पहिल्या मराठा दसरा मेळाव्यातुन समाजासाठी निवेदन…

जय शिवराय
आजच्या पहिल्या मराठा दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या मराठा सेवकांनी खाली दिलेल्या समाजाच्या प्रश्नांवर विचार केला व ते सोडविण्यासाठी स्वतः प्रयत्न केले तरी बराच फरक पडु शकेल.

शासनाकडुन ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्यासाठी आपला संघर्ष सुरुच आहे. पण पुढील गोष्टीची अंमलबजावणी मराठा समाजाने स्वतःच केली पाहिजे. मराठासेवक याकामी पुढाकार घेतील याची खात्री आहे.

१) मराठा समाजातील लाखो विद्यार्थी आज उच्च व दर्जेदार शिक्षणापासुन वंचित आहेत. अशा वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाची गगनभरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम समाजातील धनवंतांनी, ज्ञानवंतांनी करण्याचे नैतिक कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. यासाठी श्रीमंतांनी गरीब, होतकरु, शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी यासाठी मराठासेवकांनी प्रयत्न केले पाहिजेत.

२) मराठा समाजातील हजारो गरीब कुटुंबे, निराधार व विधवा महिला, अर्धशिक्षित कुटुंबे विविध प्रश्नांमुळे शोषित होत आहेत. सध्याच्या स्थितीत समाजातील अनेक कुटुंबांना शैक्षणिक दिशा नसते, विमा पॉलिसी नसते, आर्थिक व्यवस्थापन फसते (उदा.३ ते १०% व्याजाने सावकारी कर्जाच्या विळख्यात फसलेला समाज, दामदुप्पट करुन देणाऱ्या फसव्या योजनेत गुंतवणुक), घरगुती प्रश्न, न्यायालयीन दावे अशा अनेकविध प्रश्नांनी ग्रासले आहेत. अशा कुटुंबांनी यशस्वी जबाबदार मार्गदर्शक व्यक्तीचे, संस्थेचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. यासाठी समाजातील सुशिक्षित, यशस्वी, जबाबदार मान्यवर व्यक्तींनी अशा कुटुंबांना मार्गदर्शनाची भुमिका बजावली पाहिजे. यासाठी मराठासेवकांनी अशा कुटुंबांना व मार्गदर्शकांना एकत्रित आणण्याचा कार्यक्रम राबविला पाहिजे.

22054669_1443095292449194_476116047_n

३) मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर होणारे विवाह सोहळे/ साखरपुडे/टिळे हा एक सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांचे वार्षिक, मासिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे त्यांच्या भव्यदिव्य सोहळ्याचा प्रश्न नाही, पण जे लोक मध्यमवर्गीय आहेत, त्यांना दोन मुले, त्यांचे शिक्षण, घरांचे कर्ज यातच त्यांचे आयुष्य गेले आहे व भविष्य माहीत नाही. ज्यांनी जमिनी विकल्या त्यांच्या वाट्याला ५० लाख ते कोटभर रुपये आले आहेत. अशा कुटुंबांना “समाज काय म्हणेल?” या दडपणापोटी लग्नामध्ये इच्छा असो वा नसो, लग्नामध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. अशा समारंभापोटी माफक व झेपेल तेवढा खर्च व्हावा यासाठी मराठासेवकांनी प्रबोधन केले पाहिजे.

४) शैक्षणिक धोरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, शासकीय धोरणे, शासन निर्णय, न्यायालयीन निवाडे यांचा समाजावर चांगला वाईट परिणाम समाजावर होत असतो. यासाठी प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांनी आपले योगदान, त्यांच्या चांगल्या वाईट बाजु समोर आणल्या पाहिजेत. मराठा समाजातील निवृत्त कर्मचारी अधिकारी, विविध कंपन्यांमधुन निवृत्त झालेले अधिकारी, अभियंते, संशोधक, अभ्यासक यांनी आपल्या अनुभवाचा फायदा समाजातील गरजुंना करुन दिला पाहिजे यासाठी आपले ग्रुप तयार करावेत व मार्गदर्शकाची भुमिका स्वीकारावी. याकरिता मराठासेवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.

