धुळे – सांगलीनंतर आज धुळे शहरात सकल मराठा समाजाच्‍या वतीने विविध मागण्‍यांसाठी मूकमोर्चा काढण्‍यात आला. विविध मागण्‍यांचे फलक, भगवे झेंडे आणि भगव्‍या टोप्‍या परिधान करुन लाखो समाजबांधवांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. सकाळी 9.30 पासून शहरात मराठा समाजबांधव एकत्र यायला सुरुवात झाली, परिसरातील 50 गावातून लोक पायी धुळ्यात दाखल झाले. शिवाय नाशिक आणि जळगाव जिल्‍ह्यातील मराठा बांधवांचीही मोठ्या संख्‍येने या मोर्चात उपस्‍थिती होती.

Maratha Kranti morcha dhule

Maratha Kranti Morcha at Dhule

महाराजांच्‍या पुतळ्याला अभिवादन..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पारोळा रोडवरील पुतळ्याला अभिवादन करून मराठा क्रांती मूक मोर्चाला दुपारी बारा वाजता सुरूवात झाली्. त्‍यापूर्वी काही विद्यार्थिनींनी मनोगत व्‍यक्‍त केले. विविध मागण्‍यांच्‍या पाट्या घेऊन युवक युवती मोठ्या संख्‍येने या मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी आठपासूनच देवपूरमधील एसएसव्हीपीएस महाविद्यालय, जळगाव रोड व अग्रसेन महाराज यांच्‍या पुतळ्यापासून मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने मोर्चाच्या मुख्य स्थळी एकत्र आले. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावले होते.

मोर्चात 3500 स्‍वयंसेवक..
तीन ड्रोन कॅमे-यांच्‍या मदतीने या मोर्चाच्‍या प्रत्‍येक हालचालीवर नजर ठेवली गेली. आतापर्यंत राज्‍यभरातील मोर्चामध्‍ये घडलेले शिस्‍तीचे दर्शन धुळ्यातही घडले. 3500 स्‍वयंसेवकांचा या मोर्चात सहभाग होता. मोर्चामुळे आज शहरातील शाळांना सुटी देण्यात आली होती. ठिकठिकाणी बॅरिकेट्स लाऊन वाहतूक वळवण्‍यात आली होती.

Maratha Kranti morcha dhule

Maratha Kranti morcha at Dhule

असा होता बंदोबस्‍त- माेर्चाच्या मुख्य बंदाेबस्तासाठी पाेलिस अधीक्षकांसह एक अप्पर पाेलिस अधीक्षक, चार उपविभागीय पाेलिस अधिकारी, 11 पाेलिस निरीक्षक, 45 उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, 900 पाेलिस पुरुष कर्मचारी, 90 महिला पाेलिस कर्मचारी, पाचशे पुरुष हाेमगार्ड, शंभर महिला हाेमगार्ड असे एकूण हजार 650 कर्मचारी प्रत्यक्षात माेर्चाच्या ठिकाणी बंदाेबस्तासाठी तैनात होते. पोलिसांच्या मदतीसाठी माेर्चा अायाेजकांकडून पाच हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात अाली होती. तसेच राज्य राखीव पोलिस बलाच्या तुकडीचे दाेन प्लाटून, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचा बंद अाणि दहशतवादविराेधी पथक, बाॅम्बशाेधक पथकातील कर्मचारीही माेर्चाच्या वेळी उपस्थित होते.

– article originally published in divyamarathi.com

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>