मुंबईचा डब्बेवाला (कधीही सुट्टी न घेणारा) आजपर्यत मुंबईचे डब्बे बंद हा प्रकार अपवादानेच घडला आहे. परंतु माथाडी कामगार जे डोक्यावर (माथ्यावर) वजन वाहतात. यांनी मराठा मोर्चात भाग घेण्याचे ठरविले आहे. १९८९ साली झालेल्या अण्णासाहेब पाटलाच्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात यांनी सहभाग घेतला होता. जवळपास ९०% माथाडी कामगार हा मराठा आहे. मराठा पैशाने सधन असतात हे म्हणा-यांनी याचा विचार करावा. कुटूंबासहीत लाखाच्यावर माथाडी कामगार मोर्चात सहभागी होणार. मुंबई, पुणे, नाशिक ईत्यादी भागातून माथाडी कामगार सहभागी होणार.

14449891_1411141918900655_3333854574070987197_n

मुंबईचे डबेवाले हे मावळ मराठा आहेत. छत्रपती शिवाजी महारांजांनी स्वराज्याचा यज्ञ जेव्हा मांडला तेंव्हा त्यात सर्व प्रथम आहुती आम्ही मावळ्यांनी दिली.घरादाराची राखरांगोंळी झाली गावावरून गाढवांचे नांगर फिरले पण मावळे कधी डगमगले नाहीत.छत्रपतीच्या काळात आम्ही हातात ढाल तलवार घेऊन गड किल्ले चढत होतो.व आत्ताच्या काळात हातात जेवणाचे डबे पायर्या आणी दादर चढून पोचवत आहे. त्याची डब्बेवाल्यांना खंत नाही. कारण छत्रपतींच्या काळातही युध्दाचे व्यवस्थापन शास्त्र आमचे कडे होते त्याला गनिमीकावा म्हणटले जायचे.तो गणिमीकावा आजही जगातील काही विश्वविद्यालयात शिकवला जातो आहे. राजे गेले महाराजे गेले काळाच्या ओघात मावळे ही मुंबईत डबेवाले झाले. पण आज ही जगातील काही विश्वविद्यालयात डबेवाल्यांचे व्यवस्थापन शास्त्र शिकवले जाते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

मराठा माणुस जे काम करतो ते निष्ठेने करतो याचा प्रत्यय म्हणजे मुंबई डबेवाल्याच्या मॅनेजमेंटची गिनीज बुकात उत्कृष्ट म्हणुन नोंद आहे. सन१८९० पासून हे काम आजपर्यंत अविरत सुरु आहे. त्याच्याविषयी थोडी माहिती आम्ही सदर लेखात देत आहो.
मुंबईतील डबेवाले तर नियोजनासाठी, प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनोख्या “नेटवर्क’ने आता अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूललादेखील भुरळ पाडली असून त्यामुळे या डबा संस्कृतीची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे.

81GKbW5tHmL

रोज हे पाच हजार डबेवाले मुंबानगरीत तब्बल दोन लाख जेवणाच्या डब्यांचे वितरण कसे करतात, त्यांच्याकडून डबे देताना आणि जमा करताना एकही चूक कशी होत नाही, मुंबईसारख्या इतक्या दाट लोकवस्तीच्या महानगरात या मंडळींनी हा चमत्कार वर्षानुवर्षे कसा करून दाखवला, याचे कौतुकमिश्रित कोडे हार्वर्ड स्कूलमधील तज्ज्ञांनाही सुटलेले नाही.

बोस्टनहून हार्वर्डचे एक प्राध्यापक खास या मोहिमेवरच मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर तेथील आणखी दोघे प्राध्यापकांचे विशेष संशोधनासाठी वरळीतील संशोधन केंद्रात आगमन झाले. या कालावधीत हार्वर्डच्या सदर तिन्ही प्राध्यापकांनी डबेवाल्यांबरोबर मुंबईभर पायपिट केली. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या आणि या डबे संस्कृतीतील बारकावे जाणून घेतले. मानवी बळाचा खुबीने वापर करून ही एवढी मोठी कामगिरी एकही चूक किंवा त्रुटी न राहता बिनबोभाट पार पाडली जाते.

dabba-6

कौतुकाचा पुढील टप्पा म्हणजे हार्वर्डने या अहवालाची जगभरातील विविध संस्थांना विक्री करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेतील अनेक औषध कंपन्यांनी भारतीय आयुर्वेदाचा तपशीलवार अभ्यास करून उच्च दर्जाची औषधनिर्मिती केली आहे. त्यातून ते कोट्यवधी डॉलर्स कमावत आहेत. आता हार्वर्ड स्कूलवाल्यांनी या डबेवाल्यांच्या कार्यसंस्कृतीतून डॉलर्स जमा करायचे ठरवले आहे. दुर्दैवाची बाब अशी की, आपल्या महाकाय देशातील एकाही बिझनेस स्कूलला यासारखे “जरा हटके’ विषय घेऊन त्यावर संशोधन करावे, असे वाटले नाही. यालाच म्हणतात पिकते तिथे विकत नाही! अर्थात, मुंबईच्या या डबेवाल्यांची कीर्ती यानिमित्ताने सातासमुद्रापार पोहोचली हे काय कमी झाले.

03-prince-charles-dabbawalas

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी जेव्हा मुंबईला भेट दिली तेव्हा तेथील अनोखी डबा संस्कृती पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर जेव्हा कॅमेला पार्कर बोल्स यांच्याशी चार्ल्स यांचे शुभमंगल पक्के झाले तेव्हा त्यांनी या डबेवाल्यांना खास आमंत्रण दिले होते. डबेवाल्यांनीदेखील त्यांच्या या प्रेमळ विनंतीला मान देऊन त्यांना मराठमोळी भेट पाठवून दिली होती हे वाचकांना आठवत असेलच.

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>