22089603_1661050713970039_8405226641749001103_n

५) मराठा समाजातील शेतकऱ्यांनी जमीन विकुन आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला पाहिजे. बऱ्याच लोकांनी तो बँकेत ठेवला आहे. अशा बांधवांनी नवीन उद्योग व्यवसाय सुरु करावेत. व्यवसाय धंद्यात गुंतवणुक करुन रोजगारनिर्मिती केली पाहिजे. रोजगार निर्मिती करणे सुद्धा देशाची अर्थ सेवा आहे. आपल्या उद्योगात बेरोजगारांना नोकऱ्या व पुरवठादारांना व्यवसाय दिला पाहिजे. याकरिता मराठा सेवकांनी जनजागरण केले पाहिजे.

६) विविध विचारसरणीचे मराठा बांधव एकत्र आलेले आहेत. या मंचाचा वापर समाजाच्या उत्कर्षासाठी, एकीसाठी, प्रगतीसाठी, समस्या सोडवण्यासाठी, सामाजिक दबाव निर्माण करुन सरकारकडुन प्रश्न सोडविण्यासाठी करणे आवश्यक आहे. कोणाच्याही राजकीय भुमिकांसाठी सकल मराठा समाजाच्या मंचाचा वापर वापर कोणत्याही संघटनेने, व्यक्तींनी राजकारणासाठी करु नये.

22045699_1661050763970034_6748665325735920628_n

७) मराठा माध्यमातुन एकत्र झालेला समाज एकसंध ठेवण्यासाठी दरमहा विभागवार एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी कोणतेही नेतृत्व नसलेली व दरमहा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एक समिती प्रत्येक भागात तयार करावी असे आवाहन मराठासेवकांना करण्यात येत आहे.

८) सोशल मिडीया हे दुधारी अस्त्र आहे. जसे चांगले तसे वाईटही. आपण त्याचा वापर कसा करतो त्यावर ते अवलंबुन आहे. यासाठी याचा योग्य व माफक वापर सर्वांनी केला पाहिजे. सोशल मिडीयाचा वापर खऱ्या व योग्य , उपयुक्त माहितीची देवाणघेवाण यासाठीच करावा. अफवा, मानहानीकारक, गुडमॉर्निंग, गुडनाईट पोस्ट ग्रुपवर टाळाव्यात असे आवाहन मराठासेवकांना करण्यात येत आहे.

९) मराठासेवकांनी निर्व्यसनी राहुन समाजबांधव निर्व्यसनी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

१०) छत्रपती शिवरायांनी दिलेला पर्यावरणविषयक संदेश आदर्श मानुन मराठासेवकांनी पर्यावरण या विषयावर कार्यशाळा घ्याव्यात. पाण्याचा अवाजवी वापर टाळावा. सेंद्रिय खतांचा वापर करावा. प्लास्टिकचा वापर टाळावा. जलसिंचनातुन जलसमृध्दी करावी. वृक्षतोड पुर्णतः बंद करावी. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या वाढदिवशी तसेच शिवजयंती, शंभुजयंती, शिवराज्याभिषेकदिन व इतर महत्वाच्या दिवशी वृक्षारोपण अवश्य करावे.

एक मराठा लाख मराठा.

