एकीकडे शाहिस्तेखानाचे स्वराज्यावर आलेले संकट आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढात असे दुहेरी संकट ओढ़ावले असताना शिवाजी महाराजांना या वेढ्यातून बाहेर पडणे आवश्यक होते. याच समयी सिद्दी जोहरशी तहाची बोलणी करून त्याला गाफील ठेवण्याचे राजकारण छत्रपती शिवरायांनी केले आणि १३ जुलै १६६० रोजी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुखरूप निसटले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय मुत्सद्दीपणा, नियोजनबद्धता, गुप्तहेर खात्याचे अचूक काम, प्रसंगावधानता, धाडस या सर्व गुणांची वेढ्यातून सुटका करून घेताना प्रचिती येते. बाकी एकाचवेळी घडणार्या अनेक घटना, संबंधित घटना ज्या भागात घडली आहे असे दर्शवले जाते तेथील भौगोलिक परिस्तिथी आणि समकालीन व उत्तरकालीन साधने यातील विसंगतीमुळे हे जे पन्हाळगड ते विशाळगडच्या मार्गात असलेल्या खिंडीत युद्ध झाले किंवा विशाळगडाच्या पायथ्याशी युद्ध झाले याचे निष्कर्ष काढण्यास अवघड आहे तरीही काही प्रचलित इतिहासानुसार जी माहिती समोर येते त्यात बांदल यांच्याकडील रायाजी बांदल, बाजी बांदल तसेच शंभूसिंग जाधव आणि बांदलांचे चिटणीस बाजीप्रभु देशपांडे यांच्यासहीत कैक अनामिक मावळे यांचा पराक्रम आणि हौताम्य आपल्यासमोर येतो. बाकी आपल्या स्वकृत्व आणि योजनाबद्ध रणनीतीमुळे शत्रूला आसमान दाखवत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून विशाळगडावर सुखरूप पोहचले ..

बांदल घराण्याच्या पराक्रमाच्या अखंड परंपरेला व बाजीप्रभु देशपांडे, शंभूसिंह जाधव तसेच कैक अनामिक मावळ्यांच्या बलिदानाला मानाचा मुजरा..

राज जाधव

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>