व ते मराठा गुलामांना अतिशय वाईट पद्धतीने वागवीत असत असे सांगितले जाते.

Baluchistan maratha

प्रत्येक बलुची जमातीमध्ये त्यांचे स्वत:चे असे कायदे (जिर्गा) असतात. पूर्वी मराठय़ांना इतर बुगटी जमातींच्या तुलनेत असमान आणि जाचक असे कायदे लागू होते. उदाहरणार्थ, सियाकारी- म्हणजे Honour killing च्या कायद्यानुसार एखाद्या बुगटी व्यक्तीने दुसऱ्या बुगटी व्यक्तीचा वध केला तर वध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वध केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला मारण्याची मुभा होती. परंतु एखाद्या बुगटी व्यक्तीने मराठा व्यक्तीचा वध केला तर वधास वध हा कायदा त्यांच्या बाबतीत मात्र लागू नव्हता. अपराधी बुगटी व्यक्तीला माफक दंड करून सोडून देण्यात येत असे. याउलट, एखाद्या मराठा व्यक्तीने बुगटी व्यक्तीचा खून केला तर एका वधास दोन वध- असा विरोधाभासी कायदाही अस्तित्वात होता.

१९४४ साली हा मराठा समाज गुलामगिरीतून मुक्त झाला व जिर्गातले असमान कायदेही काळानुरूप रद्द करण्यात आले. गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही काही काळ या वर्गाने त्यांच्या बुगटी मालकांबरोबरच राहणे पसंत केले. कारण इतकी वर्ष गुलामगिरीत राहिल्यानंतर त्यांच्यात एक कमीपणाची भावना होती. अलीकडच्या काळात मात्र हळूहळू हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.

१९६० नंतर या समाजाने अन्य बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात बरीच आघाडी घेतली. कारण बाकीचा बुगटी समाज हा त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीतच अडकून पडलेला होता. त्यामुळे सरकारी नोकऱ्या तसेच ‘सुई पेट्रोलियम कंपनी’त बहुसंख्येने या मराठा समाजाने आपले बस्तान बसविले. बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर १९५० च्या दशकात सुई पेट्रोलियम कंपनी सुई येथे सुरू करण्यात आली. सुरुवातीला कामगार, फोरमन म्हणून मराठा समाजाला तिथे कामे मिळाली आणि हळूहळू त्यांच्यापकी काहीजण मॅनेजर, सुपरवायझर अशा पदांवरदेखील पोहोचले. आज हा मराठा समाज काळाशी जमवून घेत स्वत:च्या कर्तृत्वावर प्रगती करतो आहे व सुखात नांदतो आहे, ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.

दुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज (शाहू मराठा). मराठा युद्धकैद्यांपकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता. बुगटी प्रांत हा बराचसा कोरडा व वाळवंटी आहे. तेथे शेती केली जात नव्हती. बलुची टोळ्या या भटक्या होत्या आणि शेती करण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते. मॅरो तसेच सिआहफ या डेरा बुगटीजवळील काही भागात पाणी उपलब्ध होते. मराठा युद्धकैद्यांपकी ज्यांना शेतीचे चांगले ज्ञान होते अशांना बुगटी सरदाराने या भागात शेती करण्यासाठी अनुमती दिली; जेणेकरून बुगटी लोकांसाठी अन्नधान्याची तरतूद होईल. साहू मराठय़ांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला व अतिशय उत्तम प्रकारे शेती केली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गहू व बाजरी यासारखी धान्ये ते पिकवीत असत.

इतर बुगटी जमाती या त्यांच्या मूळ सरदारांच्या नावाने परिचित आहेत. उदा. रहेजा बुगटी जमातीचे ‘रहेजा’ हे नाव त्यांच्या रहेजा या पूर्वज सरदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच या वर्गाने आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘शाहू’ हे नाव छत्रपती शाहूंच्या नावावरून धारण केले. शाहू मराठय़ांच्या गढवानी, रंगवानी, पेशवानी, किलवानी वगरे सात उपशाखा आहेत. या शाखा कशा तयार झाल्या, याबद्दलची माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. परंतु ‘पेशवानी’ हे नाव पेशव्यांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे.

img_3206.jpg

शाहू मराठे जरी धर्माने मुस्लीम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे, घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे, इ. पद्धती महाराष्ट्रात जरी आज लुप्त होत आल्या असल्या (केवळ काही ग्रामीण भागातच टिकून असल्या) तरी साहू मराठय़ांमध्ये अजूनही त्या प्रचलित आहेत.

