anonymous maratha

सगळीकडे असा मेसेज फिरतोय की, आजवर मराठा नेत्यांनी समाजासाठी काय केले किंवा मराठा नेत्यांनी काहीच केलं नाही म्हणुन आरक्षण मागायची वेळ आली आहे !

जे असा प्रश्न विचारतात त्या सर्व लोकांनी ही पोस्ट सविस्तरपणे वाचाच…

१ मे १९६० रोजी पुर्वीच्या द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन मराठी भाषिक लोकांचा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्रात पायाभुत सुविधांची अत्यंत कमतरता होती. रस्ते, वीज, पाणी, अन्नधान्य याची टंचाई होती. दुधदुभते, पशुव्यवसाय, फळबागा, नगदी पीके, रोजगार, व्यवसाय, दळणवळण हे सुद्धा नगण्यच होते. जवळपास सर्व शेतकरी कुटुंबांत ज्वारी-बाजरी हेच मुख्य अन्न होते. दारिद्रय, उपासमारी, अनारोग्य, बेरोजगारीचे प्रमाण भयानक होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदचंद्रजी पवार, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील, नारायण राणे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे मराठा मुख्यमंत्री लाभले.

यशवंतरावजींच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात प्रशासकीय, पायाभुत, आर्थिक, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी विकासाचा पाया घातला गेला. त्यांनी कोयना आणि उजनी प्रकल्पांच्या उभारणीला गती दिली. त्यातुनच पुढे राज्यात हरितक्रांती यशस्वी झाली. शंकररावजींच्या काळात प्रामुख्याने जलसिंचन सुविधांचा विकास झाला. जायकवाडी, उजनी, अप्पर वर्धा, काळ, काळीसरार, अरुणावती, विष्णुपुरी अशा कितीतरी प्रकल्पांच्या कालव्यांतुन वाहणाऱ्या पाण्याने शेतीचे आणि पिण्याचे प्रश्न सुटले. वसंतदादांच्या प्रयत्नांतुन सहकार क्षेत्र विस्तारले. त्याच्या जोरावर राज्यात वैद्यकीय, इंजिनिअरिंग व आयटीआय शिक्षण ग्रामीण भागात सुरु झाले आणि औद्योगिक विकास टप्प्यात आला. समतोल विकास, अनुशेष अशा संकल्पना राबवुन त्यांनी राज्याच्या सर्वसमावेशक विकासाची वाट निर्माण केली. शरद पवार साहेबांच्या काळात राज्य आणि देशातही अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्णता, फळबागा विकास, महिला सक्षमीकरण, रचनात्मक कार्याचा डोंगर उभा राहिला. बाबासाहेब भोसलेंनी मुलींसाठी अनेक शैक्षणिक सवलती लागु केल्या, तसेच स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तिवेतन सुरु केले.

या सर्वांच्या योगदानातुन राज्यात विकासाची चळवळ सुरु झाली. त्यांच्या कष्टामुळे महाराष्ट्रात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण झाले. त्या सहकारी संस्थांमध्ये सर्व समाजांचे लाखो शेतकरी, वाहतुकदार, कायम/हंगामी कामगार कामाला आहेत. हे कामगार काय बाहेरच्या देशातील आहेत का ?

दुग्ध, कुक्कुटपालन, पशुपालन, कृषिपुरक व्यवसायाला चालना कुणामुळे मिळाली ?

सहकारातुन उभ्या राहिलेल्या ज्या शिक्षणसंस्था आहेत त्यात काय परदेशातील मुले शिक्षण घेतात काय ?

ज्या शेतात ज्वारी बाजरीसारखी तृणधान्ये आणि तूर मटकीसारखी कडधान्येसुद्धा पिकत नव्हती, त्याच शेतात आज ऊसाचे मळे आणि केळी, डाळींब, मोसंबी, चिक्कु, आंबा, बोर, पेरु, सिताफळ, द्राक्षांच्या बागा कुणाच्या धोरणामुळे उभ्या आहेत ?

FRUITS

फळबाग

कित्येक योजना शेतकरी बांधवासाठी याच महाराष्ट्रात राबवल्या गेल्या.

