१२६ वर्षानंतर मुंबईचा डब्बा होणार पहिल्यांदाच बंद…

मुंबईचा डब्बेवाला (कधीही सुट्टी न घेणारा) आजपर्यत मुंबईचे डब्बे बंद हा प्रकार अपवादानेच घडला आहे. परंतु माथाडी कामगार जे डोक्यावर (माथ्यावर) वजन वाहतात. यांनी मराठा मोर्चात भाग घेण्याचे ठरविले आहे. १९८९ साली झालेल्या अण्णासाहेब पाटलाच्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात यांनी सहभाग घेतला होता. जवळपास ९०% माथाडी कामगार हा मराठा आहे. मराठा पैशाने सधन असतात हे म्हणा-यांनी याचा विचार करावा. कुटूंबासहीत लाखाच्यावर माथाडी कामगार मोर्चात सहभागी होणार. मुंबई, पुणे, नाशिक ईत्यादी भागातून माथाडी कामगार सहभागी होणार.

14449891_1411141918900655_3333854574070987197_n

मुंबईचे डबेवाले हे मावळ मराठा आहेत. छत्रपती शिवाजी महारांजांनी स्वराज्याचा यज्ञ जेव्हा मांडला तेंव्हा त्यात सर्व प्रथम आहुती आम्ही मावळ्यांनी दिली.घरादाराची राखरांगोंळी झाली गावावरून गाढवांचे नांगर फिरले पण मावळे कधी डगमगले नाहीत.छत्रपतीच्या काळात आम्ही हातात ढाल तलवार घेऊन गड किल्ले चढत होतो.व आत्ताच्या काळात हातात जेवणाचे डबे पायर्या आणी दादर चढून पोचवत आहे. त्याची डब्बेवाल्यांना खंत नाही. कारण छत्रपतींच्या काळातही युध्दाचे व्यवस्थापन शास्त्र आमचे कडे होते त्याला गनिमीकावा म्हणटले जायचे.तो गणिमीकावा आजही जगातील काही विश्वविद्यालयात शिकवला जातो आहे. राजे गेले महाराजे गेले काळाच्या ओघात मावळे ही मुंबईत डबेवाले झाले. पण आज ही जगातील काही विश्वविद्यालयात डबेवाल्यांचे व्यवस्थापन शास्त्र शिकवले जाते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

मराठा माणुस जे काम करतो ते निष्ठेने करतो याचा प्रत्यय म्हणजे मुंबई डबेवाल्याच्या मॅनेजमेंटची गिनीज बुकात उत्कृष्ट म्हणुन नोंद आहे. सन१८९० पासून हे काम आजपर्यंत अविरत सुरु आहे. त्याच्याविषयी थोडी माहिती आम्ही सदर लेखात देत आहो.
मुंबईतील डबेवाले तर नियोजनासाठी, प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनोख्या “नेटवर्क’ने आता अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूललादेखील भुरळ पाडली असून त्यामुळे या डबा संस्कृतीची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे.

81GKbW5tHmL

रोज हे पाच हजार डबेवाले मुंबानगरीत तब्बल दोन लाख जेवणाच्या डब्यांचे वितरण कसे करतात, त्यांच्याकडून डबे देताना आणि जमा करताना एकही चूक कशी होत नाही, मुंबईसारख्या इतक्या दाट लोकवस्तीच्या महानगरात या मंडळींनी हा चमत्कार वर्षानुवर्षे कसा करून दाखवला, याचे कौतुकमिश्रित कोडे हार्वर्ड स्कूलमधील तज्ज्ञांनाही सुटलेले नाही.

बोस्टनहून हार्वर्डचे एक प्राध्यापक खास या मोहिमेवरच मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर तेथील आणखी दोघे प्राध्यापकांचे विशेष संशोधनासाठी वरळीतील संशोधन केंद्रात आगमन झाले. या कालावधीत हार्वर्डच्या सदर तिन्ही प्राध्यापकांनी डबेवाल्यांबरोबर मुंबईभर पायपिट केली. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या आणि या डबे संस्कृतीतील बारकावे जाणून घेतले. मानवी बळाचा खुबीने वापर करून ही एवढी मोठी कामगिरी एकही चूक किंवा त्रुटी न राहता बिनबोभाट पार पाडली जाते.

dabba-6

कौतुकाचा पुढील टप्पा म्हणजे हार्वर्डने या अहवालाची जगभरातील विविध संस्थांना विक्री करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेतील अनेक औषध कंपन्यांनी भारतीय आयुर्वेदाचा तपशीलवार अभ्यास करून उच्च दर्जाची औषधनिर्मिती केली आहे. त्यातून ते कोट्यवधी डॉलर्स कमावत आहेत. आता हार्वर्ड स्कूलवाल्यांनी या डबेवाल्यांच्या कार्यसंस्कृतीतून डॉलर्स जमा करायचे ठरवले आहे. दुर्दैवाची बाब अशी की, आपल्या महाकाय देशातील एकाही बिझनेस स्कूलला यासारखे “जरा हटके’ विषय घेऊन त्यावर संशोधन करावे, असे वाटले नाही. यालाच म्हणतात पिकते तिथे विकत नाही! अर्थात, मुंबईच्या या डबेवाल्यांची कीर्ती यानिमित्ताने सातासमुद्रापार पोहोचली हे काय कमी झाले.

03-prince-charles-dabbawalas

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी जेव्हा मुंबईला भेट दिली तेव्हा तेथील अनोखी डबा संस्कृती पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर जेव्हा कॅमेला पार्कर बोल्स यांच्याशी चार्ल्स यांचे शुभमंगल पक्के झाले तेव्हा त्यांनी या डबेवाल्यांना खास आमंत्रण दिले होते. डबेवाल्यांनीदेखील त्यांच्या या प्रेमळ विनंतीला मान देऊन त्यांना मराठमोळी भेट पाठवून दिली होती हे वाचकांना आठवत असेलच.

मराठे , शक्तीचे प्रदर्शन करणार का वापर ?

मराठे , शक्तीचे प्रदर्शन करणार का वापर
बहिरी व्यवस्था बहिरे सरकार , ऐतिहासिक ५७ मोर्चाचा ताळेबंद अन ऑगस्टक्रांती

भागवत तावरे बीड

आम्हाला पक्के लक्ष्यात आहे, १६ जुलै २०१६ रोजी दैनिक लोकाशाने कोपर्डीची घटना पान एक वर मांडून “पुरोगामी महाराष्ट्रात बलात्काराच्या विरोधातील चळवळीत दुजाभाव “ या मथळ्याखाली जनतेला आंदोलनाचे आवाहन केले होते . त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील सर्वात पाहिल्यांदा जनक्षोभ बीड मध्ये रस्त्यावर उतरला. त्यानंतर ८ ऑगस्ट २०१६ हि तारीख एका ऐतिहासिक मोर्चा श्रुंखलेची नांदी ठरवत मराठा समाजाने औरंगाबाद येथे तीन लाख लोकांना घेऊन क्रांतीचा निखारा टाकला अन पाहता पाहता क्रांतीचा वणवा राज्यभर पसरला . जेव्हा शंभर लोकांना एकत्रित आणणे जिकरीचे होते त्या काळात लाखांचे लोंडे महाराष्ट्राच्या रस्त्यावरून वाहू लागले . कोपर्डीच्या वेदेनेचा फुंकर घेऊन गेल्या दोन पिढ्याची वेदना भडकली , अबाल मराठा मावळ एकत्रित झाला, महिला ,पुरुष युवक हक्कासाठी पेटून उठले , संख्येने एकत्रित आल्यावर प्रक्षोभ होण्याची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात मूक मोर्चे काढून मराठ्यांनी इतिहास घडवला .

समाजातील प्रत्येक वर्गाने मराठ्यांचे कौतुक करत मागण्या मान्य करण्याबाबद क्रांतीची भाषा स्वीकारली . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अण्णासाहेब पाटील जयंती दिवशी पोटतिडकीने मराठ्यांच्या पोटातली आग मान्य केली अन व्यक्त देखील . आरक्षण मिळवून घेऊ अस्या निर्वाणीच्या घोषणा केल्या . मात्र एका कोपर्डीचा निकाल न लावू शकणाऱ्या व्यवस्थेच्या उरावर रोज एक कोपर्डी घडत आहे . जर लाखोंचे मोर्चे काढून मूक भावना बहिऱ्या सरकारला कळणार नसतील तर संघर्षाचे विविध प्रकार आहेत त्यांचा अवलंब आम्ही करणार आहोत काय ? का मग फक्त शक्तीचे प्रदर्शन करून मुंबई पाहून परतणार आहोत याचे उत्तर मराठ्यांनी मिळवले पाहिजे.

