maratha kranti morcha wardha

वर्धा-मराठा कुणबि क्रांती मोर्चाचे वादळ

वर्धा- 23 ऑक्टोबर

हातात भगवे झेंडे घेऊन आणि शिस्तबद्ध पद्धतीनं निघालेल्या मराठी-कुणबी मूक मोर्चात हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष, तरुण मंडळी सहभागी झाली. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास जुने आरटीओ मैदान येथून मोर्चाला प्रारंभ झाला.
मोर्चाच्या सुरुवातीला तरुणी हातात एक मराठा लाख मराठा अशा घोषणा असलेले फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या. तसेच कोपर्डी घटनेचा निषेध आणि संवैधानिक न्याय मागण्यांना मान्यता देण्याविषयीची मागणी या मूक मोर्चातून करण्यात आली. मोर्चाच्या प्रारंभी हजारोंच्या संख्येने तरुणी आणि महिला काळे कपडे परिधान करून सहभागी होत्या. यानंतर ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि सर्वात शेवट पुढारी यात सहभागी झाले होते.
या मोर्चाची लांबी तब्बल दीड किमी होती. रखरखत्या उन्हातही मराठा-कुणबी मोर्चात सहभागी झालेल्या या मोर्चेकरांनी वर्ध्याच्या इतिहासात एक नवीन नोंद केली आहे.

sindhudurg maratha kranti morcha image

सिंधुदुर्गनगरीत मराठा क्रांती मोर्चाचे विराट दर्शन

सिंधुदुर्ग- 23 ऑक्टोबर

सळसळत्या उत्साहात अभिमानाने मिरवणारे भगवे झेंडे, भगव्या टोप्या , भगवे स्कार्फ आणि निःशब्द वातावरणात ” चालेन तर वाघासारखेच ‘ असे सांगत तमाम मराठ्यांनी आज मराठा क्रांती मोर्चासाठी वाघाची झेप घेतली . गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले .

लाखोंच्या संख्येने निघालेल्या या विराट मोर्चातून कोपर्डी घटनेच्या विरोधातील चीड व्यक्तच झालीच. मोर्चात तरुणाई आणि महिलांची संख्या लक्षणीय राहिली . त्यांच्या हातातील विविध फलकांनी आपल्या न्याय्य मागण्या मांडतानाही अस्सलच सिंधुदुर्गनगरीचे दर्शन घडवले .

सकाळी सातपासूनचच शहराच्या विविध ठिकाणांहून सुरू झालेला हा निःशब्द हुंकार साडेबाराच्या सुमारास महाएल्गारात रूपांतरीत झाला. आणि त्याने कोपर्डी घटनेतील नराधमांवर कठोर कारवाई , मराठा आरक्षणासह विविध मागण्यांची एकमुखी मागणी सुरू केली.

 

रणरागिणी ताराराणींच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती . मात्र, शोभायात्रेपेक्षा ” हेच आमचे प्रेरणास्थान आहे . आम्ही पेटून उठलोय अन्यायाच्या विरोधात आणि न्याय मिळवूनच मागे हटणार , ‘ असे सांगण्याचाच प्रामाणिक प्रयत्न होता.
डोक्यावर पांढऱ्या , भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे, गळ्यात स्कार्फ, साड्या आणि कोपर्डी घटनेची चेहऱ्यावर दिसणारी तिडीक अशा वातावरणात मराठा क्रांती मोर्चातील महिलांचा सहभाग लक्षणीय राहिला . शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठमोळ्या माता-भगिनींसह तरुणी लाखोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सिंधुदुर्गाची लोकसंख्या अंदाज साडेआठ लाख, 34%मराठा समाज आहे आजच्या मोर्चात इत्तर समाजाचे लॉक सामिल होत आपला पाठिंबा दिला.

sindhudurg maratha kranti morcha image

शहरातील महिलांपेक्षा ग्रामीण भागातील दैनंदिनी जराच वेगळीच . पहाटे उठायचे . दुभत्या जनावरांची देखभाल , चारा – पाण्याची व्यवस्था करायची , धारा काढायच्या आणि शेताची वाट धरायची . आज या कामांना सुटी देत ऐतिहासिक ” मराठा मोर्चा ‘च्या साक्षीदार होण्यास आतुर झालेल्या महिलांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या वाहनाने शहरात दाखल झाले .

