Statue Shivaji Maharaj

८२ देशांचा राजा शिवरायांना अभिवादन करताना….

मालोजीराव जगदाळे यांचा लेख

नोव्हेंबर १९, १९२१ साली ”शिवाजी कि जय , शाहू कि जय ” च्या गजरात, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत ८२ देशांचा सर्वेसर्वा असलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स ने छत्रपती शिवरायांना अभिवादन करत भारतातल्या पहिल्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन केले.

प्रिन्स ऑफ वेल्स ने शिवरायांचा उल्लेख “Shivaji not only founded an Empire, but created a Nation.” अश्या गौरवपूर्ण शब्दात केला त्याला उत्तरादाखल राजश्री शाहू म्हणाले “हे घडू शकले कारण,मराठे हे जन्मापासूनच लढवय्ये असतात ”

१० नोव्हेंबर १९१७ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी दिल्लीत शिवाजी स्मारकाची घोषणा केली आणि नोव्हेंबर १९, १९२१ साली स्मारकाचे भूमिपूजन झाले. दुर्दैवाने मे १९२२ साली राजर्षी शाहूंचे निधन झाले परंतु त्यांचे स्वप्न महाराजा माधवराव शिंदे (मृत्यू १९२५) आणि त्यांच्यानंतर गादीवर आलेले छत्रपती राजाराम आणि पुतळ्याच्या उभारणीस झटणारे ५०० कामगार यांनी पूर्ण केले ,
IMG_3201
४,६५,००० रुपये खर्चून उभा राहिलेल्या या भव्य पुतळ्याचे १६ जून १९२८ रोजी अनावरण झाले.

राजर्षी शाहूंच्या स्वप्नातून उभा राहिलेला हा शिवरायांचा भव्य पुतळा आजही पाहताना नकळतच शाहुराजांना नमन करायला मान खाली झुकते !

maratha communitya

कोपर्डी घटना हे मराठा विद्रोहाचे मूळ नाही. संजय डी. सोमवंशी

मराठा मोर्चांच्या निमित्ताने संजय डी.सोमवंशी-पाटील यांचा हा लेख वाचण्यात आलाय.

पुन्हा चर्चेसाठी मांडतोय संजय डी.सोमवंशी-पाटील

मूळात कोपर्डी घटना हे मराठा विद्रोहाचे मूळ नाही. या महाराष्ट्रात दीर्घकाळ मराठा सत्ता होती, परवापर्यंत मराठा मुख्यमंत्री होता, आजही विधीमंडळात बसणार्या मराठा आमदारांची संख्या कमी नाही. तरीही आपल्यावर अन्याय होतो आहे. ही भावना मराठा समाजात का तयार व्हायला लागली आहे. याच्या मूळाशी जाणे गरजेचे आहे. शेती, नोकरी, इतिहास, बेरोजगारी आणि राजकारण यातील अपयश हे या विद्रोहाचे कारण आहे. त्याचा स्फोट व्हायला कोपर्डी घडावे लागले एवढाच त्याचा अर्थ आहे. ज्यांना गावगाडा कशाशी खातात हे माहित नाही त्या सर्व समाजातील नवसाक्षर वर्गाला मराठा या वर्गाचा परिचय आजही आपल्या मराठी सिनेमातून होतो. गडगंज संपत्ती, हातात सत्ता, टोलेजंग वाडा, वाड्यावर चाललेली नाचगाणी आणि डाव्या मनगटाला जरा बांधून लावण्या ऐकणारा गावाचा पाटील हीच मराठा समाजाची ओळख आमच्या मेंदूत पक्की रुतली असेल तर गावगाडा आमच्या डोक्यात जाणार कसा ?

गावातला मराठा कोणे एके काळी शंभर एकर जमीन बाळगणारा आसामी होता, काळाच्या ओघात आणि सरकारी मेहेरबानीमुळे त्याच्या गळ्यात सिलिंगचे लोढणे आले. पुढे त्याचा कुटूंबविस्तार झाला आणि नंतरची पिढी अल्पभूधारकांच्या यादीवर दिसायला लागली. ज्या पाटलाने कधीकाळी दुष्काळात गावाच्या अठरापगड जातींना आधार दिला, मदत केली तोच पाटील आता गावातल्या दारिद्र्य रेषा यादीवर दिसायला लागला. वाढत्या कुटूंबामुळे अल्पचा तो अत्यल्प भूधारक बनला, पाहता पाहता त्याचे शेतमजूरात रुपांतर कधी झाले हे कळले नाही. आता हा मराठा आर्थिक बाबतीत मागे फेकला गेल्यामुळे मूळ प्रवाहापासून तुटला, तो शहरात झोपडपट्ट्यात कधी स्थलांतरित झाला, हे ही त्याला कळले नाही. शेती पिकत नाही, शेतमालाला भाव नाही, मुलाला शिक्षण देण्यासाठी गाठीला पैसा नाही, शिक्षण नोकरीत आरक्षण नाही. अशा नाना समस्यांनी मराठा बेजार झाला आहे.