#मराठासेवक #मराठादसरामेळावा #मराठ्यांचा_दसरा

मराठा दसरा मेळावा, पुणे

महाराष्ट्रात ५८ मराठा क्रांती मोर्चे संपन्न झाले. “मराठे कधी एकत्र येत नाहीत” हा जो न्युनगंड अनेक वर्षे मराठ्यांच्या मनात घर करुन बसला होता त्याला छेद देण्याचे काम मराठा क्रांती मोर्चांनी केले. मोर्चांमधुन श्रीमंत-गरीब, राजकारणी-समाजकारणी, आबालवृद्ध, पुरुष-स्त्रीया, शहरी-ग्रामीण, बहुभाषिक मराठे सर्व भेद विसरुन एकत्र यायला लागले. इतके की त्यांच्या एकत्र येण्याने गर्दीचे सगळे विक्रम मोडीत निघाले. मोर्चासाठी एवढ्या संख्येने समाजाला एकत्र आणणे, मोर्चा यशस्वी करणे आणि मोर्चातुन शिस्त, संयम, स्वच्छतेचा आदर्श उभा करणे या गोष्टी कितीही आदर्शवत वाटत असल्या तरी व्यावहारिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करणं हे कुठल्याही पक्ष, संघटना किंवा व्यक्तीला अशक्यप्राय आहेत. परंतु मराठा क्रांती मोर्चात ही अशक्यप्राय गोष्ट घडली आणि त्यासाठी प्रामाणिक कष्ट होते ते मराठासेवकांचे !

कोण होते हे मराठासेवक ?

maratha sevak

maratha sevak

“माझ्या समाजाचं काम आहे आणि मला त्याच्यासाठी काम करायचे आहे” हे ब्रीदवाक्य समजुन त्याच एका समान धाग्यासाठी आपले पक्ष, संघटना, विचारधारा किंवा प्रादेशिक अस्मिता बाजुला ठेवुन एकत्र आलेला मराठा म्हणजे मराठासेवक. आपली जबाबदारी ओळखुन निस्वार्थपणे समाजाच्या कामासाठी झटणारा प्रत्येकजण मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चात अंगावर पडलेलं कोणतंही काम ज्यांनी मार्गी लावले ते मराठासेवक. आपल्या लेखणीतुन, वाणीतुन, कलेतुन, कृतीतुन जिथं शक्य असेल तिथं प्रचार प्रसार करुन आपल्या लोकांना मोर्चासाठी एकत्र आणणारे ते मराठासेवक.

maratha morcha kolhapur t-shirt

maratha morcha kolhapur t-shirt

मोर्चात शिस्त संयम रहावा, कुठलाही अनुचित प्रकार घडु नये, मोर्चामुळे सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मोर्चा संपन्न होईपर्यंत आपल्या जागेवर ठाम राहणारे आणि मोर्चाच्या मागे चालुन आपल्यामुळे झालेला कचरा उचलुन स्वच्छता ठेवणारे सर्वजण मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चांतुन ज्या आदर्शवादी गोष्टी जगाने पाहिल्या, त्या गोष्टी घडवुन आणण्याच्या मुळाशी होते ते मराठासेवक. मराठा क्रांती मोर्चाचा कणा म्हणजे मराठासेवक.

कोणत्याही प्रसिद्धी, फायद्याची अपेक्षा न ठेवता मराठा क्रांती मोर्चांना प्रसिद्ध करणारे हे मराठासेवक कोण होते ? आज कुठे आहेत ? ते काय करतायत ? या प्रश्नांची उत्तरं शोधणं हे आजमितीला कुणाला गरजेचं वाटत नसले तरी ते महत्वाचे आहे. मोर्चे संपल्यावर सर्व मराठासेवक विखुरले गेले आहेत. आपापल्या जीवनात व्यस्त झाले आहेत. मोर्चांच्या काळात त्यांच्यात असणारा समन्वय आता कमी झाला आहे.

22054669_1443095292449194_476116047_n

या मराठासेवकांना परत एकत्र आणावे लागेल. त्यांच्यात परत एकदा समन्वय प्रस्थापित करावा लागेल. मराठा क्रांती मोर्चे संपले म्हणुन आपले काम संपले असे नाही. उलट काम करण्यास खुप संधी आहे. समाजाला आऊटपुट देणारे रचनात्मक आणि विधायक काम करुया. आपल्या विखुरलेल्या सर्व मराठासेवकांची मोट बांधुया.