बहुसंख्याक समाज संख्येने एका छत्राखाली एकत्रित येईल असे इतिहासात फक्त अपवादाने घडलेले आहे . त्यात २०१६ हे वर्ष त्याची साक्ष देणारे ठरले . अंगावर दर्र्रर्र्र्र काटा फुटावा अस्या संख्येने जणू विशाल गंगेचे रस्त्यावर अंथरले असा मराठ्यांचा महापूर आम्ही पाहितला . प्रत्येक जिल्ह्यातील निघालेली महाकाय मोर्चे पाहून मराठ्यांचा जखमा राज्याला अधोरेखित झाल्या . गरीब मराठ्यांचे दुख समजून घेतले पाहिजे असे मनोमन वाटणाऱ्या सत्ताधारी विरोधकांना वाटू लागले . मराठा क्रांती मोर्चा नावाने कुठल्याच नेतृत्व शिवाय जनतेने स्वयंभू संख्येचा सर्प वाढवला मात्र तो पुढे कागदाचा ठरला . कारण आज मागे वळून पाहताना ५७ मोर्चाचा लेखा जोखा घ्यायचा म्हटला तर बेरीज शून्य येईल . वर्तमानपत्रांची पाने ते पाने भरून आली . मराठ्यांचा शिस्तबद्ध एल्गार मराठ्यांना सन्मान मिळवून गेला मात्र समस्या सोडवू शकला नाही हे वास्तव आज मान्य करायला हवे , कारण त्यानंतरच मुंबईत निघणाऱ्या मोर्चाचा सदुपयोग करून घेता येणार आहे . नेतृत्वहीन मोर्चा हा कौतुकाचा विषय नाही तर न मिळणाऱ्या यशाची शास्वती असते , हे आता ५७ मोर्चे काढून थंडावलेल्या मराठ्यांना वेगळे सांगायला नको .

त्यामुळे मराठ्यांनी आता शक्ती चे प्रदर्शन करायचे का मनगट आवळायची अन संघर्षाचा स्वर आलाप अन पट्टी बदलायची हे ठरवून घ्यावे . सरकार ला ज्या भाषेत वेदना समजतात त्याच भाषेत आंदोलन करता येत नसेल तर तो आक्रोश वेळ अन काळ वाया घालत असतो हे मार्टिन ल्युथर चे वाक्य आहे . सामान्य मराठ्यांचा कुठला दोष होता काय जे सहभागी झाले , चूक झाली ती म्होरच्या थोपात , एकवटलेल्या शक्तीचा मोबदला मिळवण्यात त्यांना यश आले नाही , पेटलेल्या वणवा त्यांना दाखवता तर आला मात्र सरकारपर्यंत पोहोचवताना त्यांना यश आले नाही , यामुळे मंत्रालयात मराठ्यांचा आक्रोश पोहोचलाच नाही , याच वेळी राजकीय परिपक्व झालेले नागपूरचे फडणवीस यांनी गोड बोलून मराठे थंड केले . सरकारच्या गालीच्यावर राजाश्रय प्राप्त मराठे नेते तत्कालीन गर्दीचा भाग तर झाले मात्र मराठ्यांना दिलासा मिळवून देण्यात यशस्वी झाले नाहीत . म्हणूनच स्वयंभू मराठ्यांचा आखरी पाडाव ऑगस्ट ला मुंबईत पडत असताना, मागचे पाढे पंचावन्न होऊ द्यायचे का शक्तीचा वापर करायचा हे ठरवले पाहिजे . मागे आ.विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे घेऊन जाण्याचे निश्चित केले होते त्यावर देखील मोर्च्याच्या पुढे असणाऱ्या मंडळीने गांभीर्य समजून घेतले पाहिजे .

कुठल्याची समाजाची गती, प्रगती अन अधोगती हि तत्कालीन सामाजिक राजकीय नेतृत्वावर अवलंबून असते, हे कुणबी मराठ्यांना पंजाबराव देशमुखांनी दाखवून दिले आहे . असो आज मराठ्यासाठी एकच प्रश्न आहे एकवटणे त्यांच्यासाठी महत्वाचे नाही फक्त तुंब कुठे वळवायचा ठरवले पाहिजे . सरकारला ज्या भाषेत कळते त्या भाषेत बोलायला शिकले पाहिजे नाहीतर दुर्दैवाने ५७ ऐवजी ५८ एवढाच काय तो फरक पडेल , पोर मुंबई पाहून परत येतील , अठरा विश्व दारिद्र्य कायम असेल , गेलात जिंकून आलात तर आरसे पाहू शकतात.

maratha nanded

शेतकरी संपाचा आदर्श घेणार का

क्रांती मोर्चा मधील उपस्थिती पाहितली तर शेतकरी संप पाच टक्के देखील नव्हता . प्रत्येक जिल्ह्यात लाखोच्या घरात एल्गार असलेल्या ५७ मोर्च्यांनी जे साधले नाही ते नगर नाशिक मधल्या शेतकरी संपाने साधले अन त्याचा कमी अधिक का होईना लाभ राज्यात झाला . शेतकरी संप मराठी क्रांतीच्या तुलनेत कमालीचा अल्पवयीन होता मात्र त्याने साधलेल ध्येय मात्र कमी कष्टात साधले गेले . मराठ्यांचे लाखोचे मोर्चे रस्त्यावर आपला प्रक्षोभ दाखवत होते मात्र सरकार सोबत चर्चा कुणी करत नव्हते , अर्धे हळकुंड चर्चा करायची नाही म्हणून अडून बसली अन त्यातच सरकार गपगार राहिले , शेतकरी संपात मात्र आंदोलन सुरु होते तोच सुकाणू समिती गठीत करण्यात आली , आंदोलनाला थोडे गालबोट लागताच सरकार गुड्ग्यावर आले , सुकाणुच्या नुसत्या डरकाळ्यात जी आर च्या मागे जी आर मंत्रालयातून बाहेर पडले , हे काम मराठ्यांना का साधता आले नाही यावर खल होणे गरजेचे आहे काय , मूक भावनांना जरा बोलके केले पाहिजे काय , याचा विचार मराठ्यांनी ज्या त्या स्तरावर जावून केला पाहिजे .

भाऊ लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक

भाऊ लक्ष्मण जावळे उर्फ भाऊसाहेब रंगारी : सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक

प्रस्थापित इतिहासलेखकांनी आपल्या लेखणीचा गैरवापर करत खरा इतिहास पुसुन चुकीचा इतिहास प्रचलित केल्याचे अजुन एक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. जातकेंद्री इतिहासलेखकांनी बांधलेल्या इतिहासाच्या तिरक्या भिंतीचे लेखणीने मोठे केलेले चिरे आता त्यांच्यावरच कोसळु लागले आहेत. यावेळेस तो चिरा बाळ गंगाधर टिळकांच्या रुपाने कोसळला आहे. यापुर्वीच महात्मा ज्योतिराव फुलेंनी १८६९-७० मध्ये सुरु केलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे जनकत्व बा.गं. टिळकांच्या नावावर खपविण्याचा जातकेंद्री प्रकार उघडकीस आला असताना परत आता भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्येच सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व टिळकांच्याच नावावर खपवले गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

bhausaheb rangari

bhausaheb rangari

हे सहन न झाल्याने आता पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टला खरा इतिहास उघड करु नका अशा धमक्या देणारी पत्रे यायला सुरुवात झाली आहे. खोट्या इतिहासाचा पर्दाफाश झाल्यामुळे नेमकी कुणाच्या बुडाखाली आग लागली असेल ते वेगळे सांगायला नको.वस्तुतः भाऊसाहेब रंगारी हे एक जबरदस्त क्रांतिकारक होते. त्यांच्या वाड्यामध्ये क्रांतिकारकांना गुप्तपणे शस्त्र चालवण्याचे शिक्षण दिले जायचे.

आपल्या सहकाऱ्यांसमवेत त्यांनी ब्रिटिशांविरोधात क्रांतीकार्य चालविले होते. नुकताच त्यांच्या वाड्यातील शस्त्रासाठाही सापडला आहे. भाऊसाहेबांचा शालुंना रंग देण्याचा व्यवसाय होता, त्यामुळे त्यांचे जावळे आडनाव मागे पडुन रंगारी हे नाव प्राप्त झाले. ते उत्तम राजवैद्य होते. त्यांच्या राहत्या घरी आयुर्वेदिक दवाखाना होता. Richard I. Cashman यांच्या The Myth of Lokmanya : Tilak and Mass Politics in Maharashtra या पुस्तकात त्यांचा उल्लेख “Bhau Lakshman Javle, was a Maratha whom the police considered an extremely dangerous and troublesome man” असा उल्लेख आला आहे, यावरुन त्यांचा दरारा लक्षात येईल.