त्यांच्यामुळे काही मराठी शब्दही बलुची भाषेत आलेले आहेत. उदा.‘आई’ हा शब्द साहू मराठय़ांमध्ये आईला संबोधित करायला अजूनही वापरला जातो. मूळच्या बुगटी समाजानेही हा शब्द स्वीकारला आहे. स्त्रियांची काही मराठी नावे- कमोल (कमळ), गोदी (‘गोदावरी’चे संक्षिप्त रूप), गौरी, सबुला (सुभद्रा) अजूनही त्यांच्यात वापरली जातात. विनोदाची गोष्ट म्हणजे जसे मराठीत सुनीलचे ‘सुन्या’ असे टोपणनाव होते तसेच अजूनही साहू मराठय़ांमध्ये टोपणनाव ठेवले जाते. उदा. कासीम या नावाचे टोपणनाव ‘कासू’ असे केले जाते.

तिसरे- दरुरग मराठा! बुगटी मराठय़ांच्या तीन वर्गापकी हा वर्ग संख्येने सर्वात कमी आहे. हा वर्ग सुरुवातीपासून बुगटी सरदारांशी संबंधित होता व त्यामुळे त्यांना मोठा मान मिळत असे. आज या वर्गातले काही लोक मोठे जमीनदार आहेत. या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाइलवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो.

या तिन्ही वर्गातील मराठी बांधवांनी इतर बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात लवकर प्रगती केली. आज या समाजातील लोक इंजिनीअर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रोफेसर व उच्चपदस्थ राजकारणी आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही इतर बुगटी समाजापेक्षा चांगली आहे. १९९५ साली अकबर एस. अहमद (पाकिस्तानी राजनतिक अधिकारी व समाजशास्त्रज्ञ) यांनी लिहिलेल्या एका संशोधनपर निबंधातही या मराठा समाजाचा त्यांच्या पूर्वीच्या बुगटी मालकांपेक्षा अधिक उत्कर्ष झाल्यामुळे एकुणात बुगटी समाजात झालेल्या सामाजिक उलथापालथीची नोंद घेण्यात आली आहे.

सध्या डेरा बुगटी गावातील २०,००० लोकसंख्येपकी ३० टक्के म्हणजे ७००० लोक मराठा आहेत. तर सुई शहराच्या ८०,००० लोकसंख्येपकी दहा टक्के लोकसंख्या- म्हणजे ८००० लोक मराठा आहेत. सुई म्युनिसिपल कौन्सिलचे व्हाइस चेअरमन व डेरा बुगटी म्युनिसिपल कौन्सिलचे विरोधी पक्षनेते व १४ सदस्यांपकी सातजण हे मराठा सदस्य आहेत. इतर बुगटी जमातींप्रमाणे मराठा समाजाचा जिर्गादेखील आहे.

१९६० च्या दशकात सिल्विया मॅथेसन या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या ‘टायगर्स ऑफ बलुचिस्तान’ या पुस्तकात बुगटी मराठा समाजाचे उल्लेख आढळतात. लेखिकेचे पती सुई पेट्रोलियम कंपनीत नोकरीला होते. लेखिकेने बुगटी मराठा समाजजीवनाचे वास्तवदर्शी वर्णन या पुस्तकात केले आहे. मट्रा (‘मराठा’ शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश) लोक रंगाने काळेसावळे, लहान उंचीचे आहेत आणि इतर बुगटी समाजापेक्षा वांशिकदृष्टय़ा भिन्न आहेत. या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, या मराठा लोकांना १५ व्या शतकात हुमायून बादशहाला जेव्हा मीर चाकूर खान (बुगटी सरदार) याने दिल्लीजवळील युद्धात मदत केली त्यावेळेस बंदी बनवून गुलाम म्हणून येथे आणण्यात आले.