पाझर तलाव, फळबाग लागवड अनुदान, ठिबक सिंचन, सबसिडी, कर्जपुरवठा… किती सांगावे इतकं काम महाराष्ट्रात उभ राहिलेले दिसुन येईल. ज्यांना साधे २५ हजाराचे कर्ज मिळत नव्हते त्यांना आज लाखांच्या पटीने कर्ज मिळतं, ते ही पिककर्ज असेल तर फक्त ५% व्याज दर आकारला जातो. हे कुणाच्या प्रयत्नामुळे ?
खुप काही लिहता येईल, पण बिनडोक वाचणार नाहीत. महाराष्ट्रात कित्येक तरुणांना रोजगार देणाऱ्या एमआयडीसी, दुध संघ, साखर कारखाने, रेशीम उद्योग, बाजार समित्या, शैक्षणिक संस्था यांना हे सगळे जण विसरुन गेले आहेत.

bajar samiti rajgurunagar

bajar samiti rajgurunagar

ज्यांनी साधी पिठाची गिरणी काढली नाही, त्यांच्या भडकाऊ भाषणामुळे मुंबईत हप्ते चालु झाले आणि मुंबईतील सगळ्या कापड गिरण्या बंद झाल्या.
कुणी बंद पाडल्या याचा हिशेब कुणीच विचारत नाही. यांनी करोडोंची कोहीनुर मिल कशी घेतली हे विचारणार कोण ?
परंतु नेहमी मराठा, ओबीसी नेत्यांच्या भ्रष्टाचाराची नुसती पोकळ चर्चा करायची, शिक्षण संस्था, कारखाने यांच्या कामाचा हिशेब मागायचा, हाच दुटप्पीपणा नाही का ?

आपले मेंदु कित्येकांनी काही लोकांकडे गहाण टाकले आहेत. त्यांनी काहीही लिहायचे आणि आमच्या बिनडोकांनी पुढे पाठवायचे.

काम करत असताना माणसे चुकतात. ती कुठल्याही पक्षातली असली तरी चुकतात. नागपुरच्या पुर्ती घोटाळ्याचे काय झाले ? माहित नाही, कोण त्यावर बोलतही नाही. चिक्की, डाळ घोटाळ्याचे काय झाले याची चर्चा होणार नाही. ज्यांचा जन्म ऊसाचे फडात झाला त्यांनी इतके कारखाने, बँका, शिक्षणसंस्था कशा काढल्या याचा हिशेब आमच्या पोरांना कळणारच नाही. आमचे लोक हिशेब फक्त मराठा नेत्यांचाच विचारणार.

कित्येक गोष्टी लिहता येतील. मराठा नेत्यांनी सहकारी संस्था काढल्या. प्रायव्हेट लिमिटेड संस्था काढल्या असतील तर त्याही थोडक्याच. त्याच्यावरुनच आम्ही गजहब करणार. मात्र बाकीच्यांनी सहकारी संस्था नगण्य तर मोठ्या प्रमाणावर काढलेले खाजगी उद्योग तुम्हांला दिसणार नाहीत, कारण तुम्ही कोणाकडे तरी अक्कल गहाण टाकलेली असते.

मराठा समाज आरक्षण का मागतोय ? तर गेली अनेक वर्ष दुष्काळ, नापिकी, गारपीट, वादळ अशा नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता शेतमालाच्या हमीभावाच्या सरकारी संकटाला तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी हतबल झाला आहे. कित्येकांनी गावे सोडली. गावातील तरुण बेकार झाला. त्यामुळे तरुण शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. साध्या एसटी पासला पैसे नाहीत म्हणुन चिमुकलीला जीव द्यावा लागतो. पण या संवेदनाहीन सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
click by akshay ingle

नुसतेच महोत्सव, धार्मिक कार्यक्रम, कुंभमेळा, जाहिरातबाजी यासाठी करोडोंची उधळण केली. सरकारी नोकर भरती कपात केली. निर्यात बंदीमुळे शेतकरी भरडला गेला. त्यातुन नैराश्य आले. शिक्षण परवडेनासे झाले. नोकरीची हमी राहिली नाही. त्यामुळे आज बहुसंख्य मराठा शेतकरी आरक्षण मागतोय. त्याला कर्जबाजारी सरकारनेच केले आहे, म्हणुन शेतकरी कर्जमाफी मागतोय. पण हे हलायला तयार नाहीत. हा आक्रोश कमी करण्यासाठी काही महाभागांनी मराठा नेत्यांनीच काही केले नाही अशी कोल्हेकुई चालु केली. शेतकऱ्यांना चार पैसे देणारे साखर कारखाने व ऊस धंदा बंद कसा पडेल याचाच विचार केला. मराठा मुलांना याच लोकांनी अभ्यासाला न लावता कधी मुसलमान तर कधी दलित यांचे विरुद्ध भडकावुन टाकले.

Farmrer Indian

Farmrer Indian

यांच्या काळात सरकारी रोजगार कमी झाला. याबद्दल मराठा समाज त्यांना कधी जाब विचारणार नाही. केवळ माथी भडकावुन सत्ता मिळवणारे सतत बुद्धीभेद करतात हे तरी लक्षात घेण्याची पात्रता आमच्या लोकांमध्ये यावी हीच अपेक्षा…

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>