१८९२ साली सर्वप्रथम भाऊसाहेब रंगारी यांनी गणेशोत्सव सुरु केला. २६ सप्टेंबर १८९३ च्या केसरीच्या अग्रलेखात टिळक स्वतः लिहतात की, सालाबादपेक्षा यंदा गणेशोत्सवास अधिक सार्वजनिक स्वरुप आले असुन ज्या गृहस्थांनी खटपट केली त्यांचे आभार मानले पाहिजेत. ते गृहस्थ दुसरेतिसरे कोणी नसुन भाऊसाहेब रंगारी हेच होते. सार्वजनिक गणेशोत्सवातील देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्याची सुरुवातही भाऊसाहेबांनीच केली. टिळकांनी १८९४ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग घेतला.

तत्कालीन सामाजिक जीवनातही भाऊसाहेबांना मानाचे स्थान होते. दारुवाला पुलावरील हिंदू-मुस्लिम दंगल थांबवणारे व्यक्तिमत्व म्हणुन दस्तुरखुद्द टिळकांचे सहकारी न.चि. केळकर यांनी भाऊसाहेबांचा उल्लेख केला आहे.

मात्र आपल्याकडे चित्रपटातुनही चांगला इतिहास कसा दुसर्यांच्याच नावावर खपवला जातो आणि इतिहास घडविणाऱ्यांना कसे डावलले जाते याचा “सुबोध” आपल्याला यावरुन घेता येईल. १९०५ मध्ये आधीच आपले मृत्युपत्र बनवुन स्वतःच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची तजवीज करणाऱ्या भाऊसाहेबांनी आपली सर्व संपत्ती सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दान दिली होती. विशेष म्हणजे आपल्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हणुन त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीची साक्ष घेतली होती.
जुन १९०५ रोजी भाऊसाहेबांचे निधन झाले. त्याचीही बातमी २० जुन १९०५ च्या अंकात केवळ एका वाक्यात छापुन केसरीने त्यांची उपेक्षा केली.

भाऊसाहेबांचा इतिहास बराच मोठा आहे. इतके दिवस भाऊसाहेब रंगारी हे नाव आणि चरित्र उपेक्षेच्या गर्तेत अडकले होते. पण आता उपेक्षेचा काळ संपला आहे. उशिरा का होईना सत्य समोर आले आहे. अजुन बराच उलगडा होणे बाकी आहे. सत्याचा पाठपुरावा करण्यासाठी धडपडणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. शेवटी सत्य ज्यांच्या बाजुने असते त्यांचाच विजय असतो…

14316893_1172443106164138_465368390366649140_n 14344146_1172445292830586_4305432561939704310_n 14329922_1172444832830632_5266600593912913766_n

Ganapati Decoration

Ganapati Decoration

Tilak and Mass Politics in Maharashtra Richard I. Cashman

Tilak and Mass Politics in Maharashtra Richard I. Cashman

जिज्ञासुंनी अवश्य भेट द्या.
ठिकाण – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, शनिवारवाड्याच्या पाठीमागे, अप्पा बळवंत चौक, पुणे.
–अनिल माने.

मराठा मोर्चा का ठरला विशेष ?

महाराष्ट्राने अनेक मोर्चे बघितली असतील परंतु मोर्चाची परिभाषा बदलवणारे ५७ मोर्चे महाराष्ट्रात निघाले.मी स्वतः महाराष्ट्रतील अनेक मोर्चात सहभागी होतो त्या अनुभवावर लिहिलेला लेख… काय विशेष होते मोर्चात नक्की वाचा?

मोर्चातील लोकांची संख्या

mkm

morcha participant

महाराष्ट्रातील पहिला मोर्चा असेल ज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाहून निघाले होते. जिथ पर्यंत नजर जाईल तिथप्रर्यंत भगवाच दिसेल. मोर्चात १० लाख,१५ लाख आकडा हा साधारण सहभाग झाला होता. रस्त्यावर हलायला जागा नव्हती व जवळपास ५ किमी पर्यंत हीच अवस्था सगळीकडे असणार. लोक बाल्कनी,झाड, जिने इत्यादी ठिकाणी चढून मोर्चातील हि मराठ्याची लाट बघत होते. हा आकडाच तुमची छाती अभिमानाने फुगवतो.

अभूतपूर्व विक्रमी हजेरी

mkm

 

तरुणाचा समावेश या मोर्चात अधिक प्रमाणात होता. परंतु अनेक कुटुंब सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते. आणि त्यांच्या लहान बाळांना रंगीबेरंगी कपडे , पटका, झेंडा, मराठा घोषवाक्य असलेली टोपी पाहण्या लायक नजरा होता तो. लहान मुलांचा समावेश हा मोर्चातील विशेष भाग होता…

मोर्चाचे नेतृत्व

mkm

मोर्चाचे नेतृत्व हे सामान्य कुटुंबातील मुली करत होत्या. हि विशेष बाब , व्यासपीठावर कुठल्याही नेता,सामाजिक कार्यकर्ता कोणीही नव्हत. फक्त मराठा रणरागिणी…

लोकांची शिस्तबद्धता

mkm

किमान १० लाख लोक मोर्चात असतात. परंतु एकही माणूस बदफैली किंवा असभ्य वर्तवणूक करताना दिसणार नाही. अनेक मुले झाडावर चढत होती तो प्रसंग त्यांच्या मोबाईल मध्ये कैद करायला. पोलीसासोबत सेल्फी काढणारे अनेक तरुण मी बघितले. पोलीसहि निश्चित होते ह्या लाखोच्या जनसमुदाया पुढे…

साफसफाई

maratha sevak

लोक स्वतः करिता पाण्याच्या बाटल्या , अन्नाची पाकिटे घेऊन आलेले होते. अरे हो हि बाब एक विशेष मोर्चाला येणारे लोक खेड्यावरून येत होते तर त्यांचा डब्बा ते स्वतः घरून भाजी भाकरी बांधून आणत होते. त्या बाटला, पाकिटे रस्त्यावर पडल्या बरोबर मराठा सेवक येणार आणि रस्त्यावरील कचरा उचलणार. अनेक अधिकारी, अभियंते, डॉक्टर,विद्यार्थी इत्यदी लोकांना मी हि मराठा सेवकाची भूमिका वठवताना पहिलय. मोर्चा झाल्यावर या लाखो लोकांनी कागदाचा तुकडाही रस्त्यावर दिसू दिला नाही. कमालीची बाब आहे.

परदेशातील बांधवानि दिला पाठींबा

maratha kranti morcha newyork image

मराठा क्रांती मोर्चा एकमेव मोर्चा होता ज्याला २० देशातून पाठींबा मिळाला. जगाच्या कानाकोपर्यात हा मोर्चा झाला. मराठा बांधवानी प्रत्येक देशातून मोर्चास जमून पाठिंबा दिला.

सोशल मीडियावर डंका

14741750_1296809407049609_778246232_n

 

सोशल मीडियातून हा मोर्चा वर आला आहे. मोर्चाने स्वतःची स्वतंत्र प्रचार यंत्रणा बनवली होती. फेसबुक मराठा क्रांती मोर्चामहाराष्ट्र या पेजचा महिन्याभारत १ करोड ८६ लाख लोकापर्यंत पोहचण्याचा विक्रम केला. अनेक ट्रेंड twitter वर मोर्चाची गाजले.

परदेशी वृत्त वाहिन्यांनी घेतली दखल

BBC London, National Geographic सारख्या अनेक नामांकित परदेशी वृत्तवाहिन्यांनी या मोर्चाची दखल घेत महाराष्ट्र गाठला होता. ते लोकही अचंबित झाले होते हे सर्व बघून.

मानवता

gf
संपूर्ण रस्ता हा लोकामुळे बंद झाला होता. मी अनेक मोर्चे पाहिले ज्या नंतरहि लोकांना त्रास होतो परंतु मराठा मोर्चाची बातच न्यारी त्या ३ तासानंतर तुम्हाला वाटणार हि नाही इथे लाखो लोक येऊन गेले. जे रस्ते बंद झाले होते ते अचानकच तीन तासानंतर सुरु झाले.
नेहमीच्या आयुष्यात अस होत नाही परंतु कोणालाही म्हटले “मित्र थोडी जागा देत का जायला ? धन्यवाद “ आणि जागा मिळणारच. बर्याच लोकांचे हरवलेली पाकिटे घोषणा करून परत भेटणं मी बघितले. हे पहिल्यादा मी अनुभविले होते. नेहमी अश्या घोषणा ऐकायला येतात कि सापडले असतील तर परत द्यावे.. पण इथे सर्व उलटच
मी मोठेपणा करणार नाही परंतु तिथे हलायला सुध्दा जागा नव्हती. पुस्तकाच्या पानाप्रमाणे लोक एकमेकांना चिपकून उभे होते उन्हाळ्याच्या दिवसात, परंतु रुग्णवाहिकेस याच गर्दीतून ५ मिनटात रस्ता मोकळा होताना मी डोळ्यांनी बघितला. लाखो लोकाच्या दाटीवाटीतून रुग्णवाहिका आरामात चालली गेली कल्पना तरी करू शकता का ? लोक एकमेकासोबत हसून बोलत होते जसे ते कित्येक काळापासून एकमेकांना ओळखतात.
आणि महत्वाची गोष्ट या मोर्चा मध्ये सर्व जाती धर्माची लोक सहभागी होते. फक्त मराठ्यांना हक्क मिळवून देण्या करिता..

राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता

people singing national anthem

मोर्चाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुली जेव्हा निवेदन देऊन येतात, तेव्हा सर्व लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वेगळाच असतो. कल्पना करा लाखो लोक एका अभिमानास्पद क्षणात असताना. तुम्ही कुठल्या जातीचे आहात हे गोष्ट येथे महत्वाची नाही, तुम्ही सहभागी झालात यामुळे छाती गर्वाने फुलतो.
त्यांनतर संचलन करणारे राष्ट्रगीता करिता राष्ट्रगीता करिता ऑर्डर देतो. कल्पना करा लाखो लोक सगळीकडे शांतता फक्त रवींदनाथ टागोर यांचे शब्द तुमच्या कानावर हळूवार एकू येतात. देशभक्तीने हृद्य ओतप्रोत भरून आल्याशिवाय राहणार नाही. मला तर अंगावर काटे आले होते. भारत माता कि जय व तो संपूर्ण शहरात घुमणारा जयचा नारा आजही माझ्या कानात घुमतोय.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा मोर्चा मूक होता. शांततामय मार्गाने…
मुंबई मोर्चात मागण्या मान्य नाही झाल्या तर हि सर्वाच भल पाहणारी लोक काय रूप धारण करतील हे सांगता येणार नाही. आतापर्यतचा अनुभव रोमांचकारी होता. परंतु हि खदखद मनात अशीच भरून राहिल्यास अवश्य स्फोट होणार…

अमित पाटील वानखडे

anonymous maratha

मराठ्यांवर खापर फोडणे थांबवा…

सगळीकडे असा मेसेज फिरतोय की, आजवर मराठा नेत्यांनी समाजासाठी काय केले किंवा मराठा नेत्यांनी काहीच केलं नाही म्हणुन आरक्षण मागायची वेळ आली आहे !

जे असा प्रश्न विचारतात त्या सर्व लोकांनी ही पोस्ट सविस्तरपणे वाचाच…

१ मे १९६० रोजी पुर्वीच्या द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिक लोकांचा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रात पायाभुत सुविधांची अत्यंत कमतरता होती. रस्ते, वीज, पाणी, अन्नधान्य याची टंचाई होती. दुधदुभते, पशुव्यवसाय, फळबागा, नगदी पीके, रोजगार, व्यवसाय, दळणवळण हे सुद्धा नगण्यच होते. जवळपास सर्व शेतकरी कुटुंबांत ज्वारी-बाजरी हेच मुख्य अन्न होते. दारिद्रय, उपासमारी, अनारोग्य, बेरोजगारीचे प्रमाण भयानक होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदचंद्रजी पवार, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील, नारायण राणे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे मराठा मुख्यमंत्री लाभले.

यशवंतरावजींच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात प्रशासकीय, पायाभुत, आर्थिक, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी विकासाचा पाया घातला गेला. त्यांनी कोयना आणि उजनी प्रकल्पांच्या उभारणीला गती दिली. त्यातुनच पुढे राज्यात हरितक्रांती यशस्वी झाली. शंकररावजींच्या काळात प्रामुख्याने जलसिंचन सुविधांचा विकास झाला. जायकवाडी, उजनी, अप्पर वर्धा, काळ, काळीसरार, अरुणावती, विष्णुपुरी अशा कितीतरी प्रकल्पांच्या कालव्यांतुन वाहणाऱ्या पाण्याने शेतीचे आणि पिण्याचे प्रश्न सुटले. वसंतदादांच्या प्रयत्नांतुन सहकार क्षेत्र विस्तारले. त्याच्या जोरावर राज्यात वैद्यकीय, इंजिनिअरिंग व आयटीआय शिक्षण ग्रामीण भागात सुरु झाले आणि औद्योगिक विकास टप्प्यात आला. समतोल विकास, अनुशेष अशा संकल्पना राबवुन त्यांनी राज्याच्या सर्वसमावेशक विकासाची वाट निर्माण केली. शरद पवार साहेबांच्या काळात राज्य आणि देशातही अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्णता, फळबागा विकास, महिला सक्षमीकरण, रचनात्मक कार्याचा डोंगर उभा राहिला. बाबासाहेब भोसलेंनी मुलींसाठी अनेक शैक्षणिक सवलती लागु केल्या, तसेच स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तिवेतन सुरु केले.

या सर्वांच्या योगदानातुन राज्यात विकासाची चळवळ सुरु झाली. त्यांच्या कष्टामुळे महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण झाले. त्या सहकारी संस्थांमध्ये सर्व समाजांचे लाखो शेतकरी, वाहतुकदार, कायम/हंगामी कामगार कामाला आहेत. हे कामगार काय बाहेरच्या देशातील आहेत का ?

दुग्ध, कुक्कुटपालन, पशुपालन, कृषिपुरक व्यवसायाला चालना कुणामुळे मिळाली ?

सहकारातुन उभ्या राहिलेल्या ज्या शिक्षणसंस्था आहेत त्यात काय परदेशातील मुले शिक्षण घेतात काय ?

ज्या शेतात ज्वारी बाजरीसारखी तृणधान्ये आणि तूर मटकीसारखी कडधान्येसुद्धा पिकत नव्हती, त्याच शेतात आज ऊसाचे मळे आणि केळी, डाळींब, मोसंबी, चिक्कु, आंबा, बोर, पेरु, सिताफळ, द्राक्षांच्या बागा कुणाच्या धोरणामुळे उभ्या आहेत ?

FRUITS

फळबाग

कित्येक योजना शेतकरी बांधवासाठी याच महाराष्ट्रात राबवल्या गेल्या.

पाझर तलाव, फळबाग लागवड अनुदान, ठिबक सिंचन, सबसिडी, कर्जपुरवठा… किती सांगावे इतकं काम महाराष्ट्रात उभ राहिलेले दिसुन येईल. ज्यांना साधे २५ हजाराचे कर्ज मिळत नव्हते त्यांना आज लाखांच्या पटीने कर्ज मिळतं, ते ही पिककर्ज असेल तर फक्त ५% व्याज दर आकारला जातो. हे कुणाच्या प्रयत्नामुळे ?
खुप काही लिहता येईल, पण बिनडोक वाचणार नाहीत. महाराष्ट्रात कित्येक तरुणांना रोजगार देणाऱ्या एमआयडीसी, दुध संघ, साखर कारखाने, रेशीम उद्योग, बाजार समित्या, शैक्षणिक संस्था यांना हे सगळे जण विसरुन गेले आहेत.

bajar samiti rajgurunagar

bajar samiti rajgurunagar

ज्यांनी साधी पिठाची गिरणी काढली नाही, त्यांच्या भडकाऊ भाषणामुळे मुंबईत हप्ते चालु झाले आणि मुंबईतील सगळ्या कापड गिरण्या बंद झाल्या.
कुणी बंद पाडल्या याचा हिशेब कुणीच विचारत नाही. यांनी करोडोंची कोहीनुर मिल कशी घेतली हे विचारणार कोण ?
परंतु नेहमी मराठा, ओबीसी नेत्यांच्या भ्रष्टाचाराची नुसती पोकळ चर्चा करायची, शिक्षण संस्था, कारखाने यांच्या कामाचा हिशेब मागायचा, हाच दुटप्पीपणा नाही का ?

आपले मेंदु कित्येकांनी काही लोकांकडे गहाण टाकले आहेत. त्यांनी काहीही लिहायचे आणि आमच्या बिनडोकांनी पुढे पाठवायचे.

काम करत असताना माणसे चुकतात. ती कुठल्याही पक्षातली असली तरी चुकतात. नागपुरच्या पुर्ती घोटाळ्याचे काय झाले ? माहित नाही, कोण त्यावर बोलतही नाही. चिक्की, डाळ घोटाळ्याचे काय झाले याची चर्चा होणार नाही. ज्यांचा जन्म ऊसाचे फडात झाला त्यांनी इतके कारखाने, बँका, शिक्षणसंस्था कशा काढल्या याचा हिशेब आमच्या पोरांना कळणारच नाही. आमचे लोक हिशेब फक्त मराठा नेत्यांचाच विचारणार.