परंतु हे साफ चुकीचे वाटते. कारण १५ व्या शतकात मराठा सैन्य उत्तरेत गेले होते याबद्दलचे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त या पुस्तकात मराठा व पठाण गटांमध्ये झालेल्या दंगलीचे, तसेच दोन मराठा पोस्टमन रोज रात्री सुई ते डेरा बुगर्ट व पुन्हा परत असे ६० कि. मी. अंतर पायी कसे चालत जात, आणि एका मराठा गुलाम व्यक्तीने एका अवघड कडय़ावर चढून जाऊन आपल्या मालकाबरोबर लावलेली पज कशी जिंकली आणि त्या बदल्यात स्वत:ची गुलामगिरीतून कशी सुटका करून घेतली, याचे वर्णन केलेले आहे.

१९९० च्या दशकात जेव्हा हिंदी चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी नव्हती, त्यावेळेस डेरा बुगटी येथे ‘तिरंगा’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात लागला होता. त्यात नाना पाटेकरांनी एका मराठी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात जेव्हा नाना पाटेकर ‘मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं’ हा संवाद म्हणतात, त्यावेळी चित्रपटगृहातील या मराठा प्रेक्षकांनी हर्षांने शिट्टय़ा वाजवत एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येते. बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी ‘द ग्रेट मराठा’ ही हिंदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली.
बलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे प्रसिद्ध हिंदी गीत ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत. सब्ज अली बुगटींचे मूळ बलुची गाणे यू-टय़ूबवर ऐकता येऊ शकते. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे ‘लवानी लला’ हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा या बलुची वाद्यावर बऱ्याच मराठा कलाकारांची चांगलीच हुकूमत आहे.

Maratha baluchistan
मात्र आज बुगटी मराठा समाज बुगटी जमातीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे त्यांना मराठी भाषा, त्यांच्या पूर्वजांची नावे आणि इथल्या मूळ गावाचे नाव याबद्दल काहीच ज्ञात नाही.

एकंदरीने पानिपतावरील युद्धात झालेली हानी ही आपण समजतो त्यापेक्षा निश्चितच खूप अधिक होती. बहुसंख्य मराठा युद्धकैदी आणि त्यांच्या वंशजांना १८५ वर्षें त्यामुळे गुलामगिरीत दिवस काढावे लागले. आजवरच्या त्यांच्या पिढय़ांतील मराठय़ांची संख्या ही पानिपतात शहीद झालेल्या मराठा सनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल.

बुगटी समाजाव्यतिरिक्त इतर बलुची समाजातल्या (र्मी, रायसानी वगरे) मराठा समाजाची आज काय स्थिती आहे, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. बलुचिस्तानात उन्हाळ्यात पारा ५०० से. च्या वर जातो. धुळीची मोठी वादळेही वारंवार होत असतात. अशा खडतर प्रदेशामध्ये टिकून राहून आपल्या पुढच्या पिढय़ांची उत्तम काळजी घेणाऱ्या आणि अद्यापही आपल्या मराठीपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या या सहय़ाद्रीच्या कणखर मराठी समाजाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आजची बुगटी मराठय़ांची पिढी सुखात आहे. भारतातील मराठी समाजाने त्यांची दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

Maratha

सध्या बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानी लष्कराच्या अंमलाखाली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधही सध्या तितकेसे चांगले नाहीत. त्यामुळे बुगटी मराठा समाजाशी संबंध प्रस्तापित करणे तितकेसे सोपे नाही. भारतातील मराठी समाज या बुगटी बांधवांचे निश्चितच देणे लागतो यात दुमत नाही. जरी हा समाज स्वत:ला ‘मराठा’ म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील केवळ ‘मराठा’ या जातीशी संबंधित नाही. कारण पानिपतात अठरापगड जातीचे सनिक व सरदार लढले होते. मराठीजन व महाराष्ट्र सरकार यांना या समाजाबद्दल माहिती मिळावी, या हेतूने केलेला हा लेखप्रपंच. भविष्यात आपल्यापासून दुरावलेल्या या मराठीजनांसाठी आपल्याला थोडेबहुत काहीतरी करण्याची इच्छा व्हावी, हीच त्यामागची अपेक्षा.
#Jayostu_Maratha🚩
#Chhatrapati_Shivaji_Maharaj
#Baluchistan_Bugti_Maratha
بگٹی میراتھا

Maratha Morcha Bidar Karnataka

Maratha Kranti Morcha to hold ‘biggest rally’ in Mumbai on 9 August

After organising several protest marches since 2016, the Maratha community will now be taking out its biggest-ever protest rally in Mumbai on 9 August. The Maratha Kranti Morcha was formed last year by a number of organisations from the Marathi community.