मराठासेवकांना एकत्र आणणारे विचारपीठ म्हणजे मराठा दसरा मेळावा. आता ना कुणी अध्यक्ष ना कुणी नेता असेल. मराठा दसरा मेळाव्यात फक्त एक मराठा लाख मराठा हाच विचार दिसेल. विचारांचं सोनं लुटण्यासाठी सर्व मराठासेवकांनी अवश्य या !

22155077_1443097435782313_798261835_n

३० सप्टेंबर २०१७ सकाळी १०:३० वाजता
स्थळ – समाजभुषण विठ्ठलराव सातव जिम्नॅशियम हॉल, सहकारनगर, पुणे.

जय जिजाऊ जय शिवराय.

मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ…

मुंबई येथील ऐतिहासिक मराठा क्रांती मूक महामोर्चाला महिना लोटला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. आता आम्हीही थांबणार नाही, मराठ्यांच्या मागण्या मान्य करा, असे सांगत जिल्ह्यातील मराठा समाजाने आज साताऱ्यात सरकारचा गोंधळ घातला. मराठ्यांची ताकद काय आहे, ते पुन्हा दाखविण्यासाठी मराठ्यांची राजधानी राहिलेल्या साताऱ्यातून पुन्हा एकदा क्रांतीची ज्वाला भडकवत “आता देताय का जाताय’ असा इशाराच सरकारला दिला.

IMG-20161106-WA0077

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनाबाबत आजपर्यंत शासकीय यंत्रणेने कोणतेही निर्णायक पाऊल टाकलेले नाही. शासनाने केवळ मागण्या मान्य केल्याचे दाखवत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. मुंबई येथील महामोर्चाला एक महिना पूर्ण झाला. तब्बल 58 मोर्चे काढले तरीही मागण्यांनुसार दिलेल्या आश्‍वासनाबाबत कोणताही शासन निर्णय अमलात आणला नाही. मराठा समाजात शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा मराठ्यांनी पेटून उठत आता थांबायचे नाही, असे ठरविले. त्याची ज्वाला साताऱ्यातून पेटविली असून, येथील गांधी मैदान येथे सायंकाळी सात वाजता शासनाचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने जागरण व गोंधळ घालत अनोखे आंदोलन केले.

IMG-20161109-WA0232

बहिरे, आंधळे झालेल्या, सुस्त पडलेल्या राज्य सरकारला, देशाटन करण्यात गुंतलेल्या मोदी सरकारला जाग आणण्यासाठी हा जागरण, गोंधळ घालण्यात आला. महाविद्यालयीन युवकांनी गोंधळावेळी दिवट्या नाचविल्या. युवतींनी गोंधळ गीतावर नृत्य सादर करून मराठा समाजाचा रूद्रावतार दाखवून दिला. जिल्ह्यातील शेकडो मराठा समाज बांधव, युवक युवती यात सहभागी होत्या. या गोंधळ कार्यक्रमाने गांधी मैदानासह पुन्हा एकदा साताऱ्यातील वातावरण मराठामय झाले.

Untitled-1

फक्‍त आणि फक्‍त मराठा
या कार्यक्रमास जिल्हाभरातील मराठा बांधव, भगिणी उपस्थितीत होत्या. संयोजकांनी सर्वांना खाली बसण्याची सूचना देताच सर्वच जण खाली बसले. मग, नगराध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्या, नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य असो की उद्योजक, व्यवसायिक, नोकरदार सर्वजण सर्वसामान्य मराठ्यांप्रमाणे मांडीला मांडी लावून बसले. दरम्यान, प्रारंभी हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

IMG_3631

या सरकारला धक्‍का
या प्रसंगी “एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, क्रांतीची ज्वाला भडकणार मराठा आता उजळणार, नुसती नको पोकळ चर्चा, आधी राडा मगच मोर्चा, मराठा शक्‍तीचे विराट दर्शन झुकेल नाही तर तुटेल सरकार, मराठ्यांचा इरादा पक्‍का या सरकारला धक्‍का, नको आता आश्‍वासनं पहिलं द्या आरक्षण, आता देताय का जाताय,’ अशा घोषणांनी गांधी मैदान दणाणून सोडले.