कित्येक गोष्टी लिहता येतील. मराठा नेत्यांनी सहकारी संस्था काढल्या. प्रायव्हेट लिमिटेड संस्था काढल्या असतील तर त्याही थोडक्याच. त्याच्यावरुनच आम्ही गजहब करणार. मात्र बाकीच्यांनी सहकारी संस्था नगण्य तर मोठ्या प्रमाणावर काढलेले खाजगी उद्योग तुम्हांला दिसणार नाहीत, कारण तुम्ही कोणाकडे तरी अक्कल गहाण टाकलेली असते.

मराठा समाज आरक्षण का मागतोय ? तर गेली अनेक वर्ष दुष्काळ, नापिकी, गारपीट, वादळ अशा नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता शेतमालाच्या हमीभावाच्या सरकारी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी हतबल झाला आहे. कित्येकांनी गावे सोडली. गावातील तरुण बेकार झाला. त्यामुळे तरुण शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. साध्या एसटी पासला पैसे नाहीत म्हणुन चिमुकलीला जीव द्यावा लागतो. पण या संवेदनाहीन सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
click by akshay ingle

नुसतेच महोत्सव, धार्मिक कार्यक्रम, कुंभमेळा, जाहिरातबाजी यासाठी करोडोंची उधळण केली. सरकारी नोकर भरती कपात केली. निर्यात बंदीमुळे शेतकरी भरडला गेला. त्यातुन नैराश्य आले. शिक्षण परवडेनासे झाले. नोकरीची हमी राहिली नाही. त्यामुळे आज बहुसंख्य मराठा शेतकरी आरक्षण मागतोय. त्याला कर्जबाजारी सरकारनेच केले आहे, म्हणुन शेतकरी कर्जमाफी मागतोय. पण हे हलायला तयार नाहीत. हा आक्रोश कमी करण्यासाठी काही महाभागांनी मराठा नेत्यांनीच काही केले नाही अशी कोल्हेकुई चालु केली. शेतकऱ्यांना चार पैसे देणारे साखर कारखाने व ऊस धंदा बंद कसा पडेल याचाच विचार केला. मराठा मुलांना याच लोकांनी अभ्यासाला न लावता कधी मुसलमान तर कधी दलित यांचे विरुद्ध भडकावुन टाकले.

Farmrer Indian

Farmrer Indian

यांच्या काळात सरकारी रोजगार कमी झाला. याबद्दल मराठा समाज त्यांना कधी जाब विचारणार नाही. केवळ माथी भडकावुन सत्ता मिळवणारे सतत बुद्धीभेद करतात हे तरी लक्षात घेण्याची पात्रता आमच्या लोकांमध्ये यावी हीच अपेक्षा…

शाहु महाराज खरे लोकराजे….

आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्या. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती. म्हातारी आजी पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. लाडवांची पुरचुंडी पिशवीत चुंबळीच्या पदराखाली सरकवली.

Shahu Maharaj Car

Shahu Maharaj Car

आजी एस्.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुलाने तिला हटकलंच, म्हातारे, आज उशीरसा?’ माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. तेवढ्यात समोरुन मोटार येताना दिसली.

आजीने चटकन विचार केला, एस्.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू आजीने आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदार गडी वाटला. तो आजीकडे बघून हसला. “काय पायजे आजी?” त्यानं विचारलं. आजीला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, “माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? “यष्टी चुकली बग’ ड्रॉयव्हर खाली उतरला.

म्हातारीची पाटी डिकीत टाकली आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. आजी हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली, “ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?”

ड्रॉयव्हर हसत म्हणाला, “आजी, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी ”
आजीचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली.

बांगडीवाला मुलगा तोंड वासून आश्चर्यानं पाहत होता. गाडी हलली तसा तो ओरडलाच, “अगे म्हातारे….. पण आजीला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती?

मऊ गादीवर आजीला फार सुख वाटलं, एस्.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. आजीनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले.

दिवस भराच्या उन्हान,धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. “आजी, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना?” आजी खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्याहातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली.

IMG_3597

म्हाताऱ्या आजीला काय वाटलं कोण जाणे.तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, “खा माझ्या पुता” ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोळे भरुन पाहिलं.

गाडी निघाली, तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला,
“कुणाच्या गाडीतून इलंय?” “टुरिंग गाडीतनं.” आजी म्हणाली आजीचं बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला.

तशी आजी खणखणीत आवाजात म्हणाली “तीन आणे मोजून दिलंय त्येका”, “त्यांनी ते घेतलं? अग म्हातारे तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. या आपल्या कोल्हापूरच्या शाहु महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू ‘ दुसऱ्यानं माहिती पुरवली.

“अरेा माझ्या सोमेश्वरा, खळनाथा” म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिनं भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय’ म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या,त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं. याला म्हणतात ” #लोकराजा_राजर्षी_शाहू_महाराज”

२६ जुलै कारगिल विजय दिन…

कारगिल विजय दिवस

२६ जुलै २०१७ ला कारगिल विजयाला १८ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय सेना हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करते. खरं तर युद्धात विजय हा फक्त सेनेचाच नसतो, तर तो संपूर्ण देशाचा असतो. म्हणून संपूर्ण देशात हा दिवस उत्साहाने साजरा व्हायला हवा. मात्र, तसे होत नाही. हा दिवस विसरला जातो, ही खेदाची बाब होय.

IMG_3586

भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची, पराक्रमाची, त्यागाची, कष्टाची, सहनशीतलेची, निष्ठेची, जिद्दीची, देशाभिमानाची व बलिदानाची सातत्याने उजळणी आपल्या देशवासीयांकरिता होणे गरजेचे आहे. कारण या उजळणीमुळे लोकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवली जाते. साऱ्या देशबांधवांनी आपल्या जीवनात देशप्रेमालाच प्राथमिकता देऊन आपापली कामे केली तरच देश प्रगतिपथावर अग्रेसर राहील.

१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध वगळता पाकिस्तानविरुद्धच आपले युद्ध झाले आहे. १९४८ नंतर १९६५ चे युद्ध झाले, ज्यात भारतीय सेनेने लाहोरला धडक दिली. १९७१ च्या युद्धात आपला निर्णायक विजय झाला, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली व आपल्या सेनेने ९० हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी केलं. भारत-पाकिस्तानच्या युद्धाचे मूळ कारण नेहमीच काश्मीर असते. काश्मीर समस्येमुळे संबंध नेहमीच ताणलेले असतात. नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान असताना म्हटले होते की, भारत- पाकिस्तान बससेवा सुरू होत आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु, जर पहिल्या बसमधून भारताचे पंतप्रधान लाहोरला आले तर आम्ही समजू की, भारत-पाक संबंध सुधारावे ही खरोखरीच भारताची इच्छा आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पुढाकार घेतला व लाहोरला बसने यात्रा केली. परंतु, याच सुमारास पाकिस्तानने कारगिल युद्धाच्या जय्यत तयारीला सुरुवात केली. आता प्रश्न उद्भवतो की कारगिलच का ?

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. पाकिस्तानला ही गोष्ट मान्य नव्हती. परंतु, त्यांचा नाईलाज होता. कारण महाराजा हरीसिंगनेच पुढाकार घेऊन काश्मीर भारताचा अविभाज्य घटक राहील, अशा करारावर स्वाक्षरी केली होती. १९४८ साली पाकिस्तानने काश्मीरमध्ये सैन्य घुसविले व बऱ्याच मोठय़ा भूभागावर ताबा मिळविला. भारतीय सेनेनी आपल्या सैन्याची जमवाजमव केली व पाकिस्तानी सेनेवर हल्ला चढविला. पाकिस्तानी सेना माघार घ्यायला लागली असताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी यूनोकडे धाव घेतली. मग युद्धबंदी झाली. दोन्ही देशांच्या फौजा जिथं होत्या तिथं थांबल्या. जिथं दोन्ही देशाच्या फौजा थांबल्या तिलाच एलओसी (लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल) म्हणतात. यामुळेच काश्मीरचा बराच मोठा प्रदेश आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो. यूनोने हे प्रकरण चिघळत ठेवण्याची भूमिका घेतली नसती तर भारतीय सेनेने पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावले असते व पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसला नसता.