Speaking to The Indian Express, Sanjiv Bhor, a member of the steering committee said, “At recent meetings, Sakal Maratha Samaj – the apex body of the community, formed a steering committee to take the agitation forward and accordingly biggest ever march would be taken out in Mumbai to mark completion of one year of the protest marches. The community has already submitted memorandum with a list of 20 prime demands by the community to the state government.”

maratha-morcha-kolhapur-girl-holding-banner

maratha-morcha-kolhapur-girl-holding-banner

The Indian Express had earlier reported that several rallies planned before had been cancelled due to several reasons. Its last biggest silent protest rally that was held on 25 September saw an attendance of 25 lakh, including women, children and the elderly. However since then, there have been no major rallies. The November rally in Delhi had to be cancelled due to demonetisation while its 6 March rally had clashed with board examinations. In total, 49 rallies have taken place in almost all districts of Maharashtra till now.

19239668_1568506503213230_331123871_n

The Muk Morcha is known for holding rallies without any political support.

Till now, it has not allowed any political leader to take part in its rallies. Sakal Maratha Samaj member Nanasaheb Patil told The Hindu, “The code of conduct for the rally will be the same. There will be no slogan-shouting and everyone will march silently and peacefully. A meeting will also be held on 6 June in Raigad fort, where the members will take a pledge to continue the struggle for the welfare of the community.”

Sindhudurg Maratha Kranti Morcha

Sindhudurg Maratha Kranti Morcha

Although demands for reservations and amendments to Scheduled Caste and Scheduled Tribe (Prevention of Atrocities) Act, 1989 to prevent its misuse have been around for a while, it was last year that the dominant caste in Maharashtra — that makes up over 20 percent of the state’s population — began mass agitations against the ruling BJP government. This was triggered by the gruesome rape and murder of a 15-year old girl in Kopardi village in Ahmednagar district. They have also demanded loan waivers for farmers to curb suicides and guaranteed rates for agricultural produce.

गनिमी कावा म्हणजे काय ? नक्की वाचा या शब्दाचा इतिहास

शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी ‘गनिमी कावा’ या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे. ‘गनीम’ हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू ‘गनिमी’ हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. ‘कावा’ या शब्दाला लक्षणेने ‘फसवणूक’, धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि ‘शत्रुचा कपटयुक्त हल्ला’ अथवा ‘कपट-युद्ध’ असा ‘गनिमी कावा’ या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्‍न असा उद्‍भवतो की ‘शत्रूचा कपटयुक्त हल्ला’ या शब्दाप्रयोगात शत्रू कोण?

मराठे की मराठ्यांचे शत्रू? या संज्ञेचा उपयोग मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो. म्हणजे ‘गनिमी कावा’ ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख ‘गनिमी कावा’ असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!

shivaji maharaj

shivaji maharaj

मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख ‘गनिमी कावा’ या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, ‘आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!” ‘गनिमी कावा’ हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.

‘धूर्तपणा’, ‘कपट’, ‘कावेबाजपणा’ अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ ‘कावा’ या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्‍या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून ‘कावा’ या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.

ganimi kawa

ganimi kawa

‘महराष्ट्र शब्दकोशा’त

कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत. त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. ‘कावा’ या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे’. ‘गनिमी काव्या’च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.

कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणाशी संबंधित आहे. पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्‍या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते. तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो. मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने ‘काव्या’चे होते. भरवेगात धावणार्‍या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच ‘कावा’. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस ‘गनिमी कावा’ हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने ‘गनिमी कावा’ वा केवळ ‘कावा’ या शब्दास लक्षणेने ‘कपट’, फसवणूक’ यांसारखे अर्थ प्राप्त झाले.

(शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार)

Statue Shivaji Maharaj

८२ देशांचा राजा शिवरायांना अभिवादन करताना….

मालोजीराव जगदाळे यांचा लेख

नोव्हेंबर १९, १९२१ साली ”शिवाजी कि जय , शाहू कि जय ” च्या गजरात, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत ८२ देशांचा सर्वेसर्वा असलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स ने छत्रपती शिवरायांना अभिवादन करत भारतातल्या पहिल्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन केले.

