Kolhapur Ambadevi

पुजारी हे गाभार्याचे मालक नाही, मंदिराचे नोकरच आहेत – शाहू छत्रपतींचा वटहुकुम !

‘करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्री पूजक’ अशी बिरुदावली मिरवत पिढ्यानपिढ्या अंबाबाई देवी आणि मंदिर स्वताची जहागीर असल्याच्या थाटात श्री पूजक वागत आहेत आहेत.

मावा-गुटखा खाऊन मंदिरात येणे ,मंदिर परिसरात व्यसन करणे , देवीच्या मूर्तीवरील निकृष्ठ रासायनिक प्रक्रिया, दानपेटीतील रकमेचे ,लाडू प्रसादाचे गैरव्यवहार यासंबंधी आधीच या श्री पुजार्यांवर दोषारोप आहेत. त्यात छत्रपतींचा अवमान करून यांनी स्वतःच मंदिरातील अस्तित्व संपवण्याकडेच वाटचाल केलीये.

मंदिरातील हक्क आणि उत्पन्न यासंदर्भात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी वटहुकूम रोजी काढला होता. त्यात ही बाब स्पष्टपणे मांडली आहे. श्रीपूजक हे गाभाऱ्याचे मालक नाहीत, ते नोकरच आहेत, असे या वटहुकूमात स्पष्ट नमूद केले आहे.

राजर्षी शाहू महाराजांचा वटहुकूम १४ मे १९१३ , ठराव नं. ८२१ खालीलप्रमाणे –

“शुक्रवारपासून गुरुवार असे श्रीकडील पूजा, अर्चा वगैरे जे आमिष घेणेचे आहे. त्याप्रमाणे प्रत्येक पुजारी यास आठवडा येत असतो. त्याप्रमाणे हे पुजारी आपली खासगी मिळकत हक्क सांगून वहिवाट आपल्या मर्जीस येईल त्याप्रमाणे करतात. ती सरकारी देणगी समजण्याची आहे. या वाराबद्दल मृत्यूपत्र, दत्तकपत्र, बक्षीसपत्र, दानपत्र, खरेदीपत्र, गहाणपत्र अशी कागदपत्राच्या व्यवस्थेसाठी पुजाऱ्यांनी सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.”

Shahu Raje

Shahu Maharaj Farman

श्री पुजकांच्या उत्पन्नाबाबतचे हुकुमातील नियम-

“भक्त देवीला अर्पण करीत असलेले तांबा, पितळ, सामान, भांडी, कंदिल, समया, घाटी वगैरे जिन्नस सरकार जमा करावेत. चांदी, सोन्याचे दागिने, नेत्र, भांडी वगैरे जे येतील ते सर्व सरकारजमा करावे. केवळ दहा रुपये आतील माल पुजाऱ्यांनी न्यावयाचा असून बाकी माल सरकारकडे जमा करावा. तसेच कापडी डागाबद्दल चिरड्या, लुगडी, खण जिन्नस पुजारी यांनी नेण्याचा असून, महावस्त्र, पैठण्या हे सर्व सरकारजमा करावयाचे आहे.”

शाहू महाराजांच्या वटहुकुमाचा मान राखून अंबाबाई मंदिर श्री पुजारी मुक्त करावे , तिथे सरकारी नोकर अथवा शाहूराजांनी स्थापन केलेल्या क्षत्रिय वैदिक शाळेतील उपाध्ये /पुजारी नेमावेत.

‘करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीमंत छत्रपती’ आणि कोल्हापूरकर जनताच आहे. दुसर्या कोणी हक्कही सांगू नये !

मालोजीराव जगदाळे

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>