IMG_3589

जम्मूपासून श्रीनगर, कारगिल व लेहपर्यंत राष्ट्रीय राजमार्ग नंबर एक ए वापरात आहे. संपूर्ण सेनेचं मेंटेंनन्स याच राजमार्गामुळे होतं. त्यामुळे या मार्गाला सेनेकरता जीवन रेषा मानल्या जात. कारगिल, बटालिक, द्रास व मइको व्हॅली एल.ओ.सी.ला अगदी लागून आहेत. पाकिस्तानी सेनेने योजना केली की, जर या चार ठिकाणांवर ताबा मिळविला तर राष्ट्रीय राजमार्गाचा बराच मोठा भाग त्यांच्या ताब्यात येईल. त्यामुळे भारतीय सेनेचा लेहशी संपर्क तुटेल व लेहशी संपर्क तुटल्या मुळे लेव्ह व सियाचीनला मेंटेन करणं फारच कठीण होईल. थोडक्यात यामुळे लेह व लेहवरील भूभाग अगदी सियाचीनपर्यंत, पाकिस्तानच्या ताब्यात जाईल.

काश्मीरच्या या संपूर्ण भागात नोव्हेंबर ते मार्च प्रचंड प्रमाणात बर्फ पडतो. बऱ्याच ठिकाणी स्टँडिंग स्नो २० ते ३० फूट असतो. अशावेळी पहाडांच्या शिखरांवर असलेल्या ठाण्यांचे व्यवस्थापन करणे फारच अवघड असतं. आपल्याला व पाकिस्तानला देखील ! त्यामुळे दोन्ही देशांमध्ये एक अलिखित करार होता की, या महिन्यात दोन्ही देशांच्या फौजा शिखरांवरून खाली येतील. आपल्या परमनंट बेसमध्ये म्हणजे साधारणत: ९ ते १० हजार फुटावर. भारतीय सेना ठरल्याप्रमाणे आपल्या ठाण्यांपासून खाली आली. पाकिस्तानी फौजांनीसुद्धा दाखविलं की, आम्ही खाली जात आहोत. परंतु, नंतर परत जाऊन आपण खाली केलेल्या ठाण्यांवर ताबा मिळविला. कारगिल युद्धाची सुरवात येथून होते. म्हणजे आपल्या हद्दीत शिरून पाकिस्तानने आपल्या ज्या ठाण्यांवर ताबा मिळविला तेथून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावणे, हे भारतीय सेनेचे काम होतं. शत्रू पर्वतरांगांच्या शिखरावर बसला होता. भारतीय सेनेने पहाडावर चढून जाणे व हल्ला करणे अत्यंत कठीण होते. काश्मीरमध्ये १० हजार फुटानंतर प्राणवायूची कमतरता असते. थोडं चालल्यावर थकायला होतं, दम लागतो. याकरता एक्लेमेटाईसेझन करणे आवश्यक असते. १० हजार फुटापासून १२ हजार फुटापर्यंत चालत जाऊन तेथे सैनिक दिवसा थांबतात व रात्री परत खाली येतात. हे सात दिवस रोज करायचे असते. सात दिवसांनंतर १२ हजार फुटावर लढण्याकरता सैनिक शारीरिक व मानसिक दृष्टय़ा तयार होतो. यालाच एक्लेमेटाईझेशन म्हणतात. हीच कारवाई दोन दोन हजार फुटांकरता करायची असते. कारगिल युद्धाच्या वेळेस आरोप होत होता की, इतका वेळ का लागत आहे? पर्वतीय भागातील युद्ध अतिशय अवघड असते. पुष्कळ ठिकाणी आपले हल्ले रात्रीच्या अंधारात झाले जे खूपच कठीण आहे.

IMG_3590

कारगिल युद्धात बरेच हल्ले अतिशय दुर्गम ठिकाणांहून केल्या गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीप्रमाणेच शत्रूच्या अनपेक्षित मार्गातून जाऊन त्यावर अचानक हल्ले करण्यात यश मिळाले. अखेर भारतीय सेनेला शत्रूला हुसकावून लावण्यात यश मिळाले. कारगिल युद्धात अद्वितीय शौर्याची अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी देशवासीयांच्या मनात घरे केली आहेत.

IMG_3587

कॅप्टन विक्रम बत्राच्या कंपनीने शत्रूच्या एका ठाण्यावर विजय मिळविला. त्याच्या साहसी वृत्तीमुळे सर्व सैनिकांना तो अतिशय आवडत असे. या विजयानंतर विक्रमच्या युनिटला ४८७५ या शिखरावर हल्ला करायचा होता. त्याच्या युनिटच्या कमांडिग ऑफिसरने योजना आखली. ६ जुलै १९९९ रोजी हा हल्ला करायचा होता. नेमके त्याच दिवशी विक्रमची प्रकृती बिघडली व त्याला १०३अंश ताप आला. त्याला सांगण्यात आले की, या हल्ल्यात तो जाणार नाही. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो ताबडतोब म्हणाला की, मी माझ्या कंपनीसोबत या हल्ल्यात जाणारच प्रकृती ठीक नसताना देखील त्याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कंपनीने शत्रूवर हल्ला चढविला. हल्ला चढवीत असताना त्याला गोळ्या लागल्या व तो जबर जखमी झाला. त्या अवस्थेत पुढे सरकत जाऊन त्याने शत्रूच्या मिडीयम मशीन गनवर हातगोळे फेकले व ती गन उडविली. जखमी झाल्यावर देखील त्याने स्ट्रेचर वरून डॉक्टरकडे जाणे अमान्य केले. तो म्हणाला की, हे शिखर आपल्या ताब्यात आल्याचं मला मरणापूर्वी बघायचय. अखेर शिखर काबीज झाले व विक्रमने अखेरचा श्वास घेतला.

कारगिल युद्धात दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल भारतीय सैनिकांना विनम्र अभिवादन !

करोडपती पाटील….एकेकाळी ३०० रुपये पगार घेणारा हा तरुण

माणूस विचार करतो एक आणि नियती घडविते वेगळंच काहीतरी. असा अनुभव आपल्यापैकी बहुतांशजणांना आलेला असेलच. असामान्य काहीतरी घडवतील अशी वाटणारी माणसे पुढे जाऊन फारच खुजी निघतात. तर जे आपल्या खिजणागणतीत असतात ते मात्र स्वत:चं विश्व तयार करतात. या दोहोंमध्ये वेगळेपण असतं ते म्हणजे वाट्टेल ते मेहनत घेण्याची तयारी आणि उत्तुंग स्वप्न पाहण्याचा आवाका. आपल्या आजुबाजूला असे अनेक तुम्हांला भेटले देखील असतील. तो देखील असाच आपल्या स्वप्नांच्या पाऊलवाटेवरुन निराशेपोटी परतणारा एक. स्वप्न जास्त मोठ्ठं नव्हतं. स्वप्न होतं, पोलीस उपनिरीक्षक होण्याचं. मात्र तीन वेळा अपयश पदरी पडल्यानंतर त्याने वेगळी वाट धरली आणि त्या वाटेवरुन चालत स्वत:चं एक औद्योगिक विश्व निर्माण केलं. ही कथा आहे संदीप पाटील यांची.

सानेगुरुजींचं अंमळनेर म्हणजे अवघ्या महाराष्ट्रास वंदनीय. अशाच या अंमळनेर मध्ये सुशिला आणि काशिनाथ या पाटील दाम्पत्याच्या पोटी मुलगा जन्मास आला. त्याचं नाव संदीप. काशिनाथ पाटील हे नाशिकच्या गांधीनगर मधील शासकीय मुद्रणसंस्थेत कामगार म्हणून कार्यरत होते. गांधीनगर ही या शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहतच होती. जवळपास ३ ते ४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचं येथे वास्तव्य होतं. संदीपला आणखी दोन भावंडं होती. संदीपच्या आई सुशिला या गांधीनगर परिसरात भाजी विकण्याचा व्यवसाय करीत. संदीप जनता विद्यालयात शिकत होता. शाळा शिकत असताना तो आणि त्याची भावंडं आईला भाजी विकण्यास मदत करीत असे. पुढे २५ वर्षे संदीपच्या आईने भाजीविक्रीचा व्यवसाय केला. मोठा भाऊ पोलिस अधिकारी झाला. १० वीच्या परिक्षेनंतर संदीपने एका टूर कंपनीत टिकट बॉयची नोकरी केली. महिन्द्रा ऍण्ड महिन्द्रा कंपनीसाठी तिकीट बुकिंगचं काम त्याला करावं लागे. त्यासाठी संदीप सातपूर ते महिन्द्रा कंपनी अशी ४ किलोमीटरची पायपीट करायचा. त्यावेळी त्याचं वय होतं अवघं १६ वर्षे.