प्रिन्स ऑफ वेल्स ने शिवरायांचा उल्लेख “Shivaji not only founded an Empire, but created a Nation.” अश्या गौरवपूर्ण शब्दात केला त्याला उत्तरादाखल राजश्री शाहू म्हणाले “हे घडू शकले कारण,मराठे हे जन्मापासूनच लढवय्ये असतात ”

१० नोव्हेंबर १९१७ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी दिल्लीत शिवाजी स्मारकाची घोषणा केली आणि नोव्हेंबर १९, १९२१ साली स्मारकाचे भूमिपूजन झाले. दुर्दैवाने मे १९२२ साली राजर्षी शाहूंचे निधन झाले परंतु त्यांचे स्वप्न महाराजा माधवराव शिंदे (मृत्यू १९२५) आणि त्यांच्यानंतर गादीवर आलेले छत्रपती राजाराम आणि पुतळ्याच्या उभारणीस झटणारे ५०० कामगार यांनी पूर्ण केले ,
IMG_3201
४,६५,००० रुपये खर्चून उभा राहिलेल्या या भव्य पुतळ्याचे १६ जून १९२८ रोजी अनावरण झाले.

राजर्षी शाहूंच्या स्वप्नातून उभा राहिलेला हा शिवरायांचा भव्य पुतळा आजही पाहताना नकळतच शाहुराजांना नमन करायला मान खाली झुकते !

maratha communitya

कोपर्डी घटना हे मराठा विद्रोहाचे मूळ नाही. संजय डी. सोमवंशी

मराठा मोर्चांच्या निमित्ताने संजय डी.सोमवंशी-पाटील यांचा हा लेख वाचण्यात आलाय.

पुन्हा चर्चेसाठी मांडतोय संजय डी.सोमवंशी-पाटील

मूळात कोपर्डी घटना हे मराठा विद्रोहाचे मूळ नाही. या महाराष्ट्रात दीर्घकाळ मराठा सत्ता होती, परवापर्यंत मराठा मुख्यमंत्री होता, आजही विधीमंडळात बसणार्या मराठा आमदारांची संख्या कमी नाही. तरीही आपल्यावर अन्याय होतो आहे. ही भावना मराठा समाजात का तयार व्हायला लागली आहे. याच्या मूळाशी जाणे गरजेचे आहे. शेती, नोकरी, इतिहास, बेरोजगारी आणि राजकारण यातील अपयश हे या विद्रोहाचे कारण आहे. त्याचा स्फोट व्हायला कोपर्डी घडावे लागले एवढाच त्याचा अर्थ आहे. ज्यांना गावगाडा कशाशी खातात हे माहित नाही त्या सर्व समाजातील नवसाक्षर वर्गाला मराठा या वर्गाचा परिचय आजही आपल्या मराठी सिनेमातून होतो. गडगंज संपत्ती, हातात सत्ता, टोलेजंग वाडा, वाड्यावर चाललेली नाचगाणी आणि डाव्या मनगटाला जरा बांधून लावण्या ऐकणारा गावाचा पाटील हीच मराठा समाजाची ओळख आमच्या मेंदूत पक्की रुतली असेल तर गावगाडा आमच्या डोक्यात जाणार कसा ?

गावातला मराठा कोणे एके काळी शंभर एकर जमीन बाळगणारा आसामी होता, काळाच्या ओघात आणि सरकारी मेहेरबानीमुळे त्याच्या गळ्यात सिलिंगचे लोढणे आले. पुढे त्याचा कुटूंबविस्तार झाला आणि नंतरची पिढी अल्पभूधारकांच्या यादीवर दिसायला लागली. ज्या पाटलाने कधीकाळी दुष्काळात गावाच्या अठरापगड जातींना आधार दिला, मदत केली तोच पाटील आता गावातल्या दारिद्र्य रेषा यादीवर दिसायला लागला. वाढत्या कुटूंबामुळे अल्पचा तो अत्यल्प भूधारक बनला, पाहता पाहता त्याचे शेतमजूरात रुपांतर कधी झाले हे कळले नाही. आता हा मराठा आर्थिक बाबतीत मागे फेकला गेल्यामुळे मूळ प्रवाहापासून तुटला, तो शहरात झोपडपट्ट्यात कधी स्थलांतरित झाला, हे ही त्याला कळले नाही. शेती पिकत नाही, शेतमालाला भाव नाही, मुलाला शिक्षण देण्यासाठी गाठीला पैसा नाही, शिक्षण नोकरीत आरक्षण नाही. अशा नाना समस्यांनी मराठा बेजार झाला आहे.