समाजाची वस्तुस्थिती

संपूर्ण गांव मराठ्यांचे असले तरी गावात मूठभर मराठा श्रीमंत, इतर सगळे त्याच्याच खटल्यावर, वाड्यावर कामाला, घरगडी अशी अवस्था गेल्या पाच दशकात झाल्याने गावाचा आधारस्तंभ मराठा पार देशोधडीला लागला आहे. राजसत्ता, धर्मसत्ता, आर्थिकसत्ता आणि प्रचार मध्यमसत्ता इथे कुठेच मराठा दिसत नाही. याला कदाचित तोच जबाबदार असेल पण या सगळ्या वैगुण्याची सल या समाजाने इतकी वर्षे मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवली आहे, हे सहपरिवार निघणारे मोर्चे त्याचा परिपाक आहे.  राज्यभरात निघणाऱ्या मराठा मूक मोर्चांची इतर कोणत्याही समाजाने उगाच धडकी भरुन घेण्याचे कारण नाही. महाराष्ट्रात ३५% असणारा हा समाज कधी अशा पद्धतीने एकत्र येईल असे कुणालाही वाटले नव्हते. आता निमित्य कोणतेही असो तो एकत्र आलाच आहे तर त्याला आपल्या सुख दुःखाची देवाण घेवाण करु द्या, आपल्या प्रगतीच्या वाटेवरील अडचणी कोणत्या? याचीही चर्चा करु द्या. तो एकत्र येतोय म्हणजे कुणाच्या तरी घरावर दगडच मारेल हे कुजके आणि कालबाह्य विचार आता इतर बहुजन समाजाने सोडून. या नव्या पर्वाचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे.

संजय डी.सोमवंशी-पाटील

maratha2

maratha community

मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज!

१७६१ च्या पानिपत युद्धामधील पराभव हा वैभवशाली मराठी इतिहासाला लागलेला सर्वात मोठा काळा डाग ठरला. या युद्धापासून मराठा इतिहासाला उतरती कळा लागली ती कायमचीच ! रोहिले आणि अफगाणांविरोधात सदाशिवराव भाऊंबरोबर नेटाने लढलेले कित्येक मराठा शूरवीर आणि सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले, तर मोजता येणार नाही इतके जण जायबंदी झाले. युद्धात सहभागी झालेली अनेक मराठा कुटुंबे लाजिरवाण्या पराभवानंतर आपल्या मायभूमीत परत गेली, तर जवळपास २९८ कुटुंबे तो पराभव सहन करत पानिपता मध्येचं राहिली. त्यांनी तेथेच आपले जीवन नव्याने सुरु केले.
road maratha

आज युद्धाच्या २५४ वर्षांनतर त्यांची लोकसंख्या दहा लाखांच्यावर आहे. मुळचा मराठी मातीतला पण सध्या पानिपतामध्ये स्थायिक असलेला आणि ‘रोड मराठा’ या नावाने प्रसिद्ध असलेला आपला बांधव आज परमुलुखात मान उंचावून जगतो आहे यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाही.

घोर पराभवाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन त्या २९८ कुटुंबांनी काळानुसार पानीपताची भूमी स्वत:ची मानली आणि तेथील संस्कृतीचा प्रत्येक घटक अंगी बाणून घेतला. पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या भागातील जवळपास २०० गावांमध्ये हा रोड मराठा समाज विखुरलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या देहबोली आणि पेहरावातचं बदल केला नाही तर आपल्या नावांमध्ये देखील बदल करून घेतले. पवारांचे पानवर झाले, महालेचे महल्ले आणि महालान झाले, जोगदंडाचे जागलन झाले.
maratha

आज पानिपतामध्ये गेल्यावर रोड मराठा समाज हा एका नजरेत ओळखता येत नाही. बहुतेक जण तर अस्सल जाट असावे असे दिसतात. परंतु बाहेरील रूपातील हा लक्षणीय बदल त्यांच्या अंतरंगातील मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान मात्र बदलू शकला नाही. अनेकजण स्वत:चा उल्लेख आवर्जून ‘मराठा चौधरी’ असा करतात आणि हा रोड मराठा समाज गर्वाने सांगतो की, आम्ही शूर मराठा सैनिकांचे वंशज आहोत.

पानिपतामध्ये फिरताना मराठी नावांच्या दुकानाच्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आपली मराठा संस्कृती जपण्यासाठी एका मुलीचा रोड मराठा बाप आपली मुलगी फक्त रोड मराठा समाजाच्या मुला घरीच देतो. हेच कारण आहे की रोड मराठा समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे

युद्धातील पराभव हा कोणाच्याही हाती नसतो. पेशव्यांनी आणि मराठ्यांनी अखंड भारत जिंकण्याची जी महत्त्वकांक्षा बाळगली तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायलाच हवा. कारण मराठे युद्धातून पळून गेले नाहीत, त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणजे त्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांचे शौर्य कित्येक पटीने जास्त आहे.

हा रोड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. येथे काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अहमद शाह अब्दाली व रोहील्यांशी लढताना मराठ्यांना आलेल्या वीरमरणाच्या शौर्यगाथेचा प्रसार केला जातो. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर महाभारत घडले म्हणून सरकारने मोठे स्मारक उभारून त्या जागेला वॉर मेमोरीयलचा दर्जा दिला. त्याचप्रकारे पानिपतामध्ये देखील शूर मराठ्यांचे स्मारक उभारून त्या जागेला देखील वॉर मेमोरीयलचा दर्जा द्यावा अशी रोड मराठा समाजाची तीव्र इच्छा आहे आणि यासाठी हरयाणा आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.

road maratha samaj

परमुलुखामधून आलेले म्हणून रोड मराठा समाजाला हरियाणामध्ये कोणीही बोल लावत नाही. हरयाणाच्या राजकारणात देखील रोड मराठा समजाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही मतदारसंघ असे आहेत जेथे वर्षानुवर्षे केवळ रोड मराठा समाजाचा प्रतिनिधीचं निवडून येतो. हरयाणातील प्रत्येक स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे.

कधी पानिपताला भेट दिलीत तर आपल्या या बांधवांची भेट घ्यायला बिलकुल विसरू नका.

—शिवांजली नाईक निंबाळकर,पुणे