पहाटेपासूनच शहराच्या वेशीवर थंडीची तमा न बाळगता दिवसभर लागणारी न्याहरी सोबत घेऊनच त्या वाहनातून उतरल्या. तेथून थेट चालत मोर्चाच्या मार्गावर सहभागी झाल्या .

 

घराला कुलूप ‘, चूल बंद करून मोर्चात सहभागी व्हा , या संयोजकांच्या व मराठा कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने महिला घराला कुलूप लावूनच मोर्चात उतरल्या. मोर्चात महिला , तरुण अग्रभागी राहिल्या . या महिलांना पुढे जाण्यासाठी वाट करून देण्यापासून ते रस्त्याच्या एका बाजूला त्यांना सहभागी करून घेण्यासाठी स्वयंसेवकांचीही धांदल उडाली.

 

” ना नेता , ना घोषणा ‘ असे स्वरूप असलेल्या या मोर्चाबाबत ग्रामीण भागातील महिलांत मोठी उत्सुकता होती . राज्याच्या इतर जिल्ह्यांत निघालेल्या मोर्चाची माहिती त्यांच्यापर्यंत पोचल्याने सिंधुदुर्गच्या मोर्चात कधी सहभागी होतोय , अशाच काहीशा भावना या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या . त्यामुळे ग्रामीण भागातून उत्स्फूर्तपणे महिला सहभागी झाल्या . अनेक महिलांच्या कडेवर लहान मूल, हाताचे बोट धरून चालणारी मुलं – मुली आणि ज्येष्ठ महिलांना सांभाळत निघालेल्या तरुण मुलींनी मोर्चा यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग घेतला आहेङा .

maratha-kranti-morcha-sindhudurg-3
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी , मराठा समाजाला आरक्षण मिळावे , ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करावा , शेतीमालाला हमीभाव मिळावा व शेतकऱ्यांना च मिळावी या मोर्चाच्या मागण्यांचे महिलांच्या हातातील फलक लक्ष वेधून घेत होते . मोर्चात सहभागी झालेल्या महिलांना जागोजागी पाणी, खाऊ , फळे वाटप करणारे पाठबळ देत होते.
सकाळी दहापासून सुरू झालेल्या फक्त एक मराठा लाख मराठा दिसू लागला. वैद्यकीय पथक , नाश्ता , चहा पाण्याची सोय आणि स्वयंसेवकांची नम्रता हे येथील ठळक वैशिष्ट्य दिसून येते होते.
रविवारी सकाळपासूनच मोर्चाची वर्दळ सुरू झाली होती . दुचाकी, चारचाकींमधून येणाऱ्या सर्व वाहनांना नियोजनबध्द पार्किंगची सोय केली होती.तसेच वैंद्यकीय पथक आणि रुग्णवाहिका तैनात होती.कसाल जैतापकर कॉलनी येथे स्वयंसेवकांनी पार्किंगसाठी योगदान दिले . येईल त्याचे आपुलकीने स्वागत करणारे शेकडो स्वयंसेवक ठिकठिकाणच्या मार्गावर थांबून होते.पोलीसांचा वॉच सुरूच होता. सिंधुदुर्गनगरीत येणाऱ्या लोकांना शेकडो स्वयंसेवक नम्रतेने मार्गदर्शन करीत होते.येथील शासकीय मैदानावर पार्किंगचे शिस्तबद्ध नियोजन होते . येणारा प्रत्येक जण शिस्तीचे पालन करीत होता .
चारचाकी , दुचाकी, रुबाबदार बुलेटवर भगवा झेंडा , डोक्यावर भगव्या टोप्या घालून , ग्रामीण भागातील लोक टेम्पो , जीप भरून जथ्याजथ्याने येत होते.साधारण दहाच्या सुमारास सिंधुदुर्गनगरी गजबजू लागली होती. अबालवृद्धांचा सहभाग मोर्चात वेगळीच ऊर्जा निर्माण करीत होता . साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य चौकात गर्दी वाढली . बघताबघता मुख्य चौक भगवा दिसू लागला. बहुतांशी लोकांच्या हातात भगवे झेंडे होते. ” एक मराठा लाख मराठा ‘ असे लिहिलेले टी शर्ट घालून राबणारे तरुण स्वयंसेवक सर्वांना नम्रतेने मार्गदर्शन करीत होते शिवाजी चौकात एका बाजूला घातलेल्या व्यासपीठावरील स्पीकरवरून सर्वांना मार्गदर्शक सूचना दिल्या जात होत्या. बघताबघता मोर्चाची वेळ होत होती.आणि एक मराठा लाख मराठा ‘ दिसत होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी. यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे सुरू आहेत.सिंधुदुर्गातील मोर्चा ” न भूतो न भविष्यति ‘ असा असेल, अशी वातावरणनिर्मिती गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू होती . आज प्रत्यक्षात सिंधुदुर्गवासियांना याची अनुभुती आली . ” ना नेता , ना घोषणा ‘ हे राज्यभरातील मोर्चांचे स्वरूप सिंधुदुर्गातही कायम होते . मोर्चात मोर्चाला अनेक समाजाने पाठिंबा देत मोर्चात काहीजण सहभागी झाले होते.