नाशिकच्या केटीएचएम कॉलेजमध्ये संदीपने महाविद्यालयीन शिक्षणासाठी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. तिथे त्याने बीकॉम केलं. कॉलेजमध्ये असल्यापासून आर्मीत वा पोलिसदलात जाण्याचं त्यांचं स्वप्नं होतं. त्यासाठी तो एनसीसी मध्ये भर्ती झाला. अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत तो पोहोचला. बेस्ट कॅडेट, बेस्ट डिसीप्लिन, बेस्ट शूटर अशी ५ सुवर्णपदके त्याला नाना पाटेकरांच्या हस्ते मिळाली. त्यावेळी नाना पाटेकरांचा सैन्यदलावर आधारलेला प्रहार हा चित्रपट आला होता. दरम्यान कॉलेजमध्ये शिकत असतानाच आपल्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी संदीपने चक्क एका बिअर बार मध्ये कॅप्टनची नोकरी केली. मात्र आपलं स्वप्नं पूर्ण करायचं तर आपल्याला एमपीएससीची परिक्षा द्यावी लागेल हे त्याच्या मनाने हेरलं. त्याने पोलिस उपनिरिक्षकपदाची पहिली परिक्षा दिली. मात्र निव्वळ ७ मार्काने तो नापास झाला. यानंतर जोमाने तयारी करण्यासाठी तो करिअर कॉम्पिटीशन ऍकॅडमी या संस्थेत गेला. तेथील फी परवडणारी नव्हती म्हणून संचालकांकडे तिथे नोकरी करुन शिकण्याची गळ घातली. संचालकांनी त्यास मान्यता दिली. मात्र सकाळी ८ ते रात्री ११ पर्यंत अगदी झाडू मारण्यापासून ते पडेल ते काम करण्याची कामं संदीपला करावी लागत असे. १९९३ साली त्याने परत एमपीएससीची परिक्षा दिली आणि एका मार्काने त्याची संधी हुकली. आता आपल्याला वाट बदलायला हवी असे त्याला वाटले.

त्याने महात्मा नगर मधील योगिता एन्टरप्राईजेसमध्ये वेल्डरची नोकरी धरली. तिथे काम करत असतानाच आपण आपला व्यवसाय करावा असे मनाशी ठरविले. त्यापद्धतीने त्याने मालकाला देखील सांगितले. एके दिवशी एक ग्राहक गॅसकटींग रिपेयरिंगचं काम घेऊन कंपनीत आला होता. त्यावेळेस चुकून मालकाने संदीप तु हे काम करशील का असे विचारले. संदीपने आपण हे काम करु असे सांगितले. त्याने ते काम घरी आणले. घरातील जेवण बनविताना वापरण्यात येणारी सांडशी आणि उलथणे यांचा वापर करुन त्याने गॅस कटींग रिपेयरिंगचं काम करुन दिलं. यातून त्याला २२५ रुपयांचा फायदा झाला. आणि हाच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरला. हळूहळू त्याने अशी छोटी मोठी वेल्डिंगची कामे घेण्यास सुरुवात केली. दिवसभर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये फिरायचं, काम मिळवायचं आणि रात्रीचं काम करुन ते पूर्ण करुन द्यायचं हा जणू शिरस्ताच बनला. आपल्या मदतीसाठी त्याने एक माणूस घेतला. काहीसा वेडसर म्हणता येईल असा तो माणूस होता. त्याच्या करामतीमुळे संदीपच्या घरच्यांनी त्याला विरोध केला आणि संदीपने त्या वेडसर माणसाला काढून टाकलं. दरम्यान नाशिकच्या मुंगी ब्रदर्सचं मोठ्ठं काम संदीपला मिळालं होतं. ते जवळपास ६० किलो वजनाचं काम स्वत: संदीप मुंबईला घेऊन आला.

कुर्ल्याच्या बैलबाजार परिसरातून बसने जात असताना त्याने एका दुकानावर गॅस कटींग मशिनचं चित्र पाहिलं. या पठ्ठ्याने ते मशिनचं चित्र पाहून ३०-३५ किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बसमधून उडी मारली. धावत तो त्या दुकानात गेला. दुकानाचे मालक अल्ताफ भाईंना त्याने आपली हकिकत सांगितली. अल्ताफ भाईंनी ते काम दुसऱ्या दिवशी सोमवारी घेऊन येण्यास सांगितले. तिथेच संदीपची सुधीर सोबत ओळख झाली. ते काम पूर्ण करुन संदीप नाशिकला परतला. १७ हजार रुपये खर्च झालेल्या त्या कामातून संदीपला ५५ हजार रुपये मिळाले. यानंतर संदीपचा आलेख उंचावत राहिला. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या औष्णिक प्रकल्पाच्या शाफ्टचे अत्यंत अवघड काम संदीप पाटील यांच्या दुर्गेश एंटरप्राईजेसने केले होते. यासाठी तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी पाटील यांची पाठ थोपटली होती. पुढे चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील पाण्याच्या शुद्धीकरणाचे असेच अवघड काम देखील त्यांच्या कंपनीनेच पूर्ण केले होते.

एकेकाळी ३०० रुपये पगार घेणारा हा तरुण आज जवळपास १० कोटी रुपये उलाढाल असणाऱ्या कंपनीचा मालक आहे. या वर्षी ही उलाढाल १२ कोटींकडे जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे. वेल्डिंगमधील सर्व प्रकारची कामे ते करतात. विशेषत: जे काम कोणीच करु शकत नाही अशीच अवघड स्वरुपाची कामे ते करतात. त्याचप्रमाणे अडॉर सारख्या नामांकित १० कंपन्यांचे वितरक म्हणून देखील ते कार्यरत आहे. स्कील इंडिया अंतर्गत या क्षेत्रातील जगभरातील अत्याधुनिक साधने भारतातील पॉलिटेक्निक व आयटीआय कॉलेजेसना देण्याचा संदीप पाटील यांचा मानस आहे. सप्टेंबर मध्ये जर्मनी येथे होणाऱ्या वेल्डिंग उत्पादन क्षेत्रातील एका मोठ्या प्रदर्शनास ते भेट देणार असून तेथील सर्वोत्तम तंत्रज्ञान ते भारतात घेऊन येणार आहेत.

संदीप पाटील यांचा हा प्रवास तरुणांसाठी विशेषत: स्पर्धात्मक परिक्षेत अयशस्वी झाल्यामुळे निराश होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्त प्रेरणादायी आहे. बीकॉम, एलएलबी असे पारंपारिक शिक्षण असणारे, अभियांत्रिकीचा कसलाही गंध नसणारे संदीप पाटील आज मशिनच्या जगात मुशाफिरी करत आहेत. कोणताही व्यवसाय करण्यासाठी त्या क्षेत्रातील पदवी नसली तरी चालेल पण तुमच्या ठायी चिकाटी आणि जिद्द असलीच पाहिजे हाच संदेश जणू संदीप पाटील यांचा उद्योजकीय प्रवास देतो.

उदयन महाराजसाहेब – THE PRINCE OF MAHARASHTRA..

महाराज !!!
उदयन महाराज !!!
बस्स! नाम ही काफी है !!!
मला आवडणाऱ्या मोजक्याच असामान्य व्यक्ती मधील अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणचे उदयनराजे…

सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी.. धीर-गंभीर चेहरा (वेळप्रसंगी मिश्किल हास्य) .. उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्या चालण्या-बोलण्यात राजाची बेफिकिरी, निडरता क्षणाक्षणाला जाणवते.. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घामच फोडतात.. महाराजांची चाल ही अगदी तशीच बिनधास्त पण भारदस्त…

गोष्टींच्या पुस्तकातील सर्वोत्तम शूर राजाच वर्णन उदयन महाराजांना चपलख लागू होत..

उदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण होते.. इतकी अजब Personality!! वरती कुर्ता किंवा फॉर्मल शर्ट , खाली जीन्स पॅन्ट आणि पायात तेजदार कोल्हापुरी.. अशी त्यांची राहणी साधी पण सर्वांनाच आकर्षित करणारी असते..

सातारा गादीचे हे वारसदार… जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज.. खरच जाणते.. आपल्या साताऱ्यातील जलमंदिर वाड्यात अश्या कित्येक अडचणी त्यांनी न्यायाने सोडवल्यात.. सामान्यांना न्याय मिळणारी हक्काची जागा म्हणजे साताऱ्यातील जलमंदिर राजवाडा.. भव्य, आलिशान, शानदार ; राजाचाच वाडा शेवटी तो.. पण कायमच सामान्यांच्या हाकेला वाड्यानी प्रतिसाद दिला, हे सातारकर खुल्या दिलाने मान्य करतात.. राजमाता कल्पनाराजे व महाराज उदयनराजे यांचा न्याय अंतिम मानला जातो.. तो सत्याचाच असतो.. हे तिथली जनताच न कचरता कबूल करते..

