राज्यभरात दैनिक सामना विरोधात मराठा समाजाची तीव्र निदर्शने. सामनाच्या अंकाची होळी करत व्यक्त केला संताप.

मुंबई, दि. 26 (प्रतिनिधी)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै.सामनाच्या दि.२५ सप्टेबंर रोजीच्या अंकात ‘मराठा क्रांती मोर्चा’ व शहीदांच्या बाबत व्यगंचित्राच्या माध्यामातून केलेल्या अश्लाघ्य टिप्पणी विरोधात आज मराठा समाजात तीव्र संताप दिसून आला. या निषेधार्थ आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात, ठिकठिकाणी दैनिक सामनाच्या अंकाची होळी करुन रोष व्यक्त करण्यात आला.

img-20160926-wa0011
सकल मराठा समाजाच्या वतीने आज राज्यातील नांदेड,औरंगाबाद, बीड, परभणी, जळगाव, यवतमाळ, रत्नागिरी, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, पुणे ,सोलापूर, कोल्हापूर आदी शहरासह संपूर्ण राज्यभरात शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दै.सामनाची जाहीर होळी करण्यात आली. अहमदनगर येथे शिवसेना उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांच्या पत्रकार परिषदेबाहेर मराठा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सामनाच्या अंकांची होळी करण्यात आली. याबाबत आज दिवसभर सोशल मिडियावर मराठा समाजातील युवकांची तीव्र प्रतिक्रिया दिसून आली. कोपर्डी सारख्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ शांततेच्या मार्गाने मराठा समाजाचे मोर्चे सुरु असताना त्यामध्ये महिला,युवती मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत असताना या मोर्चाची दै.सामनातून उडवलेली खिल्ली ही निर्लज्जपणाचा कळस असल्याची भावना आंदोलकामधून व्यक्त झाली. याबाबत दै.सामना विरोधात लातूर,औरंगाबाद येथे पोलिसांत अधिकृत तक्रार करण्यात आली आहे.जर दै.सामनाचे संपादक संजय राऊत यांनी आपला माफीनामा दिला नाही तर त्यांना महाराष्ट्रात फिरु न देण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्याकडून दिला गेला आहे.

img-20160926-wa0018

maratha-kranti-morcha-pune

पुण्य नगरीत अवतरली मराठेशाही – ऐतिहासिक एल्गार !

आज पुणे मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या माध्यमातून लाखो मराठ्यांनी आपल्या मागण्यांचा पुनर्रउच्चार केला. महिलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठा मोर्चाने छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पार्पण करून पुढे कूच केले. कोपर्डी नराधमांना फाशी, मराठा आरक्षण, अट्रोसिटीत बदल, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव आणि इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले. प्रथमच कुठल्याही मोर्च्यासाठी 11 पोलीस आयुक्त आणि 16 सहायक आयुक्तांना तैनात केले होते.

maratha-kranti-morcha-pune-8

 

maratha-kranti-morcha-pune

maratha-kranti-morcha-pune

शहरातील डेक्कन नदीपात्र, अलका चौक, लक्ष्मी रोड, पेठ परिसर हि सर्व ठिकाणे मराठयांनी व भगव्या झेंड्यांनी गजबजून गेले होते. मोर्च्यामध्ये इतर जाती-धर्माचे लोकही सामील झाली होती त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांचा सहभागही दिसून आला.

maratha-kranti-morcha-pune-9

यवतमाळात मराठ्या कुणब्यांचा जनसैलाब तर वाशीम मध्ये मराठ्यांचा मेळा

आज महाराष्ट्रात तीन ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधवांनी हजेरी लावली. यवतमाळ येथे भर पावसात लाखो मराठा-कुणबी समाज बांधव आज आपल्या न्याय्य हक्कांसाठी आणि मागण्यांसाठी एकत्रित आले. शहरातील पोस्टल ग्राउंड येथून मराठा क्रांती मोर्च्याची सुरवात झाली. तर वाशीम मध्ये सुद्धा पावसातच मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चा पार पाडला.

maratha-kranti-morcha-yavatmal-1

नाशिक: गोदावरीला आला मराठयांचा महापूर

आज नाशिक येथे पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चामुळे  संपूर्ण शहरात मराठा समाज्याच्या महापूर पाहायला मिळाला. माता, भगिनी, मुल बाळ घेवून, आजोबा आज्जी, शेतकरी राजा, तरूण युवक, युवारणरागिणी, नौकरदार वर्ग, नाशिक च्या मराठा क्रांती मुक मोर्चात सहभागी झाली. आजच्या मोर्च्यातही मराठ्यांची शिस्त आणि एकजूट वाखाणण्यासारखी होती.

maratha-morcha-nashik-1

शहरातील गोदावरी नदीवरून मोर्चा मार्गस्त होऊन शेवटी गोल्फ क्लब मैदान येथे सर्व मराठा बांधव एकत्र आले. नंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाज्याच्या मागण्यांचे निवेदन देऊन मोर्च्याची सांगता झाली. इतर मोर्च्यांप्रमाणे आजही मराठा स्व्ययंसेवकांनी मोर्च्या संपल्यानंतर शहराची साफ-सफाई केली.

maratha-morcha-nashik-cleaning-roads