चंद्रपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाला प्रचंड प्रतिसाद !!

चंद्रपूर- 19 ऑक्टोबर

राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात येत असताना आज मराठा समाजाचा मूक मोर्चा चंद्रपूरात निघत आहे. चंद्रपूरातील या मोर्चाला म्हाडा कॉलनी मैदानापासून सुरुवात करण्यात आली.

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशा अनेक मागण्यांसाठी राज्यभरातून मराठा समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. चंद्रपूरातील या मोर्चाच्या आयोजकांच्या दाव्याप्रमाणे या मोर्चाला जवळपास तीन ते साडेतीन लाख लोक उपस्थित असतील असा अंदाज लावण्यात आला.

चंद्रपूर मराठा क्रांती मोर्चा फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कर्नाटक शहाजी राजेची भुमि मराठा क्रांती मुक मोर्चा बिदर प्रचंड प्रतिसाद…

शहाजीराजेंच्या जन्मभुमीतुन सुरु झालेला मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार आज शहाजीराजेंच्या कर्मभुमीत म्हणजेच कर्नाटक प्रांतात पोचला. मराठ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आम्हाला कोणत्याही सीमांचे बंधन नाही हे ठणकावुन सांगत आज झालेल्या मोर्चाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले. आमचा इतिहास या सीमाप्रश्नाच्या पलीकडचा आहे. खुद्द शहाजीराजेंच्या घोड्यांच्या टापांखाली आलेला बिदर हा कर्नाटकातील भाग आज पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाद्वारे मराठ्यांची पावलांखाली आला. इतिहासात मराठ्यांचा पराक्रम पाहिलेल्या या भुमीत मराठ्यांनी शांततेच्या मार्गात मोर्चा काढुन वेगळा इतिहास निर्माण केला आहे. आज तिथे काढण्यात आलेल्या मोर्चात कर्नाटकास शहाजीराजेंचे राज्य घोषित करा ही देखील मागणी करण्यात आली

बिदर येथील मराठा क्रांती मोर्चा फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मराठा क्रांति मोर्चाला जगभरातुन प्रतिसाद , न्युयॉर्क मधे मराठा क्रांती मोर्चा संपन्न