समाजाची वस्तुस्थिती

संपूर्ण गांव मराठ्यांचे असले तरी गावात मूठभर मराठा श्रीमंत, इतर सगळे त्याच्याच खटल्यावर, वाड्यावर कामाला, घरगडी अशी अवस्था गेल्या पाच दशकात झाल्याने गावाचा आधारस्तंभ मराठा पार देशोधडीला लागला आहे. राजसत्ता, धर्मसत्ता, आर्थिकसत्ता आणि प्रचार मध्यमसत्ता इथे कुठेच मराठा दिसत नाही. याला कदाचित तोच जबाबदार असेल पण या सगळ्या वैगुण्याची सल या समाजाने इतकी वर्षे मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवली आहे, हे सहपरिवार निघणारे मोर्चे त्याचा परिपाक आहे.  राज्यभरात निघणाऱ्या मराठा मूक मोर्चांची इतर कोणत्याही समाजाने उगाच धडकी भरुन घेण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात ३५% असणारा हा समाज कधी अशा पद्धतीने एकत्र येईल असे कुणालाही वाटले नव्हते. आता निमित्य कोणतेही असो तो एकत्र आलाच आहे तर त्याला आपल्या सुख दुःखाची देवाण घेवाण करु द्या, आपल्या प्रगतीच्या वाटेवरील अडचणी कोणत्या? याचीही चर्चा करु द्या. तो एकत्र येतोय म्हणजे कुणाच्या तरी घरावर दगडच मारेल हे कुजके आणि कालबाह्य विचार आता इतर बहुजन समाजाने सोडून. या नव्या पर्वाचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे.

संजय डी.सोमवंशी-पाटील

maratha2

maratha community

मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज!

१७६१ च्या पानिपत युद्धामधील पराभव हा वैभवशाली मराठी इतिहासाला लागलेला सर्वात मोठा काळा डाग ठरला. या युद्धापासून मराठा इतिहासाला उतरती कळा लागली ती कायमचीच ! रोहिले आणि अफगाणांविरोधात सदाशिवराव भाऊंबरोबर नेटाने लढलेले कित्येक मराठा शूरवीर आणि सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले, तर मोजता येणार नाही इतके जण जायबंदी झाले. युद्धात सहभागी झालेली अनेक मराठा कुटुंबे लाजिरवाण्या पराभवानंतर आपल्या मायभूमीत परत गेली, तर जवळपास २९८ कुटुंबे तो पराभव सहन करत पानिपता मध्येचं राहिली. त्यांनी तेथेच आपले जीवन नव्याने सुरु केले.
road maratha

आज युद्धाच्या २५४ वर्षांनतर त्यांची लोकसंख्या दहा लाखांच्यावर आहे. मुळचा मराठी मातीतला पण सध्या पानिपतामध्ये स्थायिक असलेला आणि ‘रोड मराठा’ या नावाने प्रसिद्ध असलेला आपला बांधव आज परमुलुखात मान उंचावून जगतो आहे यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाही.

घोर पराभवाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन त्या २९८ कुटुंबांनी काळानुसार पानीपताची भूमी स्वत:ची मानली आणि तेथील संस्कृतीचा प्रत्येक घटक अंगी बाणून घेतला. पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या भागातील जवळपास २०० गावांमध्ये हा रोड मराठा समाज विखुरलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या देहबोली आणि पेहरावातचं बदल केला नाही तर आपल्या नावांमध्ये देखील बदल करून घेतले. पवारांचे पानवर झाले, महालेचे महल्ले आणि महालान झाले, जोगदंडाचे जागलन झाले.
maratha

आज पानिपतामध्ये गेल्यावर रोड मराठा समाज हा एका नजरेत ओळखता येत नाही. बहुतेक जण तर अस्सल जाट असावे असे दिसतात. परंतु बाहेरील रूपातील हा लक्षणीय बदल त्यांच्या अंतरंगातील मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान मात्र बदलू शकला नाही. अनेकजण स्वत:चा उल्लेख आवर्जून ‘मराठा चौधरी’ असा करतात आणि हा रोड मराठा समाज गर्वाने सांगतो की, आम्ही शूर मराठा सैनिकांचे वंशज आहोत.

