sindhudurg maratha kranti morcha image

सिंधुदुर्ग- 23 ऑक्टोबर

सळसळत्या उत्साहात अभिमानाने मिरवणारे भगवे झेंडे, भगव्या टोप्या , भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात ” चालेन तर वाघासारखेच ‘ असे सांगत तमाम मराठ्यांनी आज मराठा क्रांती मोर्चासाठी वाघाची झेप घेतली . गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले .

लाखोंच्या संख्येने निघालेल्या या विराट मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्तच झालीच. मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली . त्यांच्या हातातील विविध फलकांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडतानाही अस्सलच सिंधुदुर्गनगरीचे दर्शन घडवले .

सकाळी सातपासूनचच शहराच्या विविध ठिकाणांहून सुरू झालेला हा निःशब्द हुंकार साडेबाराच्या सुमारास महाएल्गारात रूपांतरीत झाला. आणि त्याने कोपर्डी घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई , मराठा आरक्षणासह विविध मागण्यांची एकमुखी मागणी सुरू केली.

 

रणरागिणी ताराराणींच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती . मात्र, शोभायात्रेपेक्षा ” हेच आमचे प्रेरणास्थान आहे . आम्ही पेटून उठलोय अन्यायाच्या विरोधात आणि न्याय मिळवूनच मागे हटणार , ‘ असे सांगण्याचाच प्रामाणिक प्रयत्न होता.
डोक्यावर पांढऱ्या , भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, गळ्यात स्कार्फ, साड्या आणि कोपर्डी घटनेची चेहऱ्यावर दिसणारी तिडीक अशा वातावरणात मराठा क्रांती मोर्चातील महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला . शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठमोळ्या माता-भगिनींसह तरुणी लाखोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सिंधुदुर्गाची लोकसंख्या अंदाज साडेआठ लाख, 34%मराठा समाज आहे आजच्या मोर्चात इत्तर समाजाचे लॉक सामिल होत आपला पाठिंबा दिला.

sindhudurg maratha kranti morcha image

शहरातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातील दैनंदिनी जराच वेगळीच . पहाटे उठायचे . दुभत्या जनावरांची देखभाल , चारा – पाण्याची व्यवस्था करायची , धारा काढायच्या आणि शेताची वाट धरायची . आज या कामांना सुटी देत ऐतिहासिक ” मराठा मोर्चा ‘च्या साक्षीदार होण्यास आतुर झालेल्या महिलांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनाने शहरात दाखल झाले .

पहाटेपासूनच शहराच्या वेशीवर थंडीची तमा न बाळगता दिवसभर लागणारी न्याहरी सोबत घेऊनच त्या वाहनातून उतरल्या. तेथून थेट चालत मोर्चाच्या मार्गावर सहभागी झाल्या .

 

घराला कुलूप ‘, चूल बंद करून मोर्चात सहभागी व्हा , या संयोजकांच्या व मराठा कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने महिला घराला कुलूप लावूनच मोर्चात उतरल्या. मोर्चात महिला , तरुण अग्रभागी राहिल्या . या महिलांना पुढे जाण्यासाठी वाट करून देण्यापासून ते रस्त्याच्या एका बाजूला त्यांना सहभागी करून घेण्यासाठी स्वयंसेवकांचीही धांदल उडाली.

 

” ना नेता , ना घोषणा ‘ असे स्वरूप असलेल्या या मोर्चाबाबत ग्रामीण भागातील महिलांत मोठी उत्सुकता होती . राज्याच्या इतर जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्याने सिंधुदुर्गच्या मोर्चात कधी सहभागी होतोय , अशाच काहीशा भावना या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या . त्यामुळे ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे महिला सहभागी झाल्या . अनेक महिलांच्या कडेवर लहान मूल, हाताचे बोट धरून चालणारी मुलं – मुली आणि ज्येष्ठ महिलांना सांभाळत निघालेल्या तरुण मुलींनी मोर्चा यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग घेतला आहेङा .

maratha-kranti-morcha-sindhudurg-3
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी , मराठा समाजाला आरक्षण मिळावे , ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा , शेतीमालाला हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना च मिळावी या मोर्चाच्या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते . मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना जागोजागी पाणी, खाऊ , फळे वाटप करणारे पाठबळ देत होते.
सकाळी दहापासून सुरू झालेल्या फक्त एक मराठा लाख मराठा दिसू लागला. वैद्यकीय पथक , नाश्ता , चहा पाण्याची सोय आणि स्वयंसेवकांची नम्रता हे येथील ठळक वैशिष्ट्य दिसून येते होते.
रविवारी सकाळपासूनच मोर्चाची वर्दळ सुरू झाली होती . दुचाकी, चारचाकींमधून येणाऱ्या सर्व वाहनांना नियोजनबध्द पार्किंगची सोय केली होती.तसेच वैंद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात होती.कसाल जैतापकर कॉलनी येथे स्वयंसेवकांनी पार्किंगसाठी योगदान दिले . येईल त्याचे आपुलकीने स्वागत करणारे शेकडो स्वयंसेवक ठिकठिकाणच्या मार्गावर थांबून होते.पोलीसांचा वॉच सुरूच होता. सिंधुदुर्गनगरीत येणाऱ्या लोकांना शेकडो स्वयंसेवक नम्रतेने मार्गदर्शन करीत होते.येथील शासकीय मैदानावर पार्किंगचे शिस्तबद्ध नियोजन होते . येणारा प्रत्येक जण शिस्तीचे पालन करीत होता .
चारचाकी , दुचाकी, रुबाबदार बुलेटवर भगवा झेंडा , डोक्यावर भगव्या टोप्या घालून , ग्रामीण भागातील लोक टेम्पो , जीप भरून जथ्याजथ्याने येत होते.साधारण दहाच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी गजबजू लागली होती. अबालवृद्धांचा सहभाग मोर्चात वेगळीच ऊर्जा निर्माण करीत होता . साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य चौकात गर्दी वाढली . बघताबघता मुख्य चौक भगवा दिसू लागला. बहुतांशी लोकांच्या हातात भगवे झेंडे होते. ” एक मराठा लाख मराठा ‘ असे लिहिलेले टी शर्ट घालून राबणारे तरुण स्वयंसेवक सर्वांना नम्रतेने मार्गदर्शन करीत होते शिवाजी चौकात एका बाजूला घातलेल्या व्यासपीठावरील स्पीकरवरून सर्वांना मार्गदर्शक सूचना दिल्या जात होत्या. बघताबघता मोर्चाची वेळ होत होती.आणि एक मराठा लाख मराठा ‘ दिसत होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी. यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे सुरू आहेत.सिंधुदुर्गातील मोर्चा ” न भूतो न भविष्यति ‘ असा असेल, अशी वातावरणनिर्मिती गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू होती . आज प्रत्यक्षात सिंधुदुर्गवासियांना याची अनुभुती आली . ” ना नेता , ना घोषणा ‘ हे राज्यभरातील मोर्चांचे स्वरूप सिंधुदुर्गातही कायम होते . मोर्चात मोर्चाला अनेक समाजाने पाठिंबा देत मोर्चात काहीजण सहभागी झाले होते.

Comments (2)

  • Hemantkumar Deshmukh

    मासाहेबांचे शिवरायांचे स्वप्न पूर्ण होणार! अठारा पग्गड़ जाती पुनः एक होणार !!समाज बादलतोय.

  • Hemantkumar Deshmukh

    मासाहेबांचे शिवरायांचे स्वप्न पूर्ण होणार! अठारा पग्गड़ जाती पुनः एक होणार !!समाज बादलतोय

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>