आजच्या युगात कसले महाराज नि कसले काय? असे म्हणणारी माझी तरुण पिढी सुद्धा राजांवर जीव ओवाळून टाकायला तयार होते.. का? पण का?

Udayan Maharaj

Udayan Maharaj

माझं मन याच शोध घेऊ लागते… मी जमेल तिथे उदयन महाराज वाचायला लागतो.. माणसांच्या मनात, वर्तमानपत्राच्या पोटात, गुगलच्या पेटार्यात..जमेल तिथे..आणि मग कळायला लागत महाराजांना सगळेच जाती-धर्माचे आपलं का मानतात?

udayan raje family

udayan raje family

रात्री रस्त्याने जाणाऱ्या एकट्या आजीला पाहून आपल्या आलिशान गाडीतून उतरून आजीची विचारपूस करणारा ; इतकंच नाही तर आपली गाडी आजीला सोडवायला पाठवून स्वतः चालत जाणारा हा माणूस म्हणजे उदयन महाराज… आपल्या एका कर्मचाऱ्याने नवीन आणलेली स्कुटी घेऊन त्याच्या आग्रहाखातर आपली सोन्याची बुलेट सोडून रपेट मारणार हा साधा व प्रेमळ माणूस म्हणजे उदयन महाराज.. कष्टकरी लोकांमध्ये जमिनीवर बसून त्यांची चटणी भाकरी खाणारा राजा म्हणजे उदयन महाराज.. गाडीच्या बोनेट वर बसून लोकांमध्ये बिनधास्त गप्पा मारत बसणारा आपला माणूस म्हणजे उदयन महाराज… स्वतःच्या नावावरची 36,000 एकर जमीन लोकांना विना रुपया कसायला देणार दिलदार माणूस म्हणजे उदयनराजे.. प्रतापगड सारखा मोठा किल्ला , शिखर-शिंगणापूर मंदिर संस्थांना सह अनेक वास्तूंचा मालक असूनही सामान्यांमध्ये रमणारा असामान्य राजा म्हणजे उदयन महाराज.. स्वतः विरुद्धच्या मोर्चात सर्वात पुढे सहभागी होऊन त्याच मोर्चात चालणार वाघ म्हणजे उदयन महाराज..

अपंग-गरिबांना रोजी-रोटी देणाऱ्या स्टॉल वर हातोडा घालणाऱ्या JCB समोर उभा राहून प्रशासनाला जाग्यावर आणणारा जाणता राजा म्हणजे उदयन महाराज… रमजानला आपल्या मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या- नागरिकांच्या घरी जाऊन आनंदात सहभागी होणारा दिलदर्या माणूस म्हणजे छत्रपती उदयन महाराज… संसदेत अस्सलखीत इंग्रजीत भाषण करणारा हा इंजिनियर राजा म्हणजे उदयन महाराज… फॉर्म्युला वन मध्ये भाग घेण्याची पात्रता असणारा तुफान-वेगवान चालक म्हणजे उदयन महाराज.. कराटे सहित घोडे सवारीत सुद्धा तरबेज असणारा चौरंगी हिरा म्हणजे उदयन महाराज… दिलेल्या शब्दाला जागून प्रश्न मार्गीच लावणारा नेता म्हणजे उदयन महाराज… परखड-स्पष्ट मते ; तीही आपल्या स्टाईल मध्ये बिनधास्तपणे जाहीर करणारा खमक्या नेता म्हणजे उदयन महाराज ..

अजून काय नि किती गोष्टी, किस्से महाराजांबद्दल भरभरून बोलू लागले.. अगणित..अनंत..

असंच अनासाये महाराजांना एकदा भेटायचा प्रसंग आला.. जुन्या पेन्शन संघटनच्या कामानिम्मित मी मंत्रालयात एका मोठ्या कॅबिनेट मंत्र्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो.. ते मंत्री विशेष बैठकीसाठी त्यांच्या आतल्या चेंबर मध्ये बसले होते.. बाहेरच्या मुख्य केबिनमध्ये आमच्या सोबत काही मंत्री,आमदार देखील वाट पाहत बसलेले. अशी पंधरा एक मिनिटे गेली असतील.. शांततेला भंग करत मुख्य केबीनचा दरवाजा करकर आवाज करत उघडला गेला त्यातून एक धिप्पाड माणूस आत आला.. त्याच्या मागे सुद्धा तसेच बलदंड 3-4 जण होते.. कोल्हापुरीचा कर-कर आवाज करत रुबाबात हा माणूस त्या विशेष चेंबरचा दरवाजा ढकलत दरवाजवळील रक्षकाला “कोण आहे रे आत” असं खमक्या आवाजात विचारत तडक आत घुसला..

त्यावेळी प्रतीक्षेत बसलेल्या VIP च्या तोंडावरील Reaction च बोलत होती “राजा आहे , तो थोडी थांबेल..” . पुढच्या काही ५-७ मिनिटात आपले काम पूर्ण करून हा माणूस बाहेर आलाही.. आणि बाकी अजूनही प्रतीक्षेतच .. मी या माणसाकडे पाहतच बसलो.. इतकी जरब, दरारा नि बिनधास्तपणा मी पहिल्यांदाच पाहत होतो… तो निडर माणूस म्हणजे उदयन महाराज.. थेट काम..थेट बोलणं..नि थेट वागणं…

UdayanRaje With Car

UdayanRaje With Car

महाराजांबद्दल अनेक अफवा, नकारात्मक बातम्या कानावर आल्या.. पण महाराजांना वयक्तिक आयुष्य आहे, हेही आपण जाणीवपूर्वक विसरतो की काय कोण जाणे.. महाराज साहेबांची कामं करायची पद्धत चांगली की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात, पण ‘महाराज साहेब कुणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात,’ असं सातार्‍यातील अनेकजण सांगतात. स्वत:च्या अनुभवावरून… मग त्यांच्या वयक्तिक बाबी (त्याही खऱ्या किती नि खोट्या किती) आपल्याचिनपाट तोंडाने चघळणे कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हावा… काहीही असो, एक मात्र नक्की हा माणूस अफलातून नि एकमेवाद्वितीयच आहे… तरुणांच्या गळ्यातल्या ह्या शक्तिमान ताईताला मानाचा मुजरा…

प्राजक्त झावरे पाटील

एका सामान्य युवकाची उदयनराजे विषयी भावना….

प्रतिक्रिया एका सामान्य युवकाची

उदयनराजे भोसले यांनी , गोर – गरीब कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण क्षेत्रात एन्ट्री केली.

iSupportUdayanRaje

iSupportUdayanRaje

ज्या सातारकरांनी आपल्यावर इतकं प्रेम केलय त्यांची सेवा करणे हा एकमेव उद्देश ठेऊन महाराज काम करत राहिले आहेत .

उदयनराजे

उदयनराजे

सातारच्या जनतेला कोणा कारखानदार, जमीनदार, राजकारणी, गुंडा – पुंडाचा त्रास झाला तर उदयनराजे त्याचा न्यायनिवाडा करीत असत.

udayanraje

यामुळे आपल्या आर्थिक – राजकीय हिताआड येणारे उदयनराजे येथील कारखानदार, संस्थाचालक, यांना डोकेदुखी तर सातारकरासाठी मसिहा झालेत.

Udayan Raje Facebook Post

Udayan Raje Facebook Post

आज ज्या खोट्या गुन्ह्यात उदयनराजेंना अडकवल आहे ते प्रकरण ही असच आहे.

सोना अलंयसीस कंपनी मधील कामगार युनियन वाले कंपनी मालक जैन यांच्या हुकूमशाही ( कामगारांचा शोषण करण्यात गुजर मारवाडी अग्रेसर आहेत)

udyanmaharj

विरोधात काही तक्रारी घेऊन उदयनराजे यांचेकडे आले होते तो विषय आपल्या स्टाईल ने महाराजांनी सोडवला पण ज्या लोकांना उदयनराजे डोकेदुखी बनले होते त्या लोकांनी जैनची छाती 56 इंच इतकी फुगवली अन यात महाराजांच्या विरोधात मोठा कट रचला गेला यात जैन यांचे शहा मोदी संबंध कामी आले.

कष्टकरी सर्वसामान्यांसाठी लढताना उदयनराजे आज न्यायालयीन कोठडीत गेले पण खंडणी मागितली म्हणून उदयनराजे यांची प्रतिमा खराब करण्याचा डाव फसला गेलाय .

UdayanRaje With Car

UdayanRaje With Car

जनतेच्या काळजात महाराजबद्दल प्रेम हे दुपटीने वाढलंय

महाराष्ट गर्जे
उदयनराजे उदयनराजे

प्रदीप कणसे