पानिपतामध्ये फिरताना मराठी नावांच्या दुकानाच्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आपली मराठा संस्कृती जपण्यासाठी एका मुलीचा रोड मराठा बाप आपली मुलगी फक्त रोड मराठा समाजाच्या मुला घरीच देतो. हेच कारण आहे की रोड मराठा समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे

युद्धातील पराभव हा कोणाच्याही हाती नसतो. पेशव्यांनी आणि मराठ्यांनी अखंड भारत जिंकण्याची जी महत्त्वकांक्षा बाळगली तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायलाच हवा. कारण मराठे युद्धातून पळून गेले नाहीत, त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणजे त्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांचे शौर्य कित्येक पटीने जास्त आहे.

हा रोड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. येथे काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अहमद शाह अब्दाली व रोहील्यांशी लढताना मराठ्यांना आलेल्या वीरमरणाच्या शौर्यगाथेचा प्रसार केला जातो. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर महाभारत घडले म्हणून सरकारने मोठे स्मारक उभारून त्या जागेला वॉर मेमोरीयलचा दर्जा दिला. त्याचप्रकारे पानिपतामध्ये देखील शूर मराठ्यांचे स्मारक उभारून त्या जागेला देखील वॉर मेमोरीयलचा दर्जा द्यावा अशी रोड मराठा समाजाची तीव्र इच्छा आहे आणि यासाठी हरयाणा आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.

road maratha samaj

परमुलुखामधून आलेले म्हणून रोड मराठा समाजाला हरियाणामध्ये कोणीही बोल लावत नाही. हरयाणाच्या राजकारणात देखील रोड मराठा समजाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही मतदारसंघ असे आहेत जेथे वर्षानुवर्षे केवळ रोड मराठा समाजाचा प्रतिनिधीचं निवडून येतो. हरयाणातील प्रत्येक स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे.

कधी पानिपताला भेट दिलीत तर आपल्या या बांधवांची भेट घ्यायला बिलकुल विसरू नका.

—शिवांजली नाईक निंबाळकर,पुणे

मराठा आमदारांची नागपूरात गोलमेज परिषद

नागपूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपूर येथे दुसरी गोलमेज परिषद झाली. या परिषदेत मराठा समाजातील सर्व पक्षीय आमदारांनी आरक्षणासह इतर मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. या अधिवेशनात सर्व मागण्या प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच सर्वपक्षीय मराठा आमदारांनी मुख्यमंत्र्यानां भेटून आठवडाभरात राज्य मागासवर्ग आयोगवरील नियुक्त्या करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला.

परिषदेत आरक्षणाचे अभ्यासक प्राचार्य एम् एम् तांबे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, व्यंकटेश पाटील, भैया पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची सविस्तर मांडणी केली. प्राचार्य तांबे यांनी आरक्षणाच्या मुद्दयांवर देशभरातील विविध खटल्यांचे दाखले दिले. तसेच सरकारने कोर्टात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारे पुरावे प्रभावीपणे मांडण्याची गरज विशद केली. त्याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगावरील नेमणूका तात्काळ करण्याची मागणीही यावेळी केली. तर व्यंकटेश पाटील यांनी राणे समितीच्या शिफारशी मराठा आरक्षणाला पोषक असल्याचे सांगितले. तसेच या अहवालातील निष्कर्षनुसार मराठा समाज आरक्षणाला पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी मराठा समाज सर्वात लँडहोल्डर होता. तसेच राजकारण, सहकार या क्षेत्रांत मराठा समाजाने आपले स्थान निर्माण केले होते . मात्र, हा भूतकाळ झाला. सध्या मराठा समाजासमोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदींसह विविध क्षेत्रांत हा समाज आता मागे पडला आहे. वर्तमानकाळात मराठा समाज जॉबलेस, लँडलेस आणि पॉवरलेस बनल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. मराठा समाजाती दशा, दिशा आणि आरक्षण या अनुषंगाने पहिली गोलमेज परिषद कोल्हापुरात झाली होती. आता त्यापुढचे पाऊल म्हणजे मराठा आमदारांसाठी दुसरी गोलमेज परिषद आयोजित केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. परिषदेचे आयोजन भैया पाटील यांनी केले.