maratha kranti morcha kolhapur

कोल्हापूर दिनांक:15 ऑक्टोबर

भगव्या पताका, भगव्या टोप्या, शिस्त आणि शांतता याच्यासोबत ‘आपली एकी तुटायची नाही‘, ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणांनी दुमलेले कोल्हापूर शहर. अशा वातावरणात आज-शनिवारी करवीरनगरीत मराठा क्रांती मूकमोर्चाचे तुफान आले. लाखो मराठ्यांच्या या तुफानाने मराठा समाजाचे क्रांती पाऊल टाकले आहे.

मोर्चाच्या माध्यमातून कोपार्डी बालात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ॲट्रोसिटी कायद्यातील काही अटी शिथिल कराव्यात, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सादर करण्यात आले. शहरातल ताराराणी चौक, गांधी मैदान, सायबर कॉलेज, पेव्हीलीयन ग्राऊंड या चार ठिकाणाहून मोर्चेकरी दसरा चौकात दाखल झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपात पाच तरूणींनी मनोगत व्यक्त केले. उन्हाचा कडाका आणि तापलेली जमीन, अशा आवस्थेतही दसरा चौकात शिस्तबध्दपणे मोर्चेकरी जमले होते. दुपारी एक वाजल्यानंतर शहराच्या चारी बाजूने दसरा चौकाच्या दिशेने मोर्चेकऱ्यांचा ओघ येत होता. कोणताही नेता नाही, नेतृत्व नाही अशा या शिस्तबध्द मोर्चाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.

लाखोंच्या संख्येने जमलेला मराठा बांधव (ड्रोन फोटो)

लाखोंच्या संख्येने जमलेला मराठा बांधव (ड्रोन फोटो)

‘स्‍वाभिमान वाटतो… मराठ्यांच्‍या एकजुटीचा’

लाखोंच्‍या संख्‍येने आलेला मराठा समाज कोल्‍हापुरातील दसरा चौकात एकत्र आला आहे. यावेळी काही रणरागिणींनी छत्रपती शाहू महाराजांच्‍या पुतळ्याजवळ उभारण्‍यात आलेल्‍या व्‍यासपीठावर उत्‍स्‍फूर्तपणे भाषणे केली आहेत.

रणरागिणी भाषणात म्‍हणाल्‍या, ‘मराठा समाज असाच वर्तमानातही एकवटला तर भविष्‍य बदलू शकते. आणि आताच त्‍याची सुरुवात झाली आहे. लाखो, कोटींचा जनसागर एकवटलेला आहेत. आम्‍ही आमच्‍या न्‍यायहक्‍कासाठी एकवटलेलो आहोत. आमच्‍या मागण्‍या पूर्ण झाल्‍या पाहिजेत. मराठी माणसाला आरक्षण मिळालेच पाहिजे. याशिवाय मराठ्यांची प्रगती होणार नाही. शिवबाचे मावळे आम्‍ही आता मागे हटणार नाही. न्‍यायहक्‍कासाठी आम्‍ही लढत आहोत. कोपर्डी घटनेचा आम्‍ही निषेध करतो. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. ॲट्रॉसिटी कायदा रद्‍द व्‍हावा, हा आमचा मुळीच हेतू नाही. ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतो, त्‍यासाठी यात बदल झालाच पाहिजे. आता आम्‍ही सहन करणार नाही. आमच्‍या न्‍यायहक्‍कासाठी हा मूक मोर्चा काढण्‍यात आला आहे. आम्‍हाला स्‍वाभिमान वाटतो, मराठयांच्‍या एकजुटीचा.’

कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चा फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Comments (2)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>