09 ऑक्टोबर : राज्यभरात लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मराठा मोर्च्याचं वादळ आता ट्विटरवरही धडकलंय. आज ट्विटरवरही एक मराठा लाख मराठाचा एल्गार पाहण्यास मिळालाय. ट्विटरवर #MarathaKrantiMorcha हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला. 1 लाख ट्विटचा टप्पा पार करून *#MarathaKrantiMorcha* हा हॅशटॅग रविवारी सातव्या स्थानावर होता.

मराठा क्रांती मोर्चा आयटी टिमकडून आज ट्विटरवर मराठा क्रांती मोर्चा या हॅशटॅगच्या रुपात मोर्चा काढण्याचं आयोजन केले होते. सकाळी 10 वाजेपासून या ट्विटर मोर्चाला सुरुवात झाली. पण दुपारी 1.30 च्या सुमारास अखेर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग ट्रेडिंगला आला. आधी 10 व्या आणि नंतर सातव्या स्थानावर ट्विटरवर ट्रेंडिंगला येऊन रविवारी दिवसभर ट्विटरवर Top टेनमध्ये हा हॅशटॅग झळकत होता.कपिल शर्माच्या एका ट्विटला उत्तर देणारे मुख्यमंत्री आज एक लाख ट्विट असुनही कुठल्याही ट्विटला उत्तर देऊ शकले नसल्यामुळे नेटिझन्समधे संताप दिसुन आला.अश्याप्रकारे मोहिम भविष्यात ही राबविण्यात येणार आहे असे मराठा क्रांती मोर्चा आयटी टीम कडून कळवण्यात आले आहे. ट्विटरवरून आलेल्या अधिकृत माहीतीनुसार रविवारी सायंकाळपर्यंत या हॅशटॅगवर जवळपास 1 लाख 30 हजाराच्यावर ट्विट झाले होते.

Comments (9)

 • satish y kad

  एक मराठा लाख मराठा

 • sandipkumar Baviskar

  आमचा संयम ही आमची मजबुरी समजु नका

 • Yogesh S Phadtare

  Cm sir purvi kopardi ata nashik he kay chalu ahe ya shivaji maharaj maharashatrat.

 • Mohite Sudarshan

  Ek Maratha lakh Maratha.

 • sujit ghatshile

  एक मराठा लाख मराठा *जयोस्तुमराठा*

 • Dattattay phadtare

  Ek maratha ek lakh matatha

 • Hemantkumar Deshmukh

  पावन आहे या महाराष्ट्राची माती, राष्ट्रहिताच्या बदलाची महूर्तमेढ वेळोवेळी याच मराठी मातीत रोवली जाते. ज्ञानोबा तुकोबांची संत परंपरा असो, शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य असो
  आत्ताची मराठा क्रांतीमोर्चाचा आधार घेऊन समान नागरी कायद्याकडील देशाची वाटचाल असो.राष्ट्रहिताचे बदल घडवण्याची दानत ही मराठी रक्तातच आहे.

 • Rajesh kharade

  एक मराठा लाख मराठा

 • Santosh Jadhav

  एक मराठा लाख मराठा *जयोस्तुमराठा*

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>