मुंबई मराठा क्रांती मोर्चावरुन परतत असताना अपघात होऊन आपले काही मराठा बांधव अपघातात मरण पावले. मागच्या वर्षी देखील काही ठिकाणी झालेल्या मोर्चादरम्यान अपघातात आपले काही बांधव मरण पावले होते. या सर्व बांधवांना आपण श्रद्धांजली अर्पण केली. परंतु श्रद्धांजली अर्पण केली म्हणजे आपलं काम संपलं का ? तर नाही ! आपल्या बांधवांनी जीव गमावलाय रे जीव. ते आता आपल्यात कधी परत येणार नाहीत. समाजाच्या कामासाठी जातोय म्हणुन त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मोर्चासाठी पाठवले. परंतु त्यांना काय माहित होतं त्यांची म्हातारपणाची काठी अशी नियती हिरावुन घेईल. मराठा क्रांती मोर्चामुळे त्या बांधवांनी जीव गमावला. त्यांच्या कुटुंबियांना आधाराची गरज आहे. समाज म्हणुन प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे.

20664545_1271021676376841_2152373746136491721_n

ही बांधव सर्व मृतांच्या कुटुंबियांना आपण आर्थिक मदत करुया का अशी विचारणा करत आहेत. तयारी दाखवत आहेत. प्रत्येकाच्या भावनांचा आम्हाला आदर आहे. परंतु कितीही चांगले, कितीही प्रामाणिक पारदर्शक काम केलं तरी, जिथं आर्थिक गोष्टी घडतात तिथं काम करणाऱ्यांकडे लोक नाहक संशयाच्या दृष्टीने पाहतात हा अनुभव आहे. अशा गोष्टींतुन होणाऱ्या मानसिक त्रासामुळे चांगल्या कामात पुढाकार घ्यायला कोण व्यक्ती धजावत नाही. उलट जे काम करत आहेत त्यातुनदेखील ते परावृत्त होतात. या फेसबुक पेजवर काम करणारी लोकंही अशीच सेवाभावी वृत्तीने काम करणारी आहेत. त्यासाठी सर्व लोकांची मते घेऊनच असे काम हाती घ्यावे की नाही याचा निर्णय घेणार आहोत.

कृपया आपले मत कळवावे ही विनंती !

20728063_822592111252989_9174769033723669836_n

http://www.facebook.com/MarathakrantiMaharashtra

Home

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>