१) “मराठा क्रांती मूक मोर्चा” Times Square, New York येथे १६ ऑक्टोबर रोजी संपन्न.
२) न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टीकट या ३ राज्यांतील सकल मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

img-20161017-wa0003
३) न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टीकट या ३ राज्यांतील ८ युवतींतर्फे निवेदन सादर
४) न्यूयॉर्क सिनेटर मा. चक शुमर व भारताचे UN मधील दूत श्री सईद अकबरुद्दीन यांना निवेदन

img-20161017-wa0004
५) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे व भारताचे न्यूयॉर्क येथील राजदूत सौ दास यांना भेटून निवेदन सादर करण्यात येईल

img-20161017-wa0002

img-20161017-wa0001

६) भारतीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी कुतूहलाने माहिती घेतली व अनेकांनी पाठींबा दर्शविला
७) येत्या दिवसांत कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, कोलोरॅडो, विस्कॉन्सिन व वॉशिंग्टन येथे मोर्चाचे नियोजन

ठाण्यात मराठा क्रांती मूक मोर्चाला तुफान प्रतिसाद.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी रविवारी ठाण्यात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील तीन हात नाका येथून सुरुवात झालेल्या या मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सांगता झाली. तर चिपळूणमध्येही मराठा क्रांती मोर्चासाठी दापोली, रत्नागिरी, राजापूरवरुन लोक आली होती.
कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाजातर्फे मोर्चे काढले जात आहेत. रविवारी ठाणे आणि चिपळूणमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील मोर्चामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शहरात सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे वाहतूक बदल करण्यात आले.  मोर्चे शांततेत निघत असले तरी पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होते. ठाण्यातील मोर्चामध्ये एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.  ठाण्यातील मोर्चासाठी बदलापूर, कल्याण, डोंबिवलीतील नागरिकही ठाण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर लहान मुलींनी मराठा समाजाच्या मागण्या मांडल्या. मराठा समाजाच्या ११ मागण्यांचे निवेदन यानंतर जिल्हाधिका-यांना देण्यात आले. आम्हाला आता सरकारसोबत चर्चा नव्हे तर सरकारची थेट कृती हवी आहे अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. तर कोपर्डी बलात्कारप्रकरणातील नराधमांविरोधातील खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी  मोर्चात सहभागी झालेले एकनाथ शिंदे यांनी केली.
चिपळूणमध्ये निघालेल्या मोर्चात विनायक राऊत, भास्कर जाधव आदी नेतेमंडळी सहभागी झाली. महिला आणि तरुणींची मोर्चातील उपस्थिती लक्षणीय आहे.चिपळूणमध्ये पवन तलावाकडे येणा-या रस्त्यांवर गर्दी झाली होती. या दोन्ही मोर्चामध्ये काळा टी शर्ट आणि एक मराठा लाख मराठा अशा संदेश लिहीलेल्या टोप्या घालून मोर्चेकरी सहभागी झाले होते.

ठाणे मराठा क्रांती मोर्चा फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

maratha kranti morcha kolhapur

करविर नगरीत मराठा ऐकवटला!

कोल्हापूर दिनांक:15 ऑक्टोबर

भगव्या पताका, भगव्या टोप्या, शिस्त आणि शांतता याच्यासोबत ‘आपली एकी तुटायची नाही‘, ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणांनी दुमलेले कोल्हापूर शहर. अशा वातावरणात आज-शनिवारी करवीरनगरीत मराठा क्रांती मूकमोर्चाचे तुफान आले. लाखो मराठ्यांच्या या तुफानाने मराठा समाजाचे क्रांती पाऊल टाकले आहे.

मोर्चाच्या माध्यमातून कोपार्डी बालात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ॲट्रोसिटी कायद्यातील काही अटी शिथिल कराव्यात, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी सादर करण्यात आले. शहरातल ताराराणी चौक, गांधी मैदान, सायबर कॉलेज, पेव्हीलीयन ग्राऊंड या चार ठिकाणाहून मोर्चेकरी दसरा चौकात दाखल झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपात पाच तरूणींनी मनोगत व्यक्त केले. उन्हाचा कडाका आणि तापलेली जमीन, अशा आवस्थेतही दसरा चौकात शिस्तबध्दपणे मोर्चेकरी जमले होते. दुपारी एक वाजल्यानंतर शहराच्या चारी बाजूने दसरा चौकाच्या दिशेने मोर्चेकऱ्यांचा ओघ येत होता. कोणताही नेता नाही, नेतृत्व नाही अशा या शिस्तबध्द मोर्चाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.

लाखोंच्या संख्येने जमलेला मराठा बांधव (ड्रोन फोटो)

लाखोंच्या संख्येने जमलेला मराठा बांधव (ड्रोन फोटो)

‘स्‍वाभिमान वाटतो… मराठ्यांच्‍या एकजुटीचा’

लाखोंच्‍या संख्‍येने आलेला मराठा समाज कोल्‍हापुरातील दसरा चौकात एकत्र आला आहे. यावेळी काही रणरागिणींनी छत्रपती शाहू महाराजांच्‍या पुतळ्याजवळ उभारण्‍यात आलेल्‍या व्‍यासपीठावर उत्‍स्‍फूर्तपणे भाषणे केली आहेत.

रणरागिणी भाषणात म्‍हणाल्‍या, ‘मराठा समाज असाच वर्तमानातही एकवटला तर भविष्‍य बदलू शकते. आणि आताच त्‍याची सुरुवात झाली आहे. लाखो, कोटींचा जनसागर एकवटलेला आहेत. आम्‍ही आमच्‍या न्‍यायहक्‍कासाठी एकवटलेलो आहोत. आमच्‍या मागण्‍या पूर्ण झाल्‍या पाहिजेत. मराठी माणसाला आरक्षण मिळालेच पाहिजे. याशिवाय मराठ्यांची प्रगती होणार नाही. शिवबाचे मावळे आम्‍ही आता मागे हटणार नाही. न्‍यायहक्‍कासाठी आम्‍ही लढत आहोत. कोपर्डी घटनेचा आम्‍ही निषेध करतो. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. ॲट्रॉसिटी कायदा रद्‍द व्‍हावा, हा आमचा मुळीच हेतू नाही. ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतो, त्‍यासाठी यात बदल झालाच पाहिजे. आता आम्‍ही सहन करणार नाही. आमच्‍या न्‍यायहक्‍कासाठी हा मूक मोर्चा काढण्‍यात आला आहे. आम्‍हाला स्‍वाभिमान वाटतो, मराठयांच्‍या एकजुटीचा.’

कोल्हापूर मराठा क्रांती मोर्चा फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

maratha kranti twitter morcha kolhapur

कोल्हापुर मोर्चाच्या रंगात रंगला ट्विटर! #KolhapurMKM हॅशटॅग देशात न.1

आज परत एक ट्विटर वर मराठ्यांनि विक्रम केला. संपुर्ण ट्विटर हे #KolhapurMKM या हँशटँग च्या रंगात रंगले होते.
संध्याकाळी ७ वाजता हा ट्रेंड सुरू करण्यात आला ११ वाजेपर्यत हा ट्रेंड चालला. या संपुर्ण वेळात ३०,००० ट्विटसह भारतात अनेक ठिकाणी हा ट्रेंड टॉप ५ मधे राहीला.
एखाद्या प्रादेशीक विषयावर ट्रेंड गाजायचि हि पहीलीच वेळ होती. या ट्रेंड मधे मराठा युवक,युवतिंनी त्याच्या मनातील खदखद व्यक्त केली. सोबतच अनेक मराठ्यांचे वैशिष्ट्ये नमुद करण्यात आली.
आपणास ह्या सर्व ट्विट पहायच्या असल्यास ट्विटर वर सर्च करा #KolhapurMKM
#MarathaKrantiMorcha, #MarathaChanging या नंतर हा सुध्दा ट्रेंड भरघोस यश देऊन गेला.
यानंतर ही अशेच निरनिराळे हँशटँग चालु राहतील असे आयटि टिम कडुन कळविण्यात आले.

kolhapur maratha kranti twitter morcha

चला ट्रेंड करायच लागतय !! कोल्हापुर मोर्चाचा आवाज जगात पोहचवुया…

सर्व मराठा बांधवाना आव्हान की,
कोल्हापुर मराठा क्रांती मुक मोर्चा याकरीता ट्विटर वर परत ट्रेंड मोहीम करण्यात येत आहे.

याकरिता दिनांक १४ ऑक्टोबर शुक्रवार सायंकाळी ७ ते ११ या वेळेस जास्तित जास्त मराठा बांधवानी Twitter वर ऑनलाईन रहावे.

हँशटँग कोणता वापरावा या बाबत माहीती आमचे Official Twitter Account @RtMaratha ,
फेसबुक पेज मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यावर वेळेवर माहीती देण्यात येईल.
जास्तित जास्त संख्येने समाज बांधवानी ट्विटर वर उपस्थित रहावे.
ट्रेंड करिता खालील काही गोष्टि ध्यानात ठेवाव्या
१) जागतिक व राष्ट्रिय मिडीयाला ट्विट करतानी टँग करा.
२) अर्वाच्य भाषेत ट्विट करु नये.
३) ट्विट स्पष्ट शब्दात योग्य लिहावे.
४) मोर्चातिल वैशिष्ट्यपुर्ण बाबी जगाला दाखवाव्या.
५) ज्यांना ईंग्रजी जमते त्यांनी ईंग्रजित जास्तित जास्त ट्विट करावे.
६) हँशटँग योग्य लिहावा व सोबत आपले विचार लिहावे.
७) रिट्वीट पेक्षा ट्विट करण्यावर जास्त भर द्या.
चला ट्रेंड करायच लागतय!! कोल्हापुर मोर्चाचा आवाज जगात पोहचवुया…
मराठा क्रांति मोर्चा महाराष्ट्र
Facebook.com/MarathakrantiMaharashtra

मराठ्यांचा ट्विटरवर डंका,लाखो ट्विट्सचा पडला पाऊस

09 ऑक्टोबर : राज्यभरात लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मराठा मोर्च्याचं वादळ आता ट्विटरवरही धडकलंय. आज ट्विटरवरही एक मराठा लाख मराठाचा एल्गार पाहण्यास मिळालाय. ट्विटरवर #MarathaKrantiMorcha हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला. 1 लाख ट्विटचा टप्पा पार करून *#MarathaKrantiMorcha* हा हॅशटॅग रविवारी सातव्या स्थानावर होता.

मराठा क्रांती मोर्चा आयटी टिमकडून आज ट्विटरवर मराठा क्रांती मोर्चा या हॅशटॅगच्या रुपात मोर्चा काढण्याचं आयोजन केले होते. सकाळी 10 वाजेपासून या ट्विटर मोर्चाला सुरुवात झाली. पण दुपारी 1.30 च्या सुमारास अखेर मराठा क्रांती मोर्चा हा हॅशटॅग ट्रेडिंगला आला. आधी 10 व्या आणि नंतर सातव्या स्थानावर ट्विटरवर ट्रेंडिंगला येऊन रविवारी दिवसभर ट्विटरवर Top टेनमध्ये हा हॅशटॅग झळकत होता.कपिल शर्माच्या एका ट्विटला उत्तर देणारे मुख्यमंत्री आज एक लाख ट्विट असुनही कुठल्याही ट्विटला उत्तर देऊ शकले नसल्यामुळे नेटिझन्समधे संताप दिसुन आला.अश्याप्रकारे मोहिम भविष्यात ही राबविण्यात येणार आहे असे मराठा क्रांती मोर्चा आयटी टीम कडून कळवण्यात आले आहे. ट्विटरवरून आलेल्या अधिकृत माहीतीनुसार रविवारी सायंकाळपर्यंत या हॅशटॅगवर जवळपास 1 लाख 30 हजाराच्यावर ट्विट झाले होते.