मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै.सामनाच्या दि.२५ सप्टेबंर रोजीच्या अंकात ‘मराठा क्रांती मोर्चा’ व शहीदांच्या बाबत व्यगंचित्राच्या माध्यामातून केलेल्या अश्लाघ्य टिप्पणी विरोधात आज मराठा समाजात तीव्र संताप दिसून आला. या निषेधार्थ आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात, ठिकठिकाणी दैनिक सामनाच्या अंकाची होळी करुन रोष व्यक्त करण्यात आला.

img-20160926-wa0011
सकल मराठा समाजाच्या वतीने आज राज्यातील नांदेड,औरंगाबाद, बीड, परभणी, जळगाव, यवतमाळ, रत्नागिरी, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, पुणे ,सोलापूर, कोल्हापूर आदी शहरासह संपूर्ण राज्यभरात शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दै.सामनाची जाहीर होळी करण्यात आली. अहमदनगर येथे शिवसेना उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेबाहेर मराठा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सामनाच्या अंकांची होळी करण्यात आली. याबाबत आज दिवसभर सोशल मिडियावर मराठा समाजातील युवकांची तीव्र प्रतिक्रिया दिसून आली. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे मोर्चे सुरु असताना त्यामध्ये महिला,युवती मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत असताना या मोर्चाची दै.सामनातून उडवलेली खिल्ली ही निर्लज्जपणाचा कळस असल्याची भावना आंदोलकामधून व्यक्त झाली. याबाबत दै.सामना विरोधात लातूर,औरंगाबाद येथे पोलिसांत अधिकृत तक्रार करण्यात आली आहे.जर दै.सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आपला माफीनामा दिला नाही तर त्यांना महाराष्ट्रात फिरु न देण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्याकडून दिला गेला आहे.

img-20160926-wa0018

Comments (3)

 • Girish

  Don’t just burn, stop subscription immediately. If Marathas don’t buy, it will have to be closed down.

 • krishna deshmukh

  plz dont buy saamna news paper if u have 1 maratha lakh maratha

 • Maratha

  मला वाटतंय कि मराठ्या मोरच्याला हिंसक वळण लागावे म्हणून हे छापले असेंन पण मराठयानी शांत राहावे असे मला वाटते

  चूक जाहली असेल तर त्याचा विरोध हा शांततेच्या मार्गानेच जाहला पाहिजे उगाच माथेफिरून मराठयानी आंदोलन नष्ट करू नये,
  जसे जाट, पटेल पाटीदार समाजाचे आंदोलन हिंसक होऊन नष्ट जाहले तसे मराठ्यांचे होऊ शकते
  म्हणून ही लढाई बळाचा वापर न करता बुद्धीने जिंकली पाहिजे
  कृपा करून आंदोलनाला वेगळे वळण देऊन नका

  याचा बदला निवडणुकीत / दसरा मेळावा अशा अनेक कारणांमधे घेता येईल हे